आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • 3rd May Today History : BJP Leader Pramod Mahajan Death । Pramod Mahajan Death Reason । 3 May Historical Events

आजचा इतिहास:16 वर्षांपूर्वी अटल-अडवाणींचे निकटवर्तीय नेते प्रमोद महाजन यांचे झाले होते निधन, भावानेच झाडली होती गोळी

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिनांक 22 एप्रिल 2006. मुंबईतील वरळी येथे भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांचे घर. त्यांना भेटण्यासाठी त्यांचे धाकटे भाऊ प्रवीण महाजन आले होते. दोन्ही भावांमध्ये 15 मिनिटे वाद झाला. रागाच्या भरात प्रवीण यांनी प्रमोद महाजनांवर रिव्हॉल्व्हरमधून 3 गोळ्या झाडल्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे 3 मे 2006 रोजी त्यांचे निधन झाले होते.

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान बनण्याचा प्रसंग असो किंवा लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा असो, महाराष्ट्रात शिवसेनेशी युती असो किंवा शायनिंग इंडियाचा मंत्र देणे असो, प्रमोद महाजन यांच्या उल्लेखाशिवाय या बाबी अपूर्णच राहतात. एकेकाळी अटल-अडवाणींच्या जवळचे असलेले प्रमोद महाजन हे त्यावेळी पक्षाच्या दुसऱ्या फळीतील प्रमुख नेते होते. प्रमोद महाजन यांना एकेकाळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पक्षाचे लक्ष्मण म्हटले होते.

पत्रकार ते भाजप नेते असा प्रवास

प्रमोद महाजन यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1949 रोजी मेहबूबनगर (तेलंगणा) येथे झाला. वडील शिक्षक होते. सुरुवातीपासूनच ते राजकीय चर्चेत पुढे होते. शाळेतील अनेक वादविवादही त्यांनी जिंकले. याच काळात ते संघाशी जोडले गेले. पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूट ऑफ जर्नलिझममधून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली. पत्रकारितेत संधी मिळाली नाही, तर त्यांनी कॉलेजमध्ये इंग्रजीचे अध्यापन केले. ते 21-22 वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले.

राजकारणावर त्यांची पकड तर होतीच, शिवाय पत्रकार बनण्याचे गुणही त्यांच्यात होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘तरुण भारत’ या मराठी वृत्तपत्राचे ते उपसंपादक झाले. 1974 मध्ये त्यांनी महाविद्यालयात शिकवणेही बंद केले. RSS ला पूर्ण वेळ देऊ लागले. आणीबाणीच्या काळात देशात इंदिरा गांधींविरुद्धचा रोष वाढत असताना संघही मैदानात उतरला होता. प्रमोद यांनी इंदिराजींच्या निषेधार्थ मोर्चा काढला. 1974 मध्ये त्यांना संघ प्रचारक बनवण्यात आले.

आणीबाणीच्या काळात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी खूप काम केले. त्यांची सक्रियता पाहून त्यांचा भाजपमध्ये समावेश करण्यात आला. 1983 ते 1985 पर्यंत ते पक्षाचे अखिल भारतीय सचिव होते आणि त्यानंतर 1986 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष बनले. 1984 मध्ये त्यांनी पहिली लोकसभा निवडणूक लढवली, पण जिंकता आले नाही. भारतीय जनता युवा मोर्चाचे ते सलग तीन वेळा अध्यक्ष होते.

रामरथाची कल्पना

देशात राममंदिर आंदोलन जोरात असताना भाजपने जोरदार तयारी केली होती. त्यापूर्वी 1983 मध्ये चंद्रशेखर यांनी देशभर पदयात्रा केली होती. राम मंदिर आंदोलनासाठीही अशीच पदयात्रा काढण्याचा अडवाणींचा मानस होता. प्रमोद महाजन यांनी त्यांना सल्ला दिला की, पदयात्रेला जास्त वेळ लागेल, जास्त जागाही कव्हर करू शकणार नाही, पदयात्रा काढण्याऐवजी रथयात्रा काढा. अडवाणींना कल्पना आवडली. प्रमोद यांनी मेटाडोरला रथात बदलले, नाव दिले- रामरथ. अडवाणींच्या रथयात्रेतही प्रमोद महाजनांचा मोठा वाटा होता.

वाजपेयी 1996 मध्ये सत्तेवर आले. प्रमोद यांनी पहिली लोकसभा निवडणूक जिंकली. त्यांना संरक्षण मंत्री करण्यात आले. सरकार केवळ 13 दिवस टिकले. 1998 मध्ये भाजप पुन्हा सत्तेवर आला, मात्र महाजन यांचा पराभव झाला. त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. ते माहिती आणि प्रसारण मंत्री होते आणि त्यांनी दूरसंचार धोरणात अनेक सुधारणा केल्या. आर्थिक अनियमितता आणि रिलायन्सला लाभ दिल्याचा आरोपही त्यांच्यावर होता.

प्रमोद महाजन यांनी अल्पावधीतच राजकारणात झपाट्याने प्रगती केली. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. प्रमोद यांच्यावर गोळ्या झाडण्याचे खरे कारण कोणालाच माहिती नाही. कौटुंबिक मालमत्तेवरून दोन्ही भावांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येते.

1971च्या युद्धातील नायकाचे निधन

लेफ्टनंट जनरल जगजित सिंग अरोरा यांचा जन्म 1916 मध्ये पाकिस्तानमध्ये झाला. 1938 मध्ये ते सैन्यात भरती झाले. 1964 मध्ये त्यांना पूर्व कमांडचे जनरल कमांडिंग ऑफिसर म्हणून जबाबदारी देण्यात आली. 1973 मध्ये जनरल अरोरा सैन्यातून निवृत्त झाले. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांसाठी ते ओळखले जातात. या युद्धात भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि बांगलादेश या नव्या देशाचा जन्म झाला. पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल नियाझी यांनी आपल्या संपूर्ण सैन्यासमोर आत्मसमर्पण पत्रावर स्वाक्षरी केली. त्यांच्यासमोर लेफ्टनंट जनरल जगजित सिंग अरोरा होते. 1971च्या युद्धाचे ते नायक होते. 2005 मध्ये आजच्याच दिवशी त्यांचे निधन झाले.

देश-जगातील 3 मे रोजीच्या महत्त्वाच्या इतर घटना

2019: 'फनी' चक्रीवादळाने ओडिशात कहर केला. 33 जणांचा मृत्यू झाला. सरकारने या काळात हजारो लोकांना सुरक्षित हलवले.
2008: पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला भारतीय कैदी सरबजीत सिंगची फाशी पुढे ढकलण्यात आली.
1993: संयुक्त राष्ट्रांनी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन घोषित केला.
1913: राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट प्रदर्शित झाला.
1845: चीनमधील कॅन्टोनमध्ये थिएटरला लागलेल्या आगीत 1600 लोकांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...