आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • 73 Years After The Attack On Srinagar, Reports From The First Village Burnt Down By The Pakistani Army And Gangs ...

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:काश्मीरचे जे गाव तेव्हा पाकने जाळले होते, तेथे भारतीय लष्कराने शा‌ळा-रस्ते तयार करून चित्रच पालटून टाकले

मुदस्सीर कुलू | बारामुल्लाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीनगरवर हल्ल्याची 73 वर्षे, पाकिस्तानी सैन्य आणि टोळ्यांनी जाळलेल्या पहिल्या गावातून वृत्तांत...

उत्तर काश्मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्यातील बोनियार भाग ७३ वर्षांपूर्वी पाकिस्तानी सैन्य आणि टाेळ्यांच्या हल्ल्याचे साक्षीदार ठरले होते. घुसखोरांनी गावात लुटालूट करून अनेक घरे जाळली होती. पण भारतीय सैन्याने येथे रस्ते, शाळा बांधून या भागाचे चित्र बदलले आहे. २७ ऑक्टोबरला इन्फंट्री-डेनिमित्त लष्कर येथे दरवर्षी कार्यक्रम आयोजित करते, त्यात स्थानिक लोक, पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी सहभाग होतात. हा भाग लष्कर आणि लोकांतील प्रगाढ संबंधांचा साक्षीदार आहे.

२२ ऑक्टोबर १९४७ ला १००० टोळ्या आणि पाकिस्तानी सैन्याने या भागात घुसखोरी केली होती. त्यांना श्रीनगरवर कब्जा करायचा होता, पण बारामुल्लाच्या बाहेर भारतीय सैन्याची छा‌वणी आहे, थोडे थांबलात तर स्वत: तुम्हाला रस्ता दाखवू, असे सांगत स्थानिक युवक मकबूल आणि ग्रामस्थांनी त्यांना रोखले. टोळ्यांना ते मान्यही झाले. १७ ऑक्टोबरला शीख रेजिमेंटची पहिली तुकडी दिल्लीहून श्रीनगरला आली आणि तिने टोळ्यांचे मनसुबे उधळून लावले. मात्र, त्यात काही लष्करी अधिकारी आणि मकबूलला प्राण गमवावे लागले. या शौर्याची आठवण म्हणून भारतीय लष्कर इन्फंट्री डे साजरा करते. स्थानिक लोकही या दिवशी मकबूलला आदरांजली अर्पण करतात.

श्रीनगरमध्ये लष्कराचे प्रवक्ता कर्नल राजेश कालियांनी सांगितले की, १९४७ मध्ये लष्कराने प्रथमच खोऱ्यात पाय ठेवला होता. त्यानिमित्त आणि शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. बोनियारच्या लोकांशी आमचे नाते खूप मजबूत आहे. बोनियारचे लोकही लष्कराला खूप मानतात. लष्कराने त्यांचे प्राण तर वाचवलेच शिवाय या भागात रस्ते,शाळा बांधल्या. लोकांना रोजगारही दिला.

त्रिकंजन गावातील ७१ वर्षीय राजा सांगतात की, पाकिस्तानी सैन्याचा हेतू काश्मीरवर कब्जा करण्याचा होता, पण तो साध्य झाला नाही. ६५ वर्षीय गुलामउद्दीन बांते म्हणाले की, आम्ही पूर्णपणे लष्करावर अवलंबून आहोत. लष्कराने येथे खूप कामे केली आहेत, अजूनही करत आहे.

मकबूल नसता तर टोळ्यांनी संपूर्ण भागावर केला असता कब्जा

येथील लोक लष्करानंतर मकबूलला हीरो मानतात. शेरी बारामुल्लाचे मुश्ताक अहमद म्हणाले,‘मकबूलने टोळ्यांना रोखले नसते तर भारतीय लष्कराआधीच टोळ्यांनी श्रीनगरवर कब्जा केला असता. मकबूलमुळे लष्कराला वेळ मिळाला. २००४ मध्ये मकबूलच्या स्मृतिप्रीत्यर्थ शेरवानी कम्युनिटी हाॅलबाहेर स्तंभ स्थापित करण्यात आला. त्या दिवशी भारतीय लष्करही मकबूलच्या हौताम्याच्या स्मृतीनिमित्त कार्यक्रम साजरा करते.’