आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रजासत्ताक दिन:सक्षम भारतासाठी अधिकारांसाेबत नागरिक कर्तव्येही अत्यंत गरजेची, त्यावर आपल्या महापुरुषांनी व्यक्त केलेले विचार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आम्ही भारताचे लाेकच संविधानाची ताकद, आम्हीच त्याची प्रेरणा आणि उद्देश आहोत

आपले आचरण : अनुसरण करणारे चांगले असतील तर वाईट संविधानही उत्तम ठरू शकते
एखादे संविधान कितीही चांगले असले तरी त्याचे अनुसरण करणारे वाईट असतील तर संविधानही कुचकामी ठरू शकते. पालन करणारे चांगले असतील तर एखादे वाईट संविधानही उत्तम ठरू शकते. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आपला संकल्प : लोकांना आपल्या प्रेमाची गरज भासावी, असे आपले काम असले पाहिजे
आपण अशा पद्धतीने काम केले पाहिजे की जगात आपली प्रतिष्ठा वाढावी आणि आपण समंजस आहोत, असे जगाला वाटावे. भारतीयांच्या प्रेमाची आपल्यालाही गरज आहे, अशी त्यांना कळकळ लागावी.- सरदार वल्लभभाई पटेल

आपले शिक्षण : शिक्षणाविना नागरिकांच्या अधिकारांची जपणूक करता येणार नाही
पायाभूत शिक्षण जन्मसिद्ध अधिकार व्हावा. त्याविना नागरिकांच्या हक्कांची जपणूक करता येणार नाही. नागरिकांना संधीची समानता प्रदान करण्यासाठी लोकशाही जिवंत राहणे गरजेचे आहे. - मौलाना अबुल कलाम आझाद

आपले धोरण : खऱ्या स्वातंत्र्यासाठी आपण आपल्या गरजाही मर्यादित केल्या पाहिजेत
जी व्यक्ती आपल्या गरजा अत्यधिक वाढवत जाते, ती व्यक्ती स्वत:वरील बंधनांची साखळी आणखी कसत जात असते. यामुळे खऱ्या स्वातंत्र्यासाठी आपल्या गरजा मर्यादित केल्या पाहिजेत. - डॉ. राजेंद्र प्रसाद

आपले चिंतन : हक्क व सुविधांच्या आधी आपण आपली कर्तव्ये समजून घेणे गरजेचे
‘कर्तव्य सर्वाेपरी’ ही भारताची जगाला शिकवण आहे. यातूनच हक्क मिळतात. जगात संघर्षाच्या स्थितीत लोक हक्क व सुविधांचा मुद्दा मांडतात, पण कर्तव्यावर बोलत नाहीत. हेच मतभेदांचे मूळ आहे. - पं. जवाहरलाल नेहरू

बातम्या आणखी आहेत...