आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • 5G Will Give Employment To More Than 1.5 Lakh People In The Coming Days; Know What Will Change With This Service To Be Launched In Early 2022

5Gमुळे इंटरनेटच्या वेगासह रोजगाराच्या संधीही वाढणार:1.5 लाखाहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करुन देईल 5G; जाणून घ्या 2022 मध्ये काय-काय बदलणार

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 5G सेवा भारतात कधी सुरू होईल? त्याच्या लाँचिंगचा काय परिणाम होईल? 5G किती आणि कोणत्या प्रकारचे नवीन रोजगार निर्माण करेल? याविषयी जाणून घेऊयात सविस्तर...

2020 या वर्षात कोरोनामुळे बरेच काही बदलले आहे. कोर्टात व्हर्च्युअल सुनावणी, ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन क्लासेस, डॉक्टरांचा ऑनलाइन सल्ला आणि टेलिमेडिसिनचा वापर अचानक वाढला आहे. लोकांना वेगवान इंटरनेटची गरज भासू लागली आहे. दूरसंचार कंपन्यांनी देशात 5 G तंत्रज्ञानाची गरज ओळखली आहे. हेच कारण आहे की मागील काही महिन्यांपासून 5 G शी संबंधित नोक-या वेगाने वाढत आहेत.

डेटा अ‍ॅनालिटिक्स कंपनी ग्लोबल डेटाच्या मते, ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 च्या तुलनेत भारतात 5 जी-संबंधित रिक्त जागा जानेवारी-मार्च 2021 मध्ये दुपटीने वाढल्या. या फर्मचे बिझनेस फंडामेंट्ल अ‍ॅनालिस्ट अजय थल्लूरी यांचे म्हणणे आहे की, येत्या काही महिन्यांत नोक-यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, कारण 5G च्या आगमनाने बर्‍याच क्षेत्रांवर परिणाम होईल.

5G सेवा भारतात कधी सुरू होईल? त्याच्या लाँचिंगचा काय परिणाम होईल? 5G किती आणि कोणत्या प्रकारचे नवीन रोजगार निर्माण करेल? याविषयी जाणून घेऊयात सविस्तर...

अभियांत्रिकी आणि सॉफ्टवेअर स्किल्सला जास्त मागणी

 • टॅलेंट सोल्यूशन कंपनी Xphenoच्या अहवालानुसार, लवकरच भारतात 5G जी सुरू करण्यासाठी दीड लाखांहून अधिक लोकांची आवश्यकता पडले. आयपी नेटवर्किंग, फर्मवेअर, ऑटोमेशन, मशीन लर्निंग, बिग डेटा एक्सपर्ट्स, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्स, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर्स यांची मागणी वाढेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बहुतेक भरती टेलिकॉम आणि आयओटी कंपन्यांद्वारे केल्या जातील.
 • TeamLease सर्व्हिसेसच्या अहवालानुसार, वर्षाच्या अखेरीस सुरू होणा-या 5G जी सेवांमुळे केवळ इंटरनेटचा वेग वाढणार नाही तर पुढील दोन वर्षांसाठी बंपर नोक-याही मिळतील. यातील बहुतेक नोकर्‍या कंत्राटावर असतील, परंतु सध्या महामारीच्या या कठीण काळात देशातील रोजगाराला हा मोठा दिलासा मिळणार आहे. या फर्मचे व्यवसाय प्रमुख देवल सिंह म्हणाले की, कोरोना संक्रमणाची दुसरी लाट असूनही टेलिकॉम कंपन्यांची सेवा वाढतच आहे.

5G शी संबंधित एकुण रिक्त जागांपैकी 30% रिक्त जागा Cisco मध्ये आहेत

 • डेटा अ‍ॅनालिटिक्स कंपनी ग्लोबल डेटाने जानेवारी 2020 ते मार्च 2021 दरम्यान 5G संबंधित नोक-यांचे विश्लेषण केले आहे. अहवालानुसार, एकूण रिक्त जागांपैकी 30% रिक्त जागा एकट्या Cisco कडे आहेत. ही अमेरिकेची बहुराष्ट्रीय कंपनी आहे जी जगभरातील 5G प्रकल्पांवर 3.6 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे.
 • दुसर्‍या क्रमांकावर स्वीडिश कंपनी Ericsson असून त्यांच्याकडे 20% रिक्त जागा आहेत. त्याचप्रमाणे कॅप्जेमिनी, डेट आणि हेल्व्हेट-पॅकर्डनेही 5G संबंधित नोकर्‍या काढल्या आहेत.
 • भारतात, 5G संबंधित अधिकाधिक हायरिंग या जागतिक कंपन्यांमार्फत केली जात आहे. जिओ, एअरटेल आणि Vi यांनी अद्याप 5G साठी मोठ्या प्रमाणात रिक्त पदे काढलेली नाहीत.
 • प्रारंभी, ट्रान्समिशन इंजिनिअर, ड्राइव्ह टेस्ट इंजिनिअर आणि मेंटेनन्स इंजिनिअर अशा पदांवर नोक-या मिळतील. सर्किट डिझायनरपासून ते स्ट्रॅटेजिक मास डेव्हलपर बनू शकतात. नेटवर्क इंजिनिअर, प्रॉडक्ट डिझायनर, डेटाबेस डेव्हलपर हे प्रचलित व्यवसाय आहेत. मशीन टू मशीन कम्युनिकेशन, टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग, पायाभूत सुविधा आणि सेवांमध्येही रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत.
 • भारतात सहा वर्षे उशीराने झाली 4G ची सुरुवात
मोबाइलनेटवर्क जनरेशनकुठून झाली सुरुवातभारतात कधी आलेस्पीड

1G

1979टोकियो, जपान----केवळ व्हॉइस कॉल
​​​​​​​ 2G1991फिनलँड ​​​​​​​1995500 kbps
​​​​​​​3G2001फिनलँड20082 Mbps
​​​​​​​4G2009स्वीडन20151 Gbps
5G2018दक्षिण कोरियाअद्याप आलेले नाही20 Gbps

5 जीसाठी 10% अधिक खर्च करण्यास भारतीय तयार आहेत

 • 2020 च्या उत्तरार्धात केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतातील प्रत्येक व्यक्ती दरमहा 12 GB डेटा वापरते. पुढील पाच वर्षांत तो 25 GBपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
 • ग्लोबल टेलिकॉम इंडस्ट्री बॉडीचा अंदाज आहे की, 2025 पर्यंत भारताचे 92 कोटी मोबाईल ग्राहक असतील आणि त्यापैकी 8.8 कोटी लोकांजवळ 5G कनेक्शन असेल. 5G स्वीकारण्यासाठी​​​​​​​ पायाभूत सुविधा व सॉफ्टवेअरची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असेल. ज्यामुळे या क्षेत्रात बंपर रोजगार निर्माण होतील.
 • टेलिकॉम इक्विपमेंट्स निर्माता कंपनी एरिक्सन यांनी एका अहवालात म्हटले आहे की, 5G सेवेसाठी भारतीय ग्राहक सध्याच्या टेलिकॉम खर्चात 10% वाढ करण्यास तयार आहेत.
 • लाँचिंगच्या पहिल्यावर्षात सुमारे 4 कोटी ग्राहक 5G सोबत जोडले जातील असा अंदाज आहे.

2022 च्या सुरूवातीस 5G सेवा सुरू केली जाऊ शकते

भारतातील 4 मोठ्या कंपन्या 5G लाँच करण्याची तयारी करत आहेत. जुलै 2020 मध्ये मुकेश अंबानी यांनी जाहीर केले होते की, जिओ प्लॅटफॉर्म भारतासाठी 5G सोल्युशन विकसित करेल. काही महिन्यांनंतर, जिओने कॅलिफोर्नियाच्या क्वालकॉम टेक्नॉलॉजीशी हातमिळवणी केली. यामुळे देशांतर्गत 5G नेटवर्कच्या पायाभूत सुविधांच्या आणि सेवेच्या कामास गती मिळणे अपेक्षित आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 24 जून 2021 रोजी होणा-या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 5G-सपोर्टिंग फोन आणि 5G लाँचिंगची घोषणा केली जाऊ शकते.

एअरटेलने हैदराबादमध्ये 5G चाचणी पूर्ण केली आहे आणि व्यावसायिक रोलआउटसाठी ते सज्ज आहेत. Vi आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) देखील 5Gचाचण्या घेण्यास तयार आहेत. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र सेवांच्या कार्यक्रमात सांगितले होते की, 'आपण 2G, 3G, 4G मध्ये जगाच्या तुलनेत मागे पडलो, पण 5G मध्ये भारत जगापेक्षा वेगवान धावेल.' महत्त्वाचे म्हणजे 60 पेक्षा जास्त देशांमध्ये 5G सेवा सुरू झाली आहे.

5G चा वेग 4G पेक्षा 20 पट अधिक असेल

5G एक अतिशय उच्च तंत्रज्ञान आहे, जे अत्यंत वेगवान वायरलेस नेटवर्क देते. फुल HD मूव्ही काही सेकंदात डाउनलोड होईल. खरं तर या तंत्रज्ञानाचा उपयोग फक्त व्हिडिओ पाहण्यापेक्षा अधिक जास्त आहे.

5G च्या मदतीने ड्रायव्हरलेस ट्रान्सपोर्ट, स्मार्ट सिटीज, व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि अतिशय वेगवान रिअल टाइम अपडेट्स मिळतील. याद्वारे एक गाडीला दुस-या गाडीशी बोलता येईल. आणि दोन्ही वाहनांमधील अंतर व वेग किती असावे याचा डेटाद्वारे निर्णय घेता येईल.

5G तंत्रज्ञानाच्या आगमनाने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अधिक चांगले होईल आणि स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन, होम स्पीकर्स आणि रोबोट्स सारख्या सर्व मशीन्स अतिशय वेगवान आणि ऑटोमॅटिक फीचर्ससह सुसज्ज असतील.

बातम्या आणखी आहेत...