आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • 70% Students, Parents Use Hindi When Speaking Marathi At Home; Divya Marathi Conducted A Survey Of 1200 Parents In 12 Cities Of The State

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंदी दिन विशेष:घरी मराठी बोलताना 70% विद्यार्थी, पालक वापरतात हिंदी; ‘दिव्य मराठी’ने राज्यातील 12 शहरांत 1200 पालकांशी बोलून केलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिल्डिंग, गार्डन, मोबाइल, सिम कार्ड, रिक्षा, ट्रेन, कार असे असंख्य इंग्रजी शब्द मराठीत अंगवळणी पडलेत. अशीच काहीशी स्थिती हिंदीच्या बाबतीतही झाली आहे. “मुश्किल हैं यार..’, “जाने दो, चलता है..’, “अच्छा ठीक है..’, “मिलते रहेंगे..’, “बहोत भूख लगी है..’ असे असंख्य शब्द, वाक्य आपण मराठी बोलताना मध्ये मध्ये वापरत असतो. दोन्ही भाषांची सरमिसळ करून बोलणाऱ्यांमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आघाडीवर आहेत. १४ सप्टेंबर हिंदी दिन. त्यानिमित्त मराठी बोलताना हिंदीचा होणारा वापर जाणून घेण्यासाठी १२ शहरांत “दिव्य मराठी’च्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. याठिकाणी १२०० पालकांशी बोलल्यानंतर मातृभाषेत हिंदी शब्दांचा प्रचंड प्रभाव असल्याचे ७० टक्के पालकांनी म्हटले.

टीव्ही माध्यम, कार्टून, सोशल मीडियाचे प्रस्थ वाढले असताना मातृभाषेत संवाद साधताना आपसूकच हिंदीचे शब्द बोलले जातात. हे प्रमाण मागील काही दिवसांत वाढले आहे. विशेषत: इंग्रजी माध्यमात जाणारी शालेय मुले त्यांच्या मातृभाषेत बोलताना हिंदीचा सर्रास वापर करतात. त्यांच्यामुळे आता पालकांनाही हळूहळू तशी सवय लागत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. शाळा, महाविद्यालयांमध्ये वर्ग मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारताना जे हिंदीचे शब्द बोलले जातात, त्यांचा वापर कुटुंबातील व्यक्तींसोबतही केला जातो.

हिंदीचा प्रभाव जाणून घेण्यासाठी “दिव्य मराठी’ने काही निवडक प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांच्या आधारे विविध शहरातील पालकांची मते जाणून घेतली तेव्हा हिंदीने मराठी लोकांच्या जीवनात स्थान निर्माण केल्याचा निष्कर्ष निघाला.

हे हिंदी शब्द अधिक वापरले जातात

याद नहीं आ रहा, पहचानाे, भूल गया, बडी मुश्कील है, खडे हाे जावाे, चलो घुमने जाए, मेरा मतलब हैं की, क्या कर रहे हाे, कैसे हो, जल्दी से आओ, खाना खाया क्या, मैने उसको बोला था.. सुनताईच नई, बहुत मजा आया, पूछो मत यार., कल-परसों, हो जाएगा, सही जवाब, बिलकुल कर देंगे, मुझे पता नही, मुझे जाना है, किसने बोला, कम से कम असे असंख्य हिंदी शब्द मराठी बोलताना वापरले जातात.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser