आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

खासगी रेल्वे:मुंबईहून ताशी 160 किमीने धावणार 40 खासगी रेल्वे, खासगी रेल्वेचे मार्ग सर्वात आधी ‘दिव्य मराठी’कडे

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • वेळेची बचत : नागपूर, नांदेड, शिर्डी, नंदुरबार व अकोला मार्गावरील शहरे जोडणार

“भारतीय रेल’च्या रुळांवर खासगी रेल्वे धावण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली अाहे. पहिल्या टप्प्यात १०९ मार्गांची निवड करण्यात आली आहे. यापैकी ४० रेल्वे मुंबईहून सुटून ८ राज्यांत पोहोचतील. खासगी रेल्वेद्वारे मुंबईहून नागपूर, नांदेड, शिर्डी, नंदुरबार आणि अकोला मार्गावरील शहरे जोडली जातील. ही रेल्वे ताशी १६० किलोमीटर वेगाने धावणार अाहे. त्यामुळे मुंबईहून नागपूरला १० तासांत नांदेडला ११, इंदूरला १४ तर दिल्लीला १५ तासांत पोहोचता येईल. यासाठी “मेक इन इंडिया’ अंतर्गत १५१ अत्याधुनिक रेल्वेची निर्मिती होईल.

रेेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी जानेवारीमध्येच खासगी रेल्वेची घोषणा केली होती. गेल्या आठवड्यात रेल्वे मंत्रालयाने १ जुलैपासून इच्छुक कंपन्यांकडून पूर्व अहर्ताप्राप्तीसाठी प्रस्ताव (आरएफक्यू) मागवले. दाखल करण्याची अंतिम तारीख ८ सप्टेंबर आहेत. २२ जुलै रोजी दिल्लीत प्री-बिडिंग बैठक होईल. एकूण प्रकल्पाची किंमत ३० हजार कोटी रुपये असून मुंबईसाठी ४८४० कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. हा निधी पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीपद्वारे उभारला जाईल.

१६ डब्यांची असेल रेल्वे

रेल्वे मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार खासगीकरणासाठी रेल्वेचे १२ क्लस्टर तयार केले असून १०९ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. यात मुंबई -१ आणि मुंबई -२ असे दोन क्लस्टर आहेत. या १६ डब्यांच्या रेल्वे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि आरामदायक असतील. निवड झालेली कंपनी रेल्वेला मालवाहतुकीसाठी एकरकमी, तर इंधनासाठी वापरानुसार मूल्य अदा करेल. ड्रायव्हर, गार्ड मात्र भारतीय रेल्वेचे राहतील.

मुंबई ते नागपूर १० तास, नांदेड ११ तासांतच अंतर कापणार

आरएफक्यूमधील १०९ पैकी ४० रेल्वे मुंबईहून कर्नाटक, गोवा, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश आणि बिहारला जातील. प्रवासासाठी लागणारा वेळही निश्चित करण्यात आला आहे. यानुसार मुंबईहून नागपूर (१०:३० तास), नांदेड (११ तास), अकोला (१४:३० तास), नागपूर (१०:३० तास), नंदुरबार (७ तास), शिर्डी (८:०५ तास), मडगाव (७:१५ तास), वाराणसी (२५ तास), कानपूर (२१:५० तास), हावडा (२५ तास), नवी दिल्ली (१५ तास), अहमदाबाद (६:१५ तास), सुरत (५ तास) आणि इंदूरसाठी १४ तास लागतील.