आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Afghanistan Taliban Capture Area Map 2021; Afghanistan War | How Taliban Took Afghanistan? What It Means For India And US

एक्सप्लेनर:अफगाणिस्तान तालिबानच्या तावडीत जाण्याची संपूर्ण कहाणी,  जाणून घ्या 104 दिवसांत 77 हून 304 जिल्ह्यांवर कसा मिळवला तालिबान्यांनी ताबा

जयदेव सिंह2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घ्या सविस्तर...

काबूलवर कब्जा केल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानावर जवळजवळ ताबा मिळवला आहे. 300 हून अधिक जिल्हे तालिबानच्या तावडीत सापडले आहेत। पश्तो बंडखोरांची ही संघटना अफगाणिस्तानच्या पश्तो बहुसंख्य लोकसंख्येला समर्थन देणारी देखील मानली जाते. हेच कारण आहे की गेल्या तीन महिन्यांत या संघटनेच्या ताब्यात असलेल्या शहरांची संख्या 77 वरून 304 झाली आहे. तालिबानने आता देशातील 75% क्षेत्रावर नियंत्रण मिळवले आहे.. देशातील 34 पैकी 18 प्रांतांची राजधानी आता तालिबानच्या ताब्यात आहे.

खरं तर, अमेरिका आणि नाटो देशांच्या सैन्याने या वर्षी मे महिन्यात अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यास सुरुवात केली. तेव्हापासून अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये तालिबानचा प्रभाव वाढू लागला. मात्र, अनेक महिन्यांनंतरही अफगाणिस्तानातील प्रमुख आणि महत्त्वाची शहरे तालिबानच्या ताब्यात आली नव्हती. कंधार ताब्यात आल्यानंतर तालिबानची पकड मजबूत झाली आहे. तालिबानने गेल्या 10 दिवसांत 22 शहरांवर कब्जा केला आहे.

या संघर्षात आतापर्यंत काय झाले? या संघर्षाचा भारतावर आणि जगावर कसा परिणाम होईल? जाणून घेऊया ....

तालिबान्यांनी आतापर्यंत कोणते क्षेत्र काबिज केले आहे?

 • अफगाणिस्तानात एकूण 407 जिल्हे आहेत. यावर्षी 4 मे पासून तालिबानने आक्रमक लष्करी कारवाई सुरू केली. त्यावेळी देशातील 77 जिल्हे तालिबानच्या ताब्यात होते. त्याच वेळी, अफगाणिस्तान सरकारचे 129 जिल्ह्यांवर नियंत्रण होते. उर्वरित 194 जिल्ह्यांमध्ये दोन्ही बाजूंनी संघर्ष सुरू होता.
 • सुमारे दीड महिन्यानंतर म्हणजेच 16 जूनपर्यंत तालिबानच्या ताब्यात असलेल्या जिल्ह्यांची संख्या वाढून 104 झाली. त्याच वेळी, अफगाणिस्तान सरकारचे नियंत्रण केवळ 94 जिल्ह्यांमध्ये राहिले. 201 जिल्ह्यांमध्ये दोन्ही बाजूंनी संघर्ष सुरू होता. 17 जुलैपर्यंत तालिबानने अफगाणिस्तानच्या अर्ध्याहून अधिक भाग ताब्यात घेतला होता. 221 जिल्हे त्यांच्या ताब्यात आले होते. त्याच वेळी, अफगाणिस्तान सरकार 73 जिल्ह्यांपर्यंतच मर्यादित राहिले.
 • 12 ऑगस्टपर्यंत कंधारसह 242 जिल्हे तालिबानच्या ताब्यात आले होते. अफगाणिस्तान सरकारचे 65 जिल्ह्यांवरच नियंत्रण राहिले होते. 100 जिल्ह्यांमध्ये दोन्ही बाजूंनी संघर्ष सुरू होता. 15 ऑगस्ट रोजी काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली. राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडून पळ काढला.
 • 16 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 पर्यंत, तालिबानने 304 जिल्हे ताब्यात घेतले आहेत. 66 जिल्ह्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. त्याच वेळी, फक्त 37 जिल्हे आहेत जे सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत.
 • तालिबानने एकाच वेळी 34 राज्यांपैकी अनेक राज्यांची राजधानी काबीज केल्याची 20 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. यामध्ये जरांज, शबरघान, तालिकान, शेर-ए-पुल, कमर्शियल हब कुंदुज, ऐबक, फराह सिटी, पुल-ए-खुमरी आणि फैजाबाद यांचा समावेश आहे. आतापर्यंत 18 प्रांतांची राजधानी तालिबानच्या ताब्यात आली आहे.
 • जी शहरे आता अफगाणिस्तान सरकारच्या ताब्यात आहेत ती पूर्णपणे यंत्रणेपासून वेगळी झाली आहेत. तालिबानने त्यांचा वीज पुरवठा जवळजवळ खंडित केला आहे.
चार महिन्यांत तालिबानच्या तावडीत सापडला अफगाणिस्तान
चार महिन्यांत तालिबानच्या तावडीत सापडला अफगाणिस्तान

अफगाणिस्तान सरकारची स्थिती काय आहे?

 • सर्वप्रथम, अर्थमंत्री खालिद पेएंडा यांनी राजीनामा दिला आणि देश सोडून निघून गेले. त्यांनी फेसबुकवर याचे कारण अफगाणिस्तानच्या परिस्थितीपेक्षा त्यांची कौटुंबिक अडचण असल्याचे सांगितले होते. परंतु त्यांचे हे पाऊल अफगाणिस्तान सरकारच्या पराभवाची सुरुवात आहे, असे म्हटले गेले.
 • 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानचे सरकार कोलमडले, राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी हे देश सोडून पळाले.
 • अफगाणिस्तान सरकारकडे सर्व 34 प्रांतांची राजधानी आणि 407 जिल्हे काबीज करण्यासाठी पुरेसे सैन्यदेखील नव्हते. हे सरकार काही महिन्यांपूर्वीपर्यंत अमेरिका आणि नाटो देशांच्या सैनिकांच्या मदतीवर अवलंबून होते. हा आधार काढून टाकल्यानंतर त्यांच्यासमोरील अडचणी दररोज वाढत गेल्या.

तालिबान भारतासाठी आणि जगासाठी धोका आहे का?

 • अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तालिबान हा अफगाणिस्तानची लोकशाही, नागरी हक्क आणि प्रादेशिक सुरक्षेसाठी धोका आहे. या संघटनेने जगातील सर्वात शक्तिशाली सुरक्षा आघाडी नाटोचा सामना केला आहे. अशा परिस्थितीत त्यांचे मनोबल बऱ्यापैकी उंचावले आहे.
 • तालिबानवर नजर ठेवणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या 2021 च्या अहवालात म्हटले आहे की, या संघटनेचे दहशतवादी संघटना अल-कायदाशी मजबूत संबंध आहेत. अहवालानुसार, अल-कायदावर तालिबानची पकड मजबूत होत आहे. अल-कायद्याला संसाधने पुरवण्यापासून तालिबान प्रशिक्षणाची व्यवस्था करत आहे. अल-कायदाचे सुमारे 200 ते 500 दहशतवादी अजूनही अफगाणिस्तानात आहेत. त्यांचे अनेक नेते पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर लपले आहेत. अगदी अमेरिकेचे म्हणणे आहे की, अल-कायद्याचा प्रमुख अल-जवाहरीही येथे लपला आहे. पण 2020 मध्ये तो ठार झाल्याची अफवा होती.

अमेरिका, नाटो, अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान्यांनी गेल्या दोन दशकांत काय गमावले?

 • 2007 पासून सुरू असलेल्या संघर्षात सहा हजारांहून अधिक अमेरिकन सैनिक, एक हजारांहून अधिक नाटो सैनिक मारले गेले आहेत. या युद्धात सुमारे 47 हजार सामान्य लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्याच वेळी, सुमारे 73 हजार अफगाण सैनिक आणि पोलीस देखील मारले गेले. असे म्हटले जाते की, याकाळात 10,000 पेक्षा जास्त तालिबानी मारले गेले आहेत. तालिबानने गेल्या वीस वर्षात आपली पकड मजबूत केली आहे. त्यांच्याजवळ एक लाख सैनिक आहेत.
अफगाणिस्तानात सत्तेवर असलेल्या तालिबान संघटनेला 2001 मध्ये अमेरिकेने बाहेरचा रस्ता दाखवला होता. पण हळूहळू या संघटनेने स्वतःची पाळेमुळे पुन्हा देशात रोवली.
अफगाणिस्तानात सत्तेवर असलेल्या तालिबान संघटनेला 2001 मध्ये अमेरिकेने बाहेरचा रस्ता दाखवला होता. पण हळूहळू या संघटनेने स्वतःची पाळेमुळे पुन्हा देशात रोवली.

तालिबानची स्थापना कधी आणि कशी झाली?

 • अफगाण बंडखोरांनी 1980 च्या उत्तरार्धात आणि 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला संघटना स्थापन केली. हा तो काळ होता जेव्हा अफगाणिस्तान सोव्हिएत संघाच्या ताब्यात (1979 -89) होता. या बंडखोरांना अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयए आणि पाकिस्तानच्या आयएसआयने पाठिंबा दिला होता.
 • अफगाण बंडखोरांसह पश्तो आदिवासी विद्यार्थ्यांचाही यात सहभाग होता. हे लोक पाकिस्तानच्या मदरशांमध्ये शिकत असत. पश्तो भाषेत विद्यार्थ्यांना तालिबान म्हणून संबोधले जाते. येथून त्यांना तालिबान हे नाव मिळाले.
 • अफगाणिस्तानात पश्तून बहुसंख्य आहेत. देशाच्या दक्षिण आणि पूर्व भागात त्यांची चांगली पकड आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या उत्तर आणि पश्चिम भागात पश्तून बहुसंख्य आहेत.
 • सोव्हिएत संघाने अफगाणिस्तान सोडल्यानंतर तालिबान्यांना सुरुवातीला अफगाणिस्तानातील सामान्य लोकांचा पाठिंबा मिळाला. भ्रष्टाचारावर अंकुश, अराजकतेच्या परिस्थितीत सुधारणा, रस्तेबांधणी तसेच विशिष्ट पद्धतीची प्रशासन यंत्रणा उभारणे, लोकांना सुविधा पुरवणे यांसारख्या कामांमुळे सुरुवातीच्या काळात तालिबान संघटना लोकप्रिय झाली.
 • तालिबानने त्यांच्या प्रतिस्पर्धी मुजाहिदीन गटाशी चार वर्षांच्या लढाईनंतर अफगाणिस्तान ताब्यात घेतला होता. यासह, देशात कडक शरिया कायदा अस्तित्वात आला. तालिबानने 1994 मध्ये कंधारवर कब्जा केला. सप्टेंबर 1996 मध्ये काबूलवर कब्जा केल्यामुळे अफगाणिस्तानमध्ये तालिबानने पूर्ण नियंत्रण मिळवले. त्याच वर्षी तालिबानने अफगाणिस्तानला इस्लामिक राज्य म्हणून घोषित केले. मुल्ला मोहम्मद उमरला आमिर-अल-मोमिनिन म्हणजेच कमांडर बनवण्यात आले.
 • 1998 येता-येता सुमारे 90 टक्के अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला. याच दरम्यान तालिबानने शिक्षा देण्यासाठी इस्लामिक पद्धतीचे कायदे देशात लागू केले. यामध्ये हत्या आणि अत्याचाराचे आरोप असलेल्या दोषींना सार्वजनिकरित्या फासावर लटकवणे, चोरीच्या प्रकरणातील दोषींचे अवयव कापणे, अशा प्रकारच्या शिक्षांचा समावेश होता. पुरुषांनी दाढी वाढवणे आणि महिलांनी संपूर्ण शरीर झाकणाऱ्या बुरख्याचा वापर करणं अनिवार्य करण्यात आले. तालिबानने टीव्ही, संगीत आणि सिनेमा यांच्यावर बंदी घातली. 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलींनी शाळेत जाण्यावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर तालिबानवर मानवाधिकाराचे उल्लंघन आणि सांस्कृतिक गैरवर्तणुकीशी संबंधित अनेक आरोप होऊ लागले.
बातम्या आणखी आहेत...