आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Afghanistan Minerals Worth Rs 74 Lakh Crore; Resources Like Rare Earths, Lithium, Copper, Gold, Oil, Natural Gas

अफगाणिस्तानचा खजिना:तालिबानने काबिज केलेल्या देशात दडलीय 74 लाख कोटींची साधन संपत्ती; ...तर सर्वात श्रीमंत देश होऊ शकतो अफगाणिस्तान

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात गरीब राष्ट्रांपैकी एक म्हणून अफगाणिस्तानला कमी लेखले जात असले तरी प्रत्यक्षात या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्तीचे भांडार आहेत. या देशात एक ट्रिलियन डॉलर अर्थात तब्बल 74.37 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त साधन संपत्ती आहे. 2010 मध्ये अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी एका सर्व्हेमध्ये याचा खुलासा केला होता.

अमेरिकन अधिकाऱ्यांच्या सर्व्हेनुसार, अफगाणिस्तानच्या मध्य आणि दक्षिणेकडील भागांमध्ये एक ट्रिलियन डॉलरची नैसर्गिक साधन संपत्ती आहे. याचा योग्य वापर झाल्यास अख्ख्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट होईल. आता तालिबानने देश काबिज केल्यानंतर तज्ज्ञांच्या चिंता वाढल्या आहेत.

लोह, तांबे, कोबाल्ट आणि सोन्याचे भांडार
तज्ज्ञांच्या मते, अफगाणिस्तानात लोह, तांबे, कोबाल्ट, सोने आणि लीथियमचे भांडार आहेत. अफगाणिस्‍तानात असलेल्या या मिनरल्सचा साठा इतर कुठल्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक दुर्मिळ आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात या साधनसामुग्रीची खूप मागणी आहे. याच्याच मदतीने मोबाइल फोन, टीव्ही, हायब्रिड इंजन कार, काँप्युटर, लेझर आणि बॅटरी तयार केल्या जाऊ शकतात.

जियोलॉजिकल सर्व्हेनुसार, अफगाणिस्तानात जेवढे लीथियमचे भांडार जगात कुठेच नाहीत. लीथियमने रिचार्जेबल बॅटरी प्रामुख्याने बनवल्या जातात. हवामान बदल रोखण्यासाठी हे एक महत्वाचे तंत्रज्ञान आहे.

तालिबान आल्याने परिस्थिती सुधारणार नाही
इकोलॉजिकल फ्यूचर्स ग्रुपचे संस्थापक संशोधक आणि संरक्षण तज्ज्ञ रॉड शूनोवर यांनी सांगितले, सुरक्षेची आव्हाने, पायाभूत सुविधांचा आभाव आणि दुष्काळाने ही साधन संपत्ती अद्याप काढण्यात आलेली नाही. आता अफगाणिस्तानात आता तालिबानी राजवट आल्याने परिस्थिती सुधारणार नाही. लोह आणि तांब्याच्या बाबतीत हा जगातील सर्वात मोठा निर्यातक देश होऊ शकतो. तालिबानचे समर्थन करणाऱ्या चीनसारख्या देशांची यावरच नजर आहे.

सर्वात धनाढ्य देश होऊ शकतो अफगाणिस्तान
अमेरिकन जियोलॉजिकल सर्व्हेचे मिर्झाद यांनी 2010 मध्ये एका मासिकाला याबाबत माहिती दिली होती. काही वर्षे जरी अफगाणिस्तानात शांतता नांदली, तर साधन सामुग्रीच्या बळावर हा देश जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक बनू शकतो.

सध्या 3 देश पुरवतात 75% लीथियम-कोबाल्ट
संपूर्ण जगाचा विचार केल्यास लीथियम, कोबाल्टसारखे अतिशय दुर्मिळ घटकांचे 75% उत्पादन केवळ 3 राष्ट्र करतात. त्यामध्ये चीन, रिपब्लिक ऑफ कांगो आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे.

लीथियम, निकल व कोबाल्टने बनतात बॅटरी
इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या अहवालानुसार, इलेक्ट्रिक कारसाठी सरासरी 6 पट अधिक घटक लागतात. लीथियम, निकल आणि कोबाल्ट हे धातू बॅटरी बनवण्यासाठी वापरले जातात. कॉपर आणि अलुमीनियम इलेक्ट्रिसिटी नेटवर्क बनवण्यासाठी कामी येतात. तर विंड टर्बाइनशी संबंधित कामांकरिता दुर्मिळ धातूंची आवश्यकता असते.

बातम्या आणखी आहेत...