आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • According To A Study By The International Institute Of Population Sciences, The Trend Of Female Feticide Is Declining.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बदल:एकाच मुलीवर कुटुंब नियोजन करणाऱ्यांची संख्या तीन दशकांत झाली दुप्पट, अशी कुटुंबं उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न

मुकेश कौशिक | नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेसचा अभ्यास, ‘कुलदीपक’च हवा हा ट्रेंड घटतोय
  • मुलगाच हवा असा अट्टाहास असलेल्या हरियाणा, पंजाब या राज्यांतही बदलली मानसिकता

देशाच्या मानसिकतेत काही वर्षांत सकारात्मक बदल झाले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे भारतीय कुटुंबांत मुलगाच हवा हा अट्टाहास कमी झाल्याचे चित्र आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेसच्या संशोधनातील निष्कर्षांतून या मूलभूत बदलाचे संकेत मिळाले आहेत. संशोधनाचे नेतृत्व करणारे मुंबईच्या लोकसंख्याशास्त्र संस्थेचे प्रा. हरिहर साहू यांनी सांगितले की, १९९२ ते २०१६ पर्यंतच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात सहभागी ८ लाख ८८ हजार कुटुंबांतील ९ लाख ९९ हजार विवाहित महिलांशी झालेल्या चर्चेतून हा निष्कर्ष समोर आला. या कुटुंबांचे वर्गीकरण ग्रामीण आणि शहरी तसेच निरक्षर, प्राथमिक, उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षण, धार्मिक आणि जातीय आधारावर करण्यात आले. सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, दोन मुली आणि मुलगा नसलेल्या ३३.६% घरांत कुटुंब नियोजनाच्या पद्धतींचा अवलंब झाला किंवा कुटुंब दोन मुलींपुरतेच सीमित ठेवण्याचा निर्णय झाला. फक्त मुली असलेले कुटुंबच उच्च शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्याचा या तीन दशकांतील शोधाचा महत्त्वाचा निष्कर्ष आहे. आमच्या विश्लेषणातील निष्कर्षांनुसार, १९९२ मध्ये फक्त मुली असलेल्या १६% दांपत्यांनीच कुुटुंब नियोजनाच्या स्थायी पर्यायाचा अवलंब केला होता. तीन मुली असलेल्या आणि मुलगा नसलेल्या २०% दांपत्यांनीच हा मार्ग अवलंबला होता. पण, ३० वर्षांनंतर हा आकडा ३४% पर्यंत पोहोचला. एक मुलगा व्हावा ही इच्छा पूर्ण झाली नसली तरी कुटुंब नियोजनाचा कायमस्वरूपी मार्ग अवलंबण्याची इच्छा नसलेल्या महिलांची संख्या जास्त आहे. दोन मुले असलेल्या आणि मुलगी नसलेल्या ६०% दांपत्यांनीच नसबंदी केली होती.

गावांच्या तुलनेत शहरांमध्ये एक मुलगी असलेली कुटुंबे २५% जास्त

> अल्पशिक्षित कुटुंबांच्या तुलनेत उच्च शिक्षित कुटुंबांत फक्त मुलीच असलेले कुटुंब मर्यादित ठेवण्याची इच्छा १.६ ते २.२ पट जास्त आढळली.

> शहरांच्या तुलनेत गावांत राहणाऱ्या दांपत्यांत फक्त मुलीपर्यंतच कुटुंब मर्यादित ठेवण्याची इच्छा २५% कमी.

> महाराष्ट्र, केरळ आणि प. बंगालच्या मुस्लिम कुुटुंबांत हिंदूंच्या तुलनेत फक्त मुली असलेली कुटुंबं अनुक्रमे २६%, ३५% आणि ३७% कमी आढळली.

> महाराष्ट्रात एक मुलगी असलेली कुटुंबं २६%, दोन मुलींची कुटुंबं ६३.४% आणि तीन मुलींची कुटुंब ७१.५% आहेत.

१० वर्षांत या राज्यांत झाली सर्वाधिक वाढ

राज्य वाढ

> केरळ 16.5%

> तामिळनाडू 10.8%

> हरियाणा 20%

> महाराष्ट्र 10%

> पंजाब 8%

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser