आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • What Is Indian Strain Of Coronavirus And Why It Is Dangerous, Everything You Should Know About Indian Variant Of Coronavirus

एक्सप्लेनर:कोरोनाचा भारतीय व्हॅरिएंट म्हणजे नेमके काय? किती घातक आणि कोरोना व्हॅक्सीन यावर काम करेल का? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या व्हेरिएंटचे नाव बी .1.617 आहे. हे सध्या 17 देशांमध्ये आढळत आहे.

भारतात या महिन्यात कोरोना संक्रमणाच्या प्रकरणांमध्ये जगात सर्वात जास्त वेगाने वाढ झाली आहे. यासाठी जगातील विशेषज्ञ कोरोनाच्या भारतीय व्हॅरिएंटला जबाबदार मानत आहेत, ज्याची ओळख 6 महिन्यांपूर्वीच झाली होती. जाणून घेऊया, या व्हॅरिएंटविषयी विशेषज्ञ काय म्हणतात -

काय आहे हा व्हॅरिएंट, कधीपासून झाली ओळख
या व्हॅरिएंटचे नाव बी .1.617 आहे. हे सध्या 17 देशांमध्ये आढळत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार हे सर्वात पहिले अक्टोबर 2020 मध्ये आढळले होते. याची पुष्टी डिसेंबर 2020 मध्ये झाली होती. हा व्हायरस खूप संक्रामक आहे आणि यामध्ये व्हॅक्सीनमधून मिळालेल्या इम्यूनिटीकडे दुर्लक्ष करण्याची क्षमता आहे.

महाराष्ट-दिल्लीमध्ये का वाढत आहेत संक्रमित
नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे डायरेक्टर सुजीत कुमार सिंह सांगतात की, दिल्लीमध्ये पसरत असलेल्या संक्रमणामागे बी.117 व्हॅरिएंट आहे, जो अत्याधिक संक्रामक आहे आणि याचा सर्वात पहिला शोध यूकेमध्ये लागला होता. तर महाराष्ट्रात पसरत असलेल्या संक्रमणामागे भारतीय व्हॅरिएंट बी.1.617 जबाबदार आहे.

व्हॅरिएंटची सर्वात मोठे वैशिष्ट्य काय आहे?
यूनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये संक्रमणाची मॉडलिंग करणाऱ्या क्रिस मरे सांगतात की, भारतात आढळणारा बी.1.617 व्हॅरिएंटमध्ये नॅचरल इम्यूनिटीककडे दुर्लक्ष करण्याची क्षमता आहे. नैसर्गिकरित्या लोकांमध्ये संक्रमणाचा सामना करण्याची क्षमता असते. मात्र या शक्तिशाली व्हॅरिएंटमुळे या क्षमतेचा प्रभाव कमी होताना दिसत आहे.

बाहेरचे व्हॅरिएंटही संक्रमण वाढवत आहेत का
होय. बी व्हॅरिएंट बी.1.617 या व्यतिरिक्त, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रकारांमुळेही भारतात संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. अडचण अशी आहे की भारतात कोरोना विषाणू विषयी जीन-सीक्वेन्सिंग डेटा फारच कमी आहे, म्हणूनच सध्या या अंदाजाची पुष्टी करणे थोडे कठीण जात आहे.

व्हॅरिएंटला ताकद कशी मिळत आहे
रोमच्या बैम्बिनो जेसु हॉस्पिटलच्या इम्यूनोलॉजी विभागाचे प्रमुख कार्लो फेडरिको पेर्नो म्हणतात की भारतात आढळणारा हा प्रकार स्वतः इतक्या वेगाने संसर्ग पसरवू शकत नाही. याकडे दुर्लक्ष करणार्‍या गर्दीमुळे हे पसरण्यास मदत होत आहे. जर या गर्दीला सुपर प्रसारक म्हटले गेले तर ते चुकीचे ठरणार नाही.

व्हॅक्सीनपासून बचाव शक्य आहे का
व्हाइट हाउसचे चीफ मेडिकल एडवाइजर अँथनी फॉची यांच्यानुसार सुरुवाती ट्रेंडवरुन भारतात निर्मित कोव्हॅक्सीन या व्हॅरिएंटसोबत लढण्यास सक्षम आहे. तर इंग्लंडची पब्लिक हेल्थ संस्थेने सांगितले की, ते संशोधन करत आहेत की, व्हॅक्सीन या व्हॅरिएंटमध्ये फायदेशीर आहे की नाही. अजुन प्रमाणित केले जाऊ शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...