आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • 8 Months Of Lockdown Completed: Ground Report Of Major Government Hospitals In Five States : 60% Of Patients With Other Diseases In The Corona Epidemic Without Treatment, Surgical Detention

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:कोरोना महामारीत इतर आजारांचे 60% रुग्ण उपचाराविनाच, शस्त्रक्रियांचा खोळंबा; ओपीडीतही रुग्ण सामान्य दिवसांच्या तुलनेत फक्त 20%

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लाॅकडाऊनचे 8 महिने पूर्ण : पाच राज्यांच्या मोठ्या सरकारी रुग्णालयांचा ग्राउंड रिपोर्ट
  • शस्त्रक्रियेसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे, लोकांमध्ये संसर्गाची भीती

कोरोनाचा काळ इतर आजारांच्या रुग्णांसाठी मोठ्या अडचणीचा ठरत आहे. देशातील पाच राज्यांतील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांत गेल्या ८ महिन्यांपासून असे ६०% रुग्ण कमी झाले आहेत. इमर्जन्सीतही रुग्णांना मुश्किलीने दाखल करून घेतले जात आहे. रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी लॉकडाऊनच्या आधीच्या तुलनेत दुप्पट वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे. २५ नोव्हेंबरला लॉकडाऊनचे ८ महिने पूर्ण होत आहेत. ‘दिव्य मराठी’ने दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात आणि बिहार या पाच राज्यांतील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांची पडताळणी केली. त्यात आढ‌‌ळले की, अजूनही ओपीडी पूर्णपणे सुरू नाहीत. रुग्णांची संख्या सामान्य दिवसांच्या तुलनेत २०% पर्यंतच आहे. कोरोनामुळे गंभीर आजार असलेले रुग्ण जास्त त्रस्त आहेत. अहमदाबादच्या सामान्य रुग्णालयाचे रूपांतर कोविड सेंटरमध्ये झाल्याने लोक संसर्गाच्या भीतीने तेथे उपचार करवून घेत नाहीत. दिल्लीतील एम्समध्ये कोरोनापूर्वी ओपीडीत रोज १०-१२ हजार रुग्ण येत होते. आता ही संख्या दोन-तीन हजारावर आली आहे. तेथे शस्त्रक्रियेसाठी इमर्जन्सीत रोज १२०० रुग्ण येतात. आता गरजेनुसारच शस्त्रक्रिया होतात.

महाराष्ट्रात पुणे येथील ससून या सरकारी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी सांगितले की, लॉकडाऊनआधी कमी जोखमीच्या १४० शस्त्रक्रिया रोज होत होत्या, पण आता फक्त १०० च होतात. ओपीडीतही रुग्णांची संख्या २२०० वरून १४०० वर आली आहे. हरियाणात रोहतक पीजीआयएमएसमध्ये तीन दिवसांआधीच इलेक्टिव्ह सर्जरी बंद करण्याचे आदेश जारी झाले आहेत. तेथे पूर्वीच्या १० हजार रुग्णांच्या तुलनेत सध्या तीन हजार रुग्णच येत आहेत.गुजरातमध्ये स‌र्वात मोठ्या सरकारी रुग्णालयातील कॅन्सर हॉस्पिटलचे रूपांतर कोविड सेंटरमध्ये झाले आहे. तेथे कॅन्सरच्या १०० पेक्षा जास्त रुग्णांची शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली आहे. ओपीडीत ४०० ते ८०० रुग्ण येत असत. आता ते नगण्य आहेत. बिहारमध्ये पाटणा येथील एम्स कोविडसाठी राखीव केले आहे. इतर सरकारी रुग्णालयांत शस्त्रक्रिया, ओपीडी सुरू आहेत.

पाच राज्यांतील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांच्या या ४ केस स्टडीतून स्पष्ट होते की या रुग्णालयांत कोरोनापूर्वीची स्थिती येण्यासाठी ६-७ महिने लागू शकतात...

महाराष्ट्र: दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी ५ महिने अंथरुणावर घालवले

टेलिकॉममधील अमोल पालकर (४१) यांची हिप रिप्लेसमेंट सर्जरी पुण्यात ससूनमध्ये मार्च महिन्यात झाली. दुसरी जूनमध्ये होणारी सर्जरी ५ महिन्यांनंतर ऑक्टोबरमध्ये होऊ शकली.

हरियाणा: कॅन्सरची शस्त्रक्रिया सोडा, ओपीडीची तारीखही नाही

३६ वर्षीय राजाराम यांचे पुतणे अमित बैंसला म्हणाले, १३ नोव्हेंबरला काकांना कॅन्सर विभागात दाखवले होते. नंतर शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. शस्त्रक्रिया सोडा, ओपीडीची तारीखही मिळू शकली नाही.

गुजरात: दोन महिन्यांपासून ऑपरेशनची तारीख मिळत नाही

बोन कॅन्सरच्या शस्त्रक्रियेसाठी शामलभाई राजकोटहून दोन महिन्यांपूर्वी अहमदाबादला आले तेव्हा कळाले की येथील कॅन्सर रुग्णालय आता कोविड सेंटर झाले आहेत. सर्व नियोजित शस्त्रक्रिया टळल्या आहेत. > येथे रोज कॅन्सरशी संबंधित ४००-५०० रुग्ण येतात. शस्त्रक्रिया बंद आहेत.

दिल्ली: कोराेना निगेटिव्ह आल्यावर ओपीडीची प्रतीक्षा

द्वारकेच्या गरिमा यांची हिस्टोस्कोपी तपासणी होणार होती. मात्र, तत्पूर्वी कोविड चाचणी आवश्यक होती. या चाचणीत अहवाल निगेटिव्ह आला. मात्र एम्सची ओपीडी सुरू होण्याची ती वाट पाहते आहे. > एम्सच्या ओपीडीत रोज १२ हजार रुग्ण येत. आता केवळ २ हजारच येताहेत.

दिल्लीत एम्समध्ये नव्या रुग्णांच्या भरतीवर ७ डिसेंबरपर्यंत बंदी

दिल्लीत नव्या रुग्णांची भरती ७ डिसेंबरपर्यंत बंद करण्यात आली आहे. २३ नोव्हंेबरला सातव्यांदा आदेश काढून ही भरतीय बंद झाली. मात्र, येथे टेली कन्सल्टन्सीने उपचार होत आहेत. सफदरजंग रुग्णालयात ओपीडीतील रुग्णांची संख्या १० हजारांहून १५०० झाली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser