आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • 73% Of The Police In The Country Have Mental physical Health Problems, 37% Have Want Changes In Job ; Punjab High Court Recently Raised Questions On Fitness

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजारी पोलिस:देशात 73% पोलिसांना मानसिक-शारीरिक आरोग्य समस्या, 37% ना हवा नोकरीत बदल; पंजाब हायकोर्टाने नुकतेच फिटनेसवर उपस्थित केले प्रश्न

प्रमोद कुमार | नवी दिल्ली/ महेश जोशी |औरंगाबाद/ प्रमोद साहू| रायपूर / माे. सिकंदर | पाटणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिहारमध्ये 50% पोलिसांना हृदय-मधुमेहासारखे आजार

पोलिसांसाठी गुन्हेगारच नव्हे तर स्वत:चे आरोग्यही मोठे आव्हान ठरत आहे. नुकतेच पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने अनफिट पोलिस कर्मचाऱ्यांमुळे वयस्कर आरोपीही पसार होत असल्याचे म्हटले आहे. यामुळे आम्ही देशभरात पोलिसांच्या आरोग्याशी संबंधित आकडेवारी पडताळली. त्यांच्या आरोग्याविषयी जाणून घेतले. “स्टेटस ऑफ पोलिसिंग इन इंडिया २०१९’ च्या अहवालानुसार देशात ७३% पोलिस कोणत्या ना कोणत्या मानसिक, शारीरिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करत आहेत. यात अधिकाऱ्यांपासून ते शिपायापर्यंत सर्वच आहेत. देशात ३७% पोलिस याच वेतनावर दुसरी नोकरी मिळाली तर ती करण्यास तयार आहेत. दिल्लीत गेल्या १० वर्षांत एक हजार पोलिसांनी व्हीआरएस घेतली आणि ७०० जणांनी नोकरीत राजीनामा दिला. ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या अहवालानुसार, उच्च रक्तदाब, मानसिक ताण, निद्रानाश, थकवा, श्वसनाचे विकार इत्यादी आजार आढळतात.

प्रशिक्षणाचा अभाव

हरियाणात २०% पोलिसांना नोकरीत असताना प्रशिक्षण मिळते. गुजरातमध्ये हा आकडा ०.९ टक्के आहे. ट्रेनिंग नसल्याने पोलिस नवी कौशल्ये आत्मसात करू शकत नाहीत.

रोज १४ तास काम

एक पोलिस सरासरी रोज १४ तास कामावर असतो. अधिकारी सरासरी १५ तास, तर महिला पोलिसांची सरासरी १३ तास आहे. अोडिशात हे काम ८ तास, पंजाबात १७ तास होते.

२२% पदे रिक्त

ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटनुसार, पोलिसांची २२% पदे रिक्त आहेत.

वरिष्ठांच्या घरी काम

६२% पोलिसांकडून वरिष्ठ व्यक्तिगत कामे करून घेतात. मप्रमध्ये हा आकडा ६३% आहे.

> महाराष्ट्रात जवळपास तीन लाख पोलिस जवान आहेत. यात सुमारे ३०% जवानांना मधुमेह, रक्तदाब व हृदयाचे आजार आहेत.

> बिहारमध्ये पोलिस असाेसिएशनने दाेन वर्षांपूर्वी फिटनेस तपासला होता. ५०% जवान व अधिकारी मधुमेह, हृदयाच्या आजाराने त्रस्त दिसले. १० टक्के लठ्ठपणाचे बळी होते.

> छत्तीसगडमध्ये १०% पाेलिस कर्मचाऱ्यांना रक्तदाब, मधुमेह व हृदयाशी संबंधित जीवनशैलीचे आजार आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser