आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • 2nd June Historical Events । Today History | Story Of Telangana State, How K Chandrashekar Rao Became First CM

आजचा इतिहास:तेलंगण बनले होते देशाचे नवे राज्य, पाच दशकांच्या आंदोलनानंतर आंध्र प्रदेशपासून झाले होते वेगळे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

2014 मध्ये आजच्याच दिवशी तेलंगणा हे देशाचे नवीन राज्य बनले. आंध्र प्रदेशातून तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची 50 वर्षे जुनी मागणी 8 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पूर्ण झाली. 1 नोव्हेंबर 1956 रोजी राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशींनुसार, तत्कालीन हैदराबाद (तेलंगण) प्रांत भाषिक आधारावर आंध्र प्रदेशात विलीन करण्यात आला होता.

परंतु राज्याचा हा भाग इतर भागांच्या तुलनेत आर्थिक, शैक्षणिक आणि इतर सर्वच पातळ्यांवर मागासलेला होता. यानंतर लगेचच तेलंगणाला वेगळे राज्य करण्याची मागणी पुढे आली.

केसीआर झाले तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री

यासाठीचे पहिले मोठे आंदोलन 1969 मध्ये आंध्र प्रदेशच्या रूपाने नवीन राज्य निर्माण झाल्यानंतर अवघ्या 13 वर्षांनी झाले. तेव्हापासून तेलंगणा वेगळे राज्य बनवण्याच्या मागणीसाठी 2013 पर्यंत आंदोलन सुरूच होते. अखेर 50 वर्षांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षानंतर 2014 मध्ये तेलंगणा हे नवीन राज्य बनले. के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर, ज्यांनी 2009 मध्ये नवीन राज्याच्या निर्मितीसाठी उपोषण केले होते, ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले आणि आजही ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत.

वेगळ्या तेलंगण राज्याच्या निर्मितीची चळवळ 5 दशके चालली

स्वतंत्र तेलंगण राज्याच्या निर्मितीच्या मागणीसाठी 1969 मध्ये पहिल्यांदा आंदोलन केल्यानंतर 1972 आणि 2009 मध्येही मोठी आंदोलने झाली. 1969 मध्ये 'जय तेलंगणा' आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि जवळपास 300 लोक मरण पावले. त्यावेळी हे आंदोलन शांत झाले होते, मात्र कोणताही समझोता होऊ शकला नाही. वेगळ्या राज्याच्या मागणीने हळूहळू जोर पकडला.

त्यानंतर 1972 मध्ये ‘जय आंध्र’ आंदोलन सुरू झाले. 1998च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 'एक मत, दोन राज्ये' असा नारा देत वेगळ्या तेलंगणा राज्याच्या मागणीला पाठिंबा दिला होता. 2001 मध्ये के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राष्ट्र समितीची (TRS) स्थापना केली. पक्षाच्या नावावरूनच हे स्पष्ट होते की, वेगळे राज्य निर्माण करण्यासाठी पक्षानेच सर्वाधिक आवाज उठवला होता.

तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना करताना प्रदीर्घ आंदोलन केले होते. तेलंगणाच्या स्थापनेनंतर ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले.
तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना करताना प्रदीर्घ आंदोलन केले होते. तेलंगणाच्या स्थापनेनंतर ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले.

2009 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तेलंगणाबाबत राजकीय सक्रियता वाढली होती. सत्तेत आल्यास तेलंगणा वेगळे राज्य करू, अशी घोषणा भाजपने केली होती. दरम्यान, सप्टेंबर 2009 मध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यामुळे आंध्र प्रदेशात राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले.

29 नोव्हेंबर रोजी केसीआर यांनी उपोषण सुरू केले. केसीआर यांचे उपोषण जसजसे पुढे सरकत गेले, तसतसे तेलंगणासाठी वेगळे राज्य निर्माण करण्याच्या मागणीचे आंदोलन तीव्र होत गेले. राजकीय पक्षांसोबतच विद्यार्थी, कर्मचारी आणि सामाजिक संघटनाही या आंदोलनात सामील झाल्या. त्यानंतर 11 दिवसांनंतर केंद्र सरकारने केसीआरचे उपोषण संपवले आणि तेलंगणा राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले.

फेब्रुवारी 2010 मध्ये केंद्र सरकारने न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली 5 सदस्यांची समिती स्थापन केली. डिसेंबर 2010 मध्ये समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला. यावेळी तेलंगणासंदर्भात निदर्शने करण्यात आली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस कमकुवत झाली होती. नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय राजकारणातही मोठे आव्हान म्हणून पुढे येत होते.

त्यानंतर 3 ऑक्टोबर 2013 रोजी केंद्र सरकारने तेलंगणाच्या निर्मितीला मान्यता दिली. 2 जून रोजी राज्याने औपचारिकपणे आकार घेतला आणि चंद्रशेखर राव राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले. तेलंगणाची निर्मिती होऊनही हैदराबाद शहरावरून दोन राज्यांमध्ये वाद सुरूच होता. मात्र, न्यायमूर्ती श्रीकृष्ण समितीच्या शिफारशीवरून केंद्राने हैदराबादला 10 वर्षांसाठी दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी म्हणून घोषित केले. 2015 मध्ये अमरावती ही हैदराबादची नवी राजधानी बनण्याचा निर्णय घेण्यात आला.

देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 2 जून रोजी घडलेल्या इतर महत्त्वाच्या घटना :

2009 : दहशतवादी संघटना लष्करचा संस्थापक हाफिज मोहम्मद सईद याची नोव्हेंबर 2008 च्या मुंबई हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानी न्यायालयाने सुटका केली.

1988 : भारतीय अभिनेते राज कपूर यांचे निधन.

1972 : नेवाडा येथे युनायटेड एअरलाइन्सच्या विमानाचे एका व्यक्तीने अपहरण केले. अपहरणकर्त्याने ओलिसांची सुटका करण्यासाठी 2 लाख डॉलर्सच्या खंडणीची मागणी केली.

1966 : नासाचे सर्व्हेअर-1 स्पेस व्हेईकल हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे पहिले अमेरिकन अंतराळ वाहन ठरले.

1953 : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ II यांचा राज्याभिषेक झाला. सिंहासनावर बसल्यानंतर सुमारे 7 दशकांनंतरही त्या ब्रिटनची रियासत सांभाळत आहे. 1947 मध्ये एलिझाबेथ यांचा विवाह प्रिन्स फिलिपशी झाला होता.

1881: मार्कोनी यांनी रेडिओच्या पेटंटसाठी अर्ज केला.

1818 : ब्रिटिश सैन्याने मुंबई येथे मराठा आघाडीच्या सैन्याचा पराभव केला.

बातम्या आणखी आहेत...