आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • 29 Toxic Chemicals Reach Body Through Plastic ... Then Women Decide To Fight, 300 Researchers From 30 Countries Participate

भास्कर ओरिजिनल:प्लास्टिकद्वारे शरीरात पोहोचली 29 विषारी रसायने... मग महिलांनीच केला लढाईचा निर्धार, 30 देशांतील 300 संशोधकांचा सहभाग

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्लास्टिक कचरामुक्त सागराच्या मोहिमेत महिला पथकासोबत अॅमिली पेन

“२००७ मध्ये एका संशोधनासाठी चीनला जायचे होते. कर्ब घटक कमी करण्यासाठी विमान प्रवास करायचा नाही असे ठरवले होते. तीन महिन्यांच्या प्रवासानंतर चीनला पोहोचले. पुढील वर्षी २० हजार किमी लांब ऑस्ट्रेलियात नोकरी मिळाली. विमानाशिवाय एवढा लांबचा प्रवास करायचा कसा हे आव्हान होते. गुगलवर शोध घेतला तेव्हा जैवइंधनावर चालणाऱ्या अर्थरेस बोटीवाबतची माहिती मिळाली. मी त्या बोटीच्या कॅप्टनशी बोलले आणि १२० दिवसांच्या सागरी प्रवासावर निघाले. प्रवासात आमची बोट प्लास्टिक कचऱ्याला धडकली. वाटले, इथे एवढे प्लास्टिक कसे आले? या प्रश्नातून प्लास्टिकमुक्त समुद्राचा माझा प्रवास सुरू झाला. मी स्वत: प्लास्टिकद्वारे शरीरात जाणाऱ्या ३५ प्रकारच्या रसायनाचा परिणाम जाणून घेण्यासाठी चाचणी केली. त्यात लक्षात आले की, २९ प्रकारचे रसायन शरीरात गेले आहेत. सौंदर्य प्रसाधने आणि प्लास्टिक भांड्याच्या वापरातून ही रसायने शरीरात पोहोचली आहेत. यामुळे कर्करोग, प्रजनन क्षमता किंवा हार्मोन्स असंतुलनाच्या समस्या वाढल्या आहेत.

मला जाणीव झाली ही, वास्तवात हा मुद्दा महिलांचा आहे. हा त्यांच्या आरोग्याशी संबंधित विषय आहे. त्यामुळे जगाला या समस्येची माहिती व्हावी यासाठी महिलांनी सागरी प्रवासाद्वारे मोहीम चालवावी हे ठरवले. प्रत्यक्षात हे पाऊल प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी प्रोत्साहन देते. याचाच भाग म्हणून आतापर्यंत २८ देशांतील ८० महिला संशोधकांनी १०३३० नॉटिकल मैल प्रवास केलेला आहे. यामध्ये ९ देश कव्हर केले आहेत. २०१९ मध्ये आम्ही “ई-एक्सपीडिशन राउंड द वर्ल्ड’ प्रवास सुरू केला. यातून ३० देशांतील ३०० महिला संशोधक जोडल्या गेल्या. याअंतर्गत ३ वर्षांत ३८ हजार नॉटिकल मैल प्रवास करून सागरी आरोग्य समजून घेतले जाईल. सध्या जगातील एकूण प्लास्टिक उत्पादनाचे २०% पुनर्प्रक्रिया होते. यात वाढ होणे आवश्यक आहे. सर्व मिळून या दिशेने काम केल्यास समुद्र पुन्हा आरोग्यदायी होऊ शकतो.

शिफ्ट टूल केला लाँच

अॅमिली आणि त्यांच्या चमूने एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म SHiFT लाँच केला आहे. हा टूल लोकांना त्यांचे हित, कौशल्य आणि प्लास्टिकवरील उपाय शोधण्यासाठी मदत करतो. यावर प्लास्टिकच्या उपायासाठी १०० पेक्षा जास्त पद्धती आहेत.

बातम्या आणखी आहेत...