आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Killing Of Osama Bin Laden । 2nd May Today History | Killing Of Osama Bin Laden By American Navy Seal Story

आजचा इतिहास:जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी लादेनचा खात्मा, पाकिस्तानात घुसून अमेरिकी नौदलाने केले होते ठार

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

11 वर्षांपूर्वी 2011 मध्ये आजच्याच दिवशी अमेरिकेने जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी ओसामा बिन लादेनला ठार केले होते. हा 11 सप्टेंबर 2001 रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याच्या 10 वर्षांनी अमेरिकेने घेतलेला बदला होता. ओसामाला मारण्याच्या संपूर्ण ऑपरेशनवर खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा नजर ठेवून होते. ओबामांनी ओसामाच्या मृत्यूची घोषणाही केली होती.

अल कायदाने केला होता अमेरिकेवर दहशतवादी हल्ला

ओसामा बिन लादेनचा जन्म 10 मार्च 1957 रोजी सौदी अरेबियातील रियाध येथे झाला. त्याने अल कायदा या दहशतवादी संघटनेची स्थापना केली. 9 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तो मास्टरमाइंड होता.

त्याची दहशतवादी संघटना अल कायदाच्या दहशतवाद्यांनी चार विमानांचे अपहरण करून अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवरला धडक दिली. तिसरे विमान त्यांनी पेंटागॉनला धडकवले, तर चौथे विमान क्रॅश झाले.

या दहशतवादी हल्ल्यात वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन्ही इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या होत्या आणि सुमारे 3 हजार लोकांचा मृत्यू झाला होता, तर 25 हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते.

9/11च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने ओसामा बिन लादेन आणि अल कायदाविरुद्ध युद्ध घोषित केले. त्यासाठी अफगाणिस्तानमध्ये अल कायदा आणि तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी युद्ध छेडण्यात आले. सुमारे 10 वर्षे चाललेल्या या ऑपरेशनमध्ये अमेरिकेने हजारो दहशतवाद्यांना पळता भुई थोडी केली होती. मात्र, अनेक प्रयत्न करूनही ओसामा हाती लागला नव्हता.

वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील अल कायदाच्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 3,000 लोक मारले गेले होते.
वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील अल कायदाच्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 3,000 लोक मारले गेले होते.

अमेरिकेचे ऑपरेशन नेपच्यून, ज्यात ओसामाचा झाला खात्मा

अखेर 10 वर्षांनंतर अमेरिकेला ओसामा पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये लपल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी या क्रूरकर्मा दहशतवाद्याला ठार मारण्यासाठी ऑपरेशन नेपच्यून स्पीयर सुरू केले. ही संपूर्ण कारवाई इतकी गुप्त ठेवण्यात आली होती की पाकिस्तानलाही त्याची माहिती नव्हती. अमेरिकन लष्कराच्या विशेष पथकाने पाकच्या सीमेत घुसून अल-कायदाचा म्होरक्या ओसम बिन लादेनचा खात्मा केला. हे ऑपरेशन यूएस नेव्ही सीलच्या कमांडोंनी पार पाडले.

ओसामाला मारण्यासाठी सुमारे 25 सील कमांडोजनी 6 अमेरिकन हेलिकॉप्टरमधून अफगाणिस्तानातून उड्डाण केले. 90 मिनिटांच्या प्रवासानंतर हेलिकॉप्टर ओसामा राहत असलेल्या इस्लामाबादपासून 120 किमी अंतरावर असलेल्या अबोटाबाद येथील कंपाउंडमध्ये उतरले. ओसामा घराच्या तिसऱ्या मजल्यावर होता, कमांडो आले आणि त्यांनी लादेनच्या तोंडावर आणि डोक्यात गोळ्या झाडल्या.

लादेनला ठार केल्यानंतर अमेरिकन कमांडोंनी त्याचा मृतदेह एका पिशवीत भरून अफगाणिस्तानात नेला. ही संपूर्ण मोहीम 40 मिनिटे चालली. यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ओसामाच्या मृत्यूला दुजोरा दिला. या कारवाईत ओसामाची पत्नी आणि एक मुलगाही मारला गेला.

ओसामा बिन लादेनवर अमेरिकेने 1 कोटी डॉलर्सचे इनाम ठेवले होते.
ओसामा बिन लादेनवर अमेरिकेने 1 कोटी डॉलर्सचे इनाम ठेवले होते.

कुणी झाडली होती ओसामावर गोळी?

ओसामाला कोणत्या अमेरिकन नेव्ही कमांडोने गोळ्या घातल्या याची अधिकृत माहिती नाही? ओसामाला मारण्याच्या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या यूएस नेव्ही सीलचे अधिकारी रॉबर्ट ओ'नील यांनी आपल्या ‘द ऑपरेटर’ या पुस्तकात दावा केला आहे की, त्यांनीच ओसामा बिन लादेनवर झाडलेल्या तीन गोळ्यांनी मारला गेला.

400 हून अधिक नेव्ही सील ऑपरेशन्समध्ये सहभागी असलेल्या रॉबर्ट यांनी त्यांच्या पुस्तकात ओसामाला मारण्याच्या संपूर्ण ऑपरेशनचे तपशीलवार वर्णन केले आहे. नील यांचा दावा आहे की, त्यांनी ओसामावर तीनदा गोळ्या झाडल्या, दोन तो उभा असताना आणि एक पडल्यानंतर.

ओसामाचा मृतदेह समुद्रात फेकला

लादेनच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह दफन करण्याऐवजी समुद्रात टाकण्यात आला होता. किंबहुना, लादेनचा मृतदेह दफन करून त्याचे समर्थक त्याच्या थडग्याला महत्त्वाचे स्थान बनवतील, अशी भीती अमेरिकेला वाटत होती. लादेनच्या मृतदेहाचे काय झाले हे त्याच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या ई-मेल संभाषणातून समोर आले आहे.

यूएस नेव्हीचे रिअर अॅडमिरल चार्ल्स गौट यांनी आपल्या मेलमध्ये लादेनचा मृतदेह एका शवपेटीत ठेवून समुद्रात फेकल्याचे लिहिले आहे. मात्र, 2015 मध्ये अमेरिकन तपास पत्रकार सेमर हर्श यांनी अमेरिकन सरकारचा हा दावा खोटा ठरवत म्हटले होते, ओसामाचा मृतदेह समुद्रात फेकला नसून रायफलच्या गोळ्यांनी या त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते आणि त्यातील काही भाग हिंदुकुश पर्वतावर फेकला होता.

महात्मा गांधी यांच्या हत्येप्रकरणी सुरू झाला होता खटला

मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी यांची 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने हत्या केली होती. 2 मे 1948 रोजी पंजाब उच्च न्यायालयात बापूंच्या मारेकऱ्यांच्या शिक्षेवर सुनावणी सुरू झाली. सुमारे 60 दिवस खटला चालला आणि 21 जून रोजी आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली.

या प्रकरणात बंदूक पोहोचवण्यापासून ते गोडसेला प्रार्थनास्थळापर्यंत नेण्यात मदत करण्यापर्यंत अनेकांचा हात होता. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी 8 जणांना आरोपी बनवले. नथुराम गोडसे, त्याचा भाऊ गोपाळ गोडसे, नारायण आपटे, विष्णू करकरे, मदनलाल पाहवा, शंकर किस्तैय्या, दत्तात्रय परचुरे, विनायक सावरकर हे आरोपी होते. या खटल्याची सुनावणी लाल किल्ल्यावरील ट्रायल कोर्टात सुरू झाली, ज्याचा निर्णय 10 फेब्रुवारी 1949 रोजी आला. न्यायाधीश आत्मा चरण यांनी नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशीची शिक्षा सुनावली.

सावरकरांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली. त्यानंतर दत्तात्रेय परचुरे आणि शंकर किस्तैया यांची संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता करण्यात आली. उर्वरित 3 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ट्रायल कोर्टाच्या निर्णयाविरोधात दोषींनी पंजाब हायकोर्टात अपील केले होते. 15 नोव्हेंबर 1949 रोजी गोडसे आणि आपटे यांना अंबाला तुरुंगात फाशी देण्यात आली. गोपाळ गोडसे, विष्णू करकरे आणि मदनलाल पाहवा यांना 12 ऑक्टोबर 1964 रोजी जन्मठेपेची शिक्षा भोगल्यावर सोडण्यात आले.

देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 2 मे रोजी घडलेल्या इतर महत्त्वाच्या घटना

2008 : म्यानमारमधील नर्गिस चक्रीवादळामुळे 1 लाख 38 हजार लोकांचा मृत्यू झाला आणि लाखो लोक बेघर झाले.
2003 : भारताने पाकिस्तानशी राजनैतिक संबंध पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. डिसेंबर 2001 मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी राजनैतिक संबंध तोडले होते.
1986 : अमेरिकेच्या एन. बॅनक्राफ या उत्तर ध्रुवावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
1950 : फ्रान्सने कोलकात्याजवळ असलेले चंद्रनगर भारत सरकारच्या ताब्यात दिले.
1933 : हिटलरने जर्मनीतील कामगार संघटनांवर बंदी घातली.
1519 : महान चित्रकार लिओनार्दो दा विंची यांचे निधन.

बातम्या आणखी आहेत...