आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2021 ची A to Z गाइड:A फॉर आर्यन खान, B फॉर बिपिन रावत तर C फॉर कॅपिटल हिलवरील हल्ला; XYZ पर्यंत जाणुन घ्या कसे राहिले 2021

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. तुम्हीही तुमच्या आठवणींची पानं उलटवत असाल की हे वर्ष कसं होतं... तुमच्यासाठी, मित्र-मैत्रिणींसाठी, देशासाठी आणि जगासाठी. उत्तरेही वेगळी असतील. काहींसाठी चांगले, काहींसाठी वाईट, कदाचित खूप वाईट किंवा अजून काही...

चला, मिळून काही तरी करुया... आम्ही 2021 च्या 365 दिवसांना इंग्रीच्या 26 अक्षरांना म्हणजेच A To Z मध्ये गुंफले आहे. याविषयी एकानंतर एक जाणून घेऊया की, या सरत्या वर्षात ABC पासून XYZ पर्यंत काय-काय संस्मरणीय ठरले, मग ते कसेही असो...

A- Aryan Khan ड्रग्स केस

2021 मध्ये बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सर्वाधिक चर्चेत होता. कारण त्याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) क्रूझमधून पार्टी करताना पकडले. तब्बल 27 दिवस तो आर्थर रोड कारागृहात होता. या प्रकरणाबाबत अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी हे भाजपचे षड्यंत्र असल्याचे म्हटले होते. नवाब मलिक आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील शाब्दिक युद्धही चर्चेत आले. दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले.

B- Bipin Rawat अलविदा

दिनांक 8 ऑक्टोबर 2021, सकाळची वेळ. देशातील पहिले सीडीएस बिपिन रावत त्यांच्या पत्नी आणि लष्करी अधिकाऱ्यांसह तामिळनाडूतील लष्करी महाविद्यालयात व्याख्यानासाठी निघाले. काही वेळाने दुपारी बाराच्या सुमारास देशाला धक्का देणारी बातमी आली. कुन्नूरजवळ त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले. सगळीकडे खळबळ उडाली. सर्वांच्या नजरा वृत्तवाहिन्यांवर खिळल्या होत्या. संध्याकाळी 7 च्या सुमारास, दुर्दैवी बातमी आली की सीडीएस रावत, त्यांच्या पत्नीसह 13 लोक या अपघातात मरण पावले. देश असह्य झाला, सच्चा सैनिक देवाने हिरावून घेतला.

C- Capitol Hill मध्ये उपद्रव

6 जानेवारी 2021 हा अमेरिकेसाठी लाजिरवाणा दिवस होता. हे प्रथमच घडले, जेव्हा ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल हिल म्हणजेच संसद भवनात प्रचंड गोंधळ आणि उपद्रव निर्माण केला. त्यांनी हिंसाचार करत यूएस कॅपिटल इमारतीच्या भिंतींवर चढले. गोंधळ माजला होता. यामध्ये एका महिलेलाही आपला जीव गमवावा लागला. खरे तर यावेळच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले. ते अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांचे वय 78 वर्षे आहे. पराभवामुळे नाराज झालेल्या ट्रम्प यांनी बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली नाही.

D- Delta Variant ने धुमाकूळ घातला

2021 हे कोरोना व्हायरस व्हेरिएंटचे वर्ष ठरले. वर्षाची सुरुवात अल्फा आणि बीटा व्हेरियंटने झाली आणि ओमिक्रॉन व्हेरियंटने वर्ष संपत आहे. दरम्यान, काही धोकादायक व्हेरिएंट देखील आली ज्यामध्ये डेल्टा सर्वात प्राणघातक असल्याचे सिद्ध झाले. डेल्टा व्हेरियंट भारतात पहिल्यांदा ऑक्टोबर 2020 मध्ये आढळला होता. हळुहळु सगळ्या जगाला आपल्या विळख्यात घेतले. सर्वत्र वेदना, भीती आणि अश्रू होते. डेल्टाने वेग कमी केला, तर ओमायक्रॉन येऊन धडकला. यावेळी नवीन वर्षासह जग कोरोनाच्या नव्या लाटेत प्रवेश करत आहे.

E- 'Ever Given' ने स्वेज नहर ब्लॉक केली

23 मार्च 2021 रोजी 400 मीटर लांब 'एव्हर गिव्हन' जहाज सुएझ कालव्यात अडकले. 193 किमी लांबीचा सुएझ कालवा भूमध्य समुद्राला लाल समुद्राशी जोडतो. हा जगातील सर्वात व्यस्त व्यापार मार्गांपैकी एक आहे. येथून दररोज सुमारे 9.6 अरब डॉलर किमतीचा माल बाहेर पडतो. 'एव्हर गिव्हन' जहाज काढण्यासाठी सुमारे 20 हजार कंटेनर उतरवण्यात आले. आठवडाभराच्या प्रयत्नानंतर 29 मार्च रोजी रस्ता मोकळा झाला तेव्हा जाममध्ये अडकलेली 367 जहाजे पुढे जाऊ शकली.

F- Farm Law रद्द केले

2021 मधील सर्वात मोठा विजयाचा तुरा शेतकऱ्यांच्या माथ्यावर सजला. वर्षभराच्या प्रदीर्घ लढाईनंतर अखेर केंद्र सरकारला अन्नदात्यापुढे झुकावे लागले. 19 नोव्हेंबर रोजी, पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित करताना तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांनी 379 दिवस ऊन, थंडी, पाऊस, भूक, तहान, फटकार, पाण्याची तोफ, गॅसचे गोळे सहन केले. शेकडो जीवही गेले. तरीही त्यांनी हिंमत हारली नाही आणि सरकारला नतमस्तक केले. 9 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी आपले तंबू काढण्यास सुरुवात केली आणि घोषणाबाजी करत आपापल्या घरी परतले.

G- Gender Ratio मध्ये महिला जास्त झाल्या

भारतात प्रथमच महिलांची लोकसंख्या पुरुषांपेक्षा जास्त झाली आहे. नॅशनल फॅमिली अँड हेल्थ सर्व्हेनुसार, देशातील 1000 पुरुषांच्या तुलनेत महिलांची लोकसंख्या आता 1020 झाली आहे. 1990 मध्ये 1000 पुरुषांमागे 927 महिला होत्या.

H- Harnaaz Sandhu बनली मिस यूनिवर्स

12 डिसेंबर 2021. रविवार होता. सकाळचे 11 वाजले होते. एक विचित्र भावना होती. गेल्या 4 दिवसांपासून सीडीएस हेलिकॉप्टर दुर्घटनेची रडवेली चित्रे सगळीकडे फिरत होती. त्यानंतर इस्रायलच्या इलात शहरातील एका इव्हेंटच्या अँकरने ओरडून म्हटले - इंडिया… समोर उभ्या असलेल्या भारत कन्येला अश्रू अनावर झाले. हे आनंदाचे अश्रू होते, ती मिस युनिव्हर्स 2021 झाली होती. 21 वर्षांनंतर भारतातील एका मुलीला हा किताब मिळाला आहे. देशाची कन्या हरनाज संधू हिच्याकडे जगातील सर्वात सुंदर महिलेचा मुकुट होता. अवघ्या काही तासांतच ती सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत आणि सर्वसामान्यांपर्यंत चर्चेत आली. हरनाज ही पंजाबमधील गुरुदासपूरची आहे

I- Indian Olympians ने डोकियामध्ये सात मेडेल जिंकले

2021 च्या टोकियो ऑलिम्पिकने भारतीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. भारतीयांनी प्रथमच एका सुवर्णासह सात पदके जिंकली. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले. याच्यासह मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक, लवलीना बोरगोहेनने वेल्टरवेटमध्ये कांस्यपदक, पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक, रवी कुमार दहियाने पुरुषांच्या फ्रीस्टाइलमध्ये रौप्यपदक, बजरंग पुनियाने पुरुषांच्या कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकले. याशिवाय पुरुष हॉकी संघानेही कांस्यपदक जिंकून 41 वर्षांची प्रतीक्षा संपवली.

J- Jack Dorsey यांनी ट्विटर ठोकला रामराम

2021 मध्ये तंत्रज्ञानाच्या जगातून एक मोठी बातमी आली. ट्विटरचे सह-संस्थापक आणि सीईओ जॅक डोर्सी यांनी राजीनामा दिला. नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवसांत त्यांनी ट्विटरवर याची घोषणा केली. त्यांच्या जागी पराग अग्रवाल यांना सीईओ बनवण्यात आले.

K- Kashi Vishwanath कॉरिडोरचे उद्घाटन

देश नाही, विदेशीयांसाठीही आस्थेचे केंद्र वाराणसीमध्ये 13 डिसेंबर मोठ्या उत्साहात साजरे झाले. रस्ते, गल्ल्या, परिसर, घरे सजली होती. दिवाळीतही कुठलं शहर असं सजले नसेल. निमित्त होते बाबा काशी विश्वनाथ यांच्या कॉरिडॉरच्या उद्घाटनाचे. खुद्द पीएम मोदी पायी आले होते. गेली 3 वर्षे बाबांचे जगभरातील चाहते या दिवसाची वाट पाहत होते. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे जेव्हा त्याचे उद्घाटन झाले तेव्हा ते अपेक्षेप्रमाणे भव्य होते. बाबा धाम सुशोभित करण्यासाठी सरकारने 800 कोटी रुपये खर्च केले आहेत. आता गंगेत स्नान केल्यानंतर थेट बाबांच्या दर्शनाला जाता येते. संधी मिळाली तर एकदा अवश्य भेट द्या.

L- Lakhimpur हिंसा, 8 जणांचा मृत्यू

3 ऑक्टोबर 2021 रोजी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे एका कार्यक्रमात सहभागी होणार होते. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी तेथे जाहीर सभा घेतली. शेतकऱ्यांचे धाडस पाहून केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याने त्यांच्यावर गाडी चढवली, असा आरोप आहे. या घटनेत एकूण 8 जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये 4 शेतकरी, 2 भाजप कार्यकर्ते, 1 चालक आणि 1 पत्रकारचा मृत्यू झाला. आता या प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे. दुसरीकडे, विरोधक केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत.

M- Mamata Banerjee तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्या

एका बाजूला पंतप्रधान मोदींसह भाजपच्या आघाडीच्या नेत्यांच्या तुफानी सभा आणि दुसरीकडे एकट्या ममता बॅनर्जी. पश्चिम बंगाल निवडणूक 2021 ची ही लढत होती. एकापाठोपाठ एक शेकडो छोटे-मोठे नेते टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश करत होते. निवडणुकीपूर्वी दोन्ही बाजूंनी वातावरण तापले होते, मात्र मतदानाच्या काही दिवस आधी ममता बॅनर्जी जखमी झाल्या. यानंतर ममता बॅनर्जी व्हीलचेअरवरून प्रचारात उतरल्या आणि निवडणुकीचे सारे समीकरणच बदलून गेले. 2 मे रोजी मतमोजणी झाली आणि सलग तिसर्‍यांदा ममता बॅनर्जींनी गडावर मुसंडी मारली. सरकार स्थापनेचा दावा करणाऱ्या भाजपची संख्या दुहेरी आकड्यात 77 झाली.

N- Nagaland हत्याकांड

4 डिसेंबर ही गोष्ट आहे. नागालँडच्या मोन जिल्ह्यात एका जीपमधून आठ जण प्रवास करत होते. समोरून येणाऱ्या लष्कराच्या वाहनाने जीपवर गोळीबार सुरू केला. या अयशस्वी लष्करी कारवाईदरम्यान आणि नंतर, प्रतिक्रियेत 14 नागरिक आणि एक सैनिक ठार झाला.

O- Olympic मध्ये सुवर्णपदक

P- Punjab Congress मध्ये संकट

काँग्रेस नेत्यांनी स्वत:ला आणि पक्षाला अडचणीत आणणे ही काही नवीन गोष्ट नाही. 2021 मध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांची बारी होती, ज्यांना खूप मजबूत मानले जात होते. नवज्योतसिंह सिद्धू या फलंदाजाने कर्णधाराविरुद्ध असे षटकार आणि चौकार मारले की, कर्णधाराला केवळ कर्णधारपद सोडावेच लागले नाही, तर नवीन संघही तयार करावा लागला. त्यांच्या संघाला भाजपची बी टीम म्हटले जात असले तरी. काँग्रेसने पंजाबची कमान सिद्धूकडे सोपवली. त्यानंतर चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री करण्यात आले. राजकारणातील खेळाडूंनी याला काँग्रेसचा मास्टर स्ट्रोक म्हटले. खरं तर, चन्नी हे दलित आहेत आणि पंजाबच्या लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोक या समाजातून येतात.

Q- Quad नेत्यांची वॉशिग्टनमध्ये बैठक

अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर अवघ्या एक महिन्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि यूएस - QUAD च्या नेत्यांची बैठक संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत होती. इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनच्या वाढत्या वर्चस्वाचा मुकाबला करणारी संस्था म्हणून QUAD कडे पाहिले जात असल्याने या बैठकीला महत्त्व आहे.

R- Rafale भारतात पोहोचले

राफेल गेल्या अनेक वर्षांपासून सतत चर्चेत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर विरोधकांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, पण सरकार मागे हटले नाही किंवा करार रद्द झाला नाही. 2020 मध्ये, 8 ऑक्टोबर रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह फ्रान्समध्ये राफेलच्या भूमिपूजनासाठी गेले होते. त्यानंतर बरोबर 9 महिने आणि 21 दिवसांनी 5 राफेलची पहिली खेप 29 जुलै रोजी भारतात पोहोचली. भारताने फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशनशी 59,000 कोटी रुपयांच्या 36 विमानांच्या खरेदीसाठी करार केला आहे. भारतीय लष्कराच्या सामर्थ्यासाठी आणि सुरक्षेसाठी राफेल अत्यंत महत्त्वाचे आहे.

S- Sidharth Shukla चा मृत्यू

देशातील प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे 2 सप्टेंबर रोजी वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 12 सप्टेंबर 1980 रोजी मुंबई येथे जन्मलेल्या सिद्धार्थने अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केले. त्यांना प्रथम बालिक वधू मधून प्रसिद्धी मिळाली. याशिवाय त्याने 2020 मध्ये टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन-13 जिंकला.

T- Taliban चा अफगानिस्तानवर कब्जा

2 मे 2021 रोजी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेण्याची घोषणा केली. यानंतर तालिबानने आपली लढाई तीव्र केली. ऑगस्टपर्यंत तालिबानने अफगाणिस्तानवर पूर्णपणे ताबा मिळवला होता. राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी पळून गेले. तालिबानी दहशतवाद्यांनी त्याचे कार्यालय ताब्यात घेतले.

U- Uttrakhand मध्ये महापूर

2021 मध्ये उत्तराखंडमध्ये तीन मोठ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये शेकडो लोक मरण पावले आणि अनेक बेपत्ता झाले. फेब्रुवारी 2021 मध्ये, नंदा देवी हिमनदीचा काही भाग तुटल्यानंतर चमोली जिल्ह्यात हिमस्खलन आणि तीव्र पुरामुळे 200 हून अधिक लोक ठार झाले किंवा बेपत्ता झाले.

V- Vaccine च्या रूपात मिळाली संजीवनी

कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयावह काळात भारताला 2021 मध्ये लसीच्या रूपात संजीवनी मिळाली. सुरुवातीला बहुतेक लोक लस घेण्यास कचरत होते. लोकांमध्ये कुठेतरी भीतीचे वातावरण होते. नंतर पंतप्रधानांनीही लस घेतली. यानंतर जास्त जनजागृती झाली.

W- Wildfires जगभरातील जंगलांमध्ये आग

2021 मध्येही जगाला अनेक जंगलांमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या संकटाचा सामना करावा लागला होता. एकट्या यूएसमध्ये 2021 मध्ये 7.6 दशलक्ष एकर जंगल आगीमुळे नष्ट झाले, जे 2020 च्या तुलनेत 26 लाख एकर कमी आहे. डिक्सी, कॅलिफोर्निया येथे लागलेली आग ही 2021 मधील सर्वात मोठा वणवा होता ज्याने 9 लाख 60 हजार एकर जंगल क्षेत्र नष्ट केले.

X- Xi जिनपिंग यांची ताकद वाढली

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी 2021 मध्ये आपले स्थान अभेद्य केले. त्यांनी चिनी कम्युनिस्ट पक्षावर आपली पकड आणखी मजबूत केली. नोव्हेंबरमध्ये, कम्युनिस्ट पक्षाने 40 वर्षांमध्ये प्रथमच पारित केलेल्या आपल्या 'ऐतिहासिक ठराव पत्र' मध्ये ज्यामध्ये शी जिनपिंग यांचे नेतृत्व चीनच्या उदयात महत्त्वाचे आहे असे म्हटले.

Y- Yediyurappa यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला

बीएस येडियुरप्पा हे 26 जुलै 2021 रोजी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन चर्चेत होते. दोन वर्षे या पदावर असलेले 78 वर्षीय येडियुरप्पा यांनी पक्षांतर्गत टीकेनंतर राजीनामा दिला होता. मात्र, भाजपचे आभार मानून मी स्वत: पद सोडले आहे, असे ते म्हणाले.

Z- Zojila टनल

सप्टेंबर 2020 मध्ये, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जोजिला बोगद्याच्या पश्चिमेकडील पोर्टलची पाहणी केली. झोजिला बोगद्याचे बांधकाम प्रजासत्ताक दिन 2024 पर्यंत पूर्ण होईल, अशी घोषणा गडकरींनी केली. 14.15 किमी लांबीचा झोजिला बोगदा (बोगदा) हा भारतातील सर्वात लांब रोड टनल आणि आशियातील सर्वात लांब द्वि-दिशात्मक टनल असेल.

बातम्या आणखी आहेत...