आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनर1000 गर्लफ्रेंडस बनवल्या, 300 पुस्तके लिहिली:कोण आहे अदनान ओख्तार? ज्याला मिळाली 8,658 वर्षांची शिक्षा

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'अदनानच्या संघटनेत एक गुप्त सेल यंत्रणा होती. त्यामुळे इतकी वर्षे तिथे काय चालत होते, हे कोणालाच कळले नाही. अदनानने 7 ते 17 वर्षे वयोगटातील अनेक अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले. 2016 पासून पोलिसांनी अदनानच्या घरावर आणि संस्थेवर छापे टाकले, पण काहीही सापडले नाही. 2017 मध्ये मी कशीतरी तिथून निसटले.'

तुर्कीचा कथित धर्मगुरू नेता अदनान ओख्तारच्या संघटनेशी संबंधित एका मुलीचे हे वक्तव्य आहे. अदनानला तुर्की न्यायालयाने 8,658 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

दिव्य मराठी एक्सप्लेनरमधून जाणून घेऊया की, अदनान ओख्तार कोण आहे आणि तो असे काय करत होता की त्याला 8,658 वर्षांची शिक्षा झाली…

मॉडर्न मुलींना सोबत घेऊन धर्मोपदेश द्यायचा

अदनान ओख्तार तुर्कीमध्ये एक धर्मगुरू म्हणून ओळखला जातो, जो टेलिव्हिजनवर इस्लामिक आणि पारंपरिक मूल्यांची शिकवण द्यायचा. अदनान स्वतः आधुनिक कपडे परिधान करायचा आणि तो टीव्हीवर कमी कपड्यांतील मुलींनी वेढलेला दिसायचा.

अदनानने 1980 मध्ये धार्मिक वक्ता म्हणून करिअरला सुरुवात केली होती. अनेक वर्षे धार्मिक उपदेश दिल्यानंतर अदनानने अदनानसिलर नावाची संघटना स्थापन केली. मुस्लिम विद्वान सैद नुरसी यांचे धार्मिक विचार लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्याचा उद्देश होता.

सैद नुरसी हे इस्लामला विज्ञानात मिसळून पुढे नेण्याच्या बाजूने होते. सैद नुरसींच्या या विचारांनी तुर्कीमध्ये नवी इस्लामी चळवळ आली आणि अनेक लोक या संघटनेत सामील झाले.

अदनान ओख्तार याने हारून याह्या नावाने इस्लामिक मूल्यांवर 300 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. अदनानने 1990 मध्ये सायन्स रिसर्च फाउंडेशनची सुरुवात केली. त्याने डिझायनर्सकडून मुलींसाठी आधुनिक इस्लामिक कपडे बनवले आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

अदनान म्हणायचा- मुस्लिम महिलांनी आधुनिक कपडे परिधान केले पाहिजे

2011 मध्ये अदनानने सांगितले की कुराणमध्ये हिजाबचा उल्लेख नाही. तुर्कीनेही महिलांच्या केसांच्या पुढे जात आधुनिक कपड्यांचा स्वीकार केला पाहिजे. यामुळे प्रभावित होऊन सुशिक्षित आणि श्रीमंत मुलीही अदनानला येऊन मिळाल्या.

2011 मध्ये अदनानने एक टीव्ही चॅनल A9 सुरु केले. या चॅनलवर मॉडर्न कपडे आणि बिकिनी घातलेल्या मुली अदनानसोबत धर्म आणि राजकारणावर चर्चा करत पॉप संगीतावर नृत्यही करायच्या.
2011 मध्ये अदनानने एक टीव्ही चॅनल A9 सुरु केले. या चॅनलवर मॉडर्न कपडे आणि बिकिनी घातलेल्या मुली अदनानसोबत धर्म आणि राजकारणावर चर्चा करत पॉप संगीतावर नृत्यही करायच्या.

2018 मध्ये अटक झाल्यानंतर अनेक गुपिते उघडली

2018 मध्ये तुर्की पोलिसांनी त्याच्या व्हिलावर छापा टाकला होता. इस्लाम धर्माचा प्रचार करण्याच्या नावाखाली तो गुन्हेगारी टोळी चालवायचा असा खुलासा यानंतर झाला. अदनान आणि त्याच्या अनुयायांना अटक करण्यात आली आणि त्याचे टीव्ही चॅनल A9 देखील बंद करण्यात आले.

ऑस्ट्रेलियन मीडिया टाऊन्सव्हिले बुलेटिननुसार, या संस्थेमध्ये अदनानने 1000 हून अधिक मुलींना लैंगिक गुलाम बनवून त्यांचे लैंगिक शोषण केले.

मासिक पाळीच्या समस्या आणि त्वचेच्या समस्या दूर करण्याच्या बहाण्याने या मुलींना अदनानने जबरदस्तीने गर्भनिरोधक गोळ्या दिल्या होत्या. पोलिसांना तपासादरम्यान अदनानच्या घरात 69,000 हून अधिक गर्भनिरोधक गोळ्या सापडल्या.

धर्मगुरू अदनानच्या अंधाऱ्या दुनियेत आणखी काय घडायचे?

एका मेंबरने टीआरटी वर्ल्डला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की अदनानने तरुण इस्लामिक पिढीवर स्त्रीवादी आणि सृजनवादी सिद्धांताचा प्रभाव पाडला. अनेक सुशिक्षित लोक अदनानला येऊन मिळू लागले. अदनानच्या पुस्तकांनीही लोकांना आकर्षित केले.

त्याच्या सिद्धांतात इस्लामला अधिक उदारमतवादी बनवण्याचा उल्लेख होता. त्याच्या ग्रुपमधील एका सदस्याने सांगितले की, अदनान ग्रुपमधील सदस्यांना सामान्य जीवनापासून पूर्णपणे तोडून टाकत असे. त्याला कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला भेटण्याची आणि ग्रुपच्या बाहेर जाण्याची परवानगी नसायची. या संघटनेत लैंगिक गुन्ह्यांसह टेरर फंडिंग आणि गुन्हेगारी कारवायाही होत होत्या.

या सदस्याने सांगितले की अदनानला संपूर्ण जग एक लेखक आणि स्त्रीवादी म्हणून ओळखते, जो इस्लाममध्ये महिलांच्या स्वातंत्र्य आणि अधिकारांबद्दल बोलतो. तो आमचे लैंगिक शोषण करायचा.

अदनानच्या ग्रुपमधील एका सदस्याने सांगितले की, ती कशी तरी संघटनेतून निसटली. जे पळून जायचे, अदनान त्यांची बदनामी करून त्यांचे जगणे कठीण करून टाकायचा. तो पॅम्प्लेट्स काढायचा आणि त्यांच्यासारखे बनू नका अशी धमकी द्यायचा. अदनानची राजकारणावरही मजबूत पकड होती.

अदनानसोबत काम करणाऱ्या मॉडेलने काय सांगितले?

अदनानच्या संघटनेची माजी मॉडेल एब्रू सिमसेक म्हणाली, 'अदनानची संस्था सोडल्यामुळे मला खूप त्रास दिला गेला आणि माझ्यावर मानहानीचे 300 खटले दाखल करण्यात आले.'

सिमसेक म्हणाली, 'अदनान ओख्तारने मला टीव्हीवर पाहिले आणि तो माझ्यासाठी वेडा झाला. 'मी तुला वर्तमानपत्रात आणि टीव्हीवर पाहिलं, मला तू खूप आवडलीस, तुझे कपडे घे आणि माझ्या आलिशान महालात माझ्यासोबत राहा,' असे तो म्हणाला.

'इकडे ये, मी तुला चांगल्या स्थितीत ठेवतो. तु उत्तम ब्रँड्स परिधान करशील, तुझे जीवन सुखकर होईल. मला वाटले त्याचा धर्माशी काही संबंध नव्हता.'

अदनानच्या ग्रुपमध्ये काम करणारी आणखी एक मुसगी सीलन ओझ्गुल म्हणाली, 'मी वयाच्या 17 व्या वर्षी या संस्थेत सामील झाले. त्यावेळी A9 वाहिनीला दोन वर्षे झाली होती. 2013 मध्ये मी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण मी पकडले गेले. तिथं राहणं तुरुंगात राहण्यासारखं होतं किंवा त्याहून वाईट.'

अदनानला 8,658 वर्षांची शिक्षा कशी झाली?

जानेवारी 2021 मध्ये अदनानला 10 वेगवेगळ्या आरोपांनुसार 1075 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यामध्ये गुन्हेगारी टोळ्या चालवणे, राजकीय आणि लष्करी सत्तांतरात भाग घेणे, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, बलात्कार, ब्लॅकमेल आणि अत्याचार यांचा समावेश आहे.

अदनानला अटक करून घेऊन जाताना इस्तंबूल पोलिस.
अदनानला अटक करून घेऊन जाताना इस्तंबूल पोलिस.

तुर्कीचे निर्वासित धर्मगुरू फेतुल्ला गुलेन यांच्याशी संबंध असल्याचाही त्याच्यावर आरोप होता. गुलेनवर तुर्कीमध्ये 2016 च्या अयशस्वी लष्करी बंडाचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे. यात 251 लोक मारले गेले आणि 2,000 हून अधिक जखमी झाले होते.

नंतर, उच्च न्यायालयाने अदनानविरुद्धचा निकाल रद्द केला आणि पुन्हा खटला चालवण्याचे आदेश दिले. या वर्षी सप्टेंबरमध्ये अदनान पुन्हा कोर्टात खटल्यासाठी हजर झाला.

याच प्रकरणात, इस्तंबूल उच्च गुन्हेगारी न्यायालयाने 17 नोव्हेंबर रोजी अदनान ओख्तारला धर्माच्या नावाखाली बेकायदेशीरपणे संस्था चालवणे, शिक्षण आणि लैंगिक अधिकारांचे उल्लंघन करणे, छळ करणे, वैयक्तिक डेटा चोरी करणे, गुन्हेगारी टोळी तयार करणे, राजकीय लोक आणि सैन्याची हेरगिरी केल्याबद्दल 8,658 वर्षांची शिक्षा सुनावली. याच प्रकरणात न्यायालयाने आणखी 10 दोषींना प्रत्येकी 8658 वर्षांची शिक्षा सुनावली.

अदनानला सुनावण्यात आलेली शिक्षा तुर्कीच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी शिक्षा आहे. यापूर्वी एका व्यक्तीला 9,803 वर्षे 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञांच्या चाचणीत अदनानला पॅरानॉइड स्कित्झफ्रेनिया नावाचा आजार असल्याचे समोर आले. हा एक प्रकारचा वेडेपणा आहे, म्हणजे मानसिक आजार ज्यामध्ये माणसाच्या मनात अनेक भ्रम असतात. तो स्वप्ने आणि वास्तव यात फरक करू शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...