आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DB ओरिजनल:दुबई एक्स्पोसाठी नवीन मेट्रोचा मार्गच टाकला... शरीरातून निघणाऱ्या कार्बन डायऑक्साइडचे इंधनात रूपांतर करेल मंडप

दुबई / शानीर एन. सिद्दिकी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वात मोठा शो दुबई एक्स्पोचे काउंटडाऊन सुरू, 90% देशांचे हायटेक मंडप तयार

कोरोनात जगातील सर्वात मोठा शो दुबई एक्स्पोचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. तो १ ऑक्टोबरपासून मार्चपर्यंत असेल. त्यात १९१ देश सहभागी होत आहेत. कोरोनानंतरच्या जागतिक अर्थव्यवस्थेला या देशांचे संशोधन गती देतील. ४.३८ चौरस किमी परिसरातील या एक्स्पोत देशांनी त्यांचे हायटेक मंडप उभारले आहेत. यात काल, आज व उद्याची झलक दिसेल.

दुबईने एक्स्पो स्थळापर्यंत मेट्रो मार्ग टाकला आहे. यामुळे लोकांना थेट एक्स्पोच्या दारातच उतरता येईल. मेट्रो स्थानकाचा आकार स्पेस क्राफ्टप्रमाणे आहे, जे तुम्हाला दुसऱ्या जगात नेईल. अबुधाबी, शारजा, फुजैराह, अझमान व रास अल खैमाहपासून स्थळापर्यंत जाण्यासाठी विमानासारख्या सेवा असलेल्या ७० आरामदायी बस असतील. दररोज ६० पेक्षा जास्त लाइव्ह इव्हेंट असतील. फिनलंडच्या मंडपात प्रेक्षकाने सोडलेल्या कार्बन डायऑक्साइडचे इंधनात रूपांतर केले जाईल. त्यावर तयार कॉफी दिली जाईल. एक्स्पोचे २१ मीटर उंच प्रवेशद्वार अल्ट्रा- लाइटवेट कार्बन-फायबरने बनले आहेत. एक्स्पोच्या केंद्रात अल-वसल प्लाझा आहे, यात जगातील सर्वात मोठी ३६० अंश प्रोजेक्शन स्क्रीन ठेवली आहे. ती तयार करण्यासाठी १६ बुर्ज खलिफाच्या उंचीइतके स्टील लागले आहे. टेरा पॅव्हेलियन वीज व पाणी तयार करेल. सौर पॅनलच्या ‘एनर्जी ट्री’पासून वीज तयार होईल, हवेपासून पाणी तयार करणारा ‘वॉटर ट्री’ वीज व पाणी तयार करेल. मोबिलिटी पॅव्हेलियन अलिफमध्ये जगातील सर्वात मोठी लिफ्ट असेल, त्यातून एकाच वेळी १६० लोक जातील.

भविष्याची झलक : भारतीय मंडपात मंगळयान-अंतराळ मोहिमेची झलक, चेक गणराज्य हवेतून पाणी काढेल
- भारताच्या हायटेक मंडपात समृद्ध वारसा व आधुनिकतेची झलक दिसेल. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी उत्सव होईल. भेट देणाऱ्यांना मंगळयान व अंतराळ मोहिमेची माहिती दिली जाईल.
- चेक गणराज्याचा मंडप पाणी समस्येवर तोडगा काढेल. सौरऊर्जेद्वारे हवेतून पाण्याची वाफ कशी काढता येईल हे दाखवेल.
- सौदी अरबचा मंडप तीन जागतिक विक्रम करेल. त्यात जगातील सर्वात मोठा एलईडी मिरर डिस्प्ले, सर्वात मोठी इंटरॅक्टिव्ह स्क्रीन व सर्वात मोठा वॉटर डिस्प्ले बनवण्यात आला आहे.
- महिला मंडप : प्रथमच एक्स्पोत महिलांच्या भूमिकेचा उत्सव होईल. ऑस्कर नामांकित दिग्दर्शक नादिन यांच्या चित्रपटाचा शो होईल.

बातम्या आणखी आहेत...