आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दूरसंचार नियामक टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडियाची(ट्राय) जेव्हापासून स्थापना झाली तेव्हापासून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे चेअरमन आर.एस. शर्मा बुधवारी निवृत्त झाले. शर्मा युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे(यूआयडीएआय) पहिले महासंचालकही राहिले आहेत. शर्मा यांच्याकडून मोबाइल नेटवर्कच्या समस्या, प्रीमियम प्लॅन्स, दूरसंचारच्या विविध मुद्द्यांवर विशेष चर्चा केली...
> अंबानी टूजी मुक्त भारताबाबत बोलतात, तुम्हाला काय वाटते?
देशात अद्यापही मोठ्या प्रमाणात टूजी ग्राहक आणि फीचर फोनचे आहेत. कमीत कमी ४० टक्के ग्राहक फीचर फोनचे आहेत. अशा स्थितीत ते अचानक बंद करू शकत नाही. टूजी सेवा बंद कराव्यात यावर सध्या कोणी चर्चा करत असेल, असे मला वाटत नाही.
> कॉल ड्रॉप, नेटवर्कची समस्या आहे. झाडावर बसल्यावर रेंज येत असल्याची छायाचित्रे येतात. ट्राय काय पाऊल उचलत आहे?
समस्या वेगळीच आहे. शहरांत टॉवरमुळे कॅन्सर होईल, असा भ्रम आहे. याला काहीच आधार नाही. आम्ही अनेक वेळा सांगितले आहे, ज्या पद्धतीने मायक्रोवेव्ह आणि हीटरमधून लहरी निघतात तशा त्या टॉवरमधूनही निघतात. यामुळे कोणतेही नुकसान होणारे नाही. टॉवर लावणार नसाल तर कनेक्टिव्हिटी कशी येईल. चांगले नेटवर्क मिळावे, असा ट्रायचा प्रयत्न असतो.
> दूरसंचार आवश्यक सेवा आहे, यावर जीएसटी १८% घेतला जातो, हे तर्कसंगत आहे का? दर कमी करण्यासाठी ट्राय काय करत आहे?
जीएसटी दर ट्रायच्या अधिकारक्षेत्रात नाही. कारण, दूरसंचार सेवा अत्यावश्यक सेवा झाली आहे, त्यामुळे कपात केली पाहिजे.
> सरकार चिनी वस्तू आयात घटवण्याबाबत बोलत आहे. आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने दूरसंचार कंपन्या कशा तयारी करत आहेत?
आम्ही खूप आधी सरकारला शिफारस केली होती की, देशात उत्पादन आणि दूरसंचार साहित्य भारतातच तयार झाले पाहिजे. नेटवर्कमध्ये जे राऊटर आणि अन्य उपकरणे लागतात त्याबाबत बोलत आहोत. मोबाइल हँँडसेट्समध्ये पुढे आहात,तसेच नेटवर्कच्या कोअरमध्ये करू शकतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.