आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानचे झाले अफगाणिस्तान; आता पुढे काय? तालिबान्यांना काय हवे आहे? अफगाणिस्तानचे लोक का घाबरले आहेत?

रवींद्र भजनी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अफगाणिस्तानात काय घडले आणि पुढे काय होणार आहे ते समजून घेऊया-

अफगाणिस्तानमधील युद्ध दोन दशकांपासून सुरु आहे. अमेरिकन सैन्याने माघार घेण्याच्या दोन आठवड्यापुर्वीच रविवारी तालिबानने राजधानी काबूलवर कब्जा केला. अमेरिकन सैन्याची माघार 1 मे पासून सुरू झाली आणि तेव्हापासून तालिबानही सक्रिय झाला. त्याने एक एक करून मोठी शहरे काबीज केली आणि काबूल ताब्यात घेऊन त्याने संपूर्ण देशाचा ताबा मिळवला. अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांनी अफगाणिस्तानात सैन्य उभे केले होते. लाखो डॉलर्स खर्च करून ते लष्करी उपकरणांनी सुसज्ज होते. पण हे सर्व काही व्यर्थ गेले.

अफगाणिस्तानात काय घडले आणि पुढे काय होणार आहे ते समजून घेऊया-

अफगाणिस्तानात काय चालले आहे?

तालिबान हा एक अतिरेकी गट आहे. 1990 च्या उत्तरार्धातच त्याने देशावर राज्य केले होते. तो आता अफगाणिस्तानातील एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास आला आहे आणि त्याने देशाचा ताबा मिळवला आहे.

2001 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानात हल्ले सुरू केले. अतिरेक्यांना सत्तेतून बेदखल केले गेले. यानंतर अमेरिकन सैनिक तेथून परत आले नाहीत. दोन दशक तिथेच लढा देत राहिले. अमेरिका आणि त्याच्या सहयोगी नाटो सैन्याने काबूल सोडण्याची तयारी केली तेव्हा पाश्चिमात्य देशांच्या पाठिंब्याने 20 वर्षांपासून सत्तेत असलले सरकार पायउतार झाले. आता अफगाण लोकांना त्यांचे भविष्य अंधारात दिसत आहे. ते अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी विमानतळाच्या दिशेने धावत आहेत. त्यांना या देशातून बाहेर पडण्याचा हाच शेवटचा मार्ग म्हणून दिसतोय.

हे छायाचित्र 15 ऑगस्टचे आहे. अमेरिकेच्या हवाई दलाच्या सी -17 ग्लोबमास्टर III वाहतूक विमानात अफगाणिस्तानातून कतारकडे उड्डाण करणारे 640 लोक दिसत आहेत. एखाद्या बस स्थानकासारखे चित्र यावेळी विमानतळावर निर्माण झाले होते.
हे छायाचित्र 15 ऑगस्टचे आहे. अमेरिकेच्या हवाई दलाच्या सी -17 ग्लोबमास्टर III वाहतूक विमानात अफगाणिस्तानातून कतारकडे उड्डाण करणारे 640 लोक दिसत आहेत. एखाद्या बस स्थानकासारखे चित्र यावेळी विमानतळावर निर्माण झाले होते.

लोक अफगाणिस्तानातून का पळून जात आहेत?

अफगाण लोकांना चिंता अशी आहे की, तालिबानच्या हातात सत्ता आल्याने पुन्हा अराजकाचे वातावरण होईल. अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या सरकारमध्ये काम करणाऱ्यांचा सूड घेतला जाईल.

अनेकांना भीती आहे की, तालिबान कठोर इस्लामिक कायदे लागू करतील. 1996 ते 2001 दरम्यान त्यांनी आपल्या राजवटीत तत्सम कायदे अंमलात आणले होते. याच दरम्यान तालिबानने शिक्षा देण्यासाठी इस्लामिक पद्धतीचे कायदे देशात लागू केले. यामध्ये हत्या आणि अत्याचाराचे आरोप असलेल्या दोषींना सार्वजनिकरित्या फासावर लटकवणे, चोरीच्या प्रकरणातील दोषींचे अवयव कापणे, अशा प्रकारच्या शिक्षांचा समावेश होता. पुरुषांनी दाढी वाढवणे आणि महिलांनी संपूर्ण शरीर झाकणाऱ्या बुरख्याचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले होते. तालिबानने टीव्ही, संगीत आणि सिनेमा यांच्यावर बंदी घातली होती. 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलींनी शाळेत जाण्यावर बंदी घालण्यात आली. महिलांना घराबाहेर पडताना पुरुष नातेवाईकाला सोबत न्यावे लागत असे.

पण मगाील काही वर्षांत तालिबानने स्वतःचा मॉडरेट चेहरा दाखवला आहे. ते सूड घेणार नाही असेही म्हटले आहे. तरीदेखील अफगाण लोकांचा तालिबानवर विश्वास नाही.

अफगाणिस्तानमधील लोक फ्रेंडशिप गेटमधून पाकिस्तानला जात आहेत. सुमारे 10 हजार अफगाण नागरिक या मार्गाने पाकिस्तानात पोहोचले आहेत.
अफगाणिस्तानमधील लोक फ्रेंडशिप गेटमधून पाकिस्तानला जात आहेत. सुमारे 10 हजार अफगाण नागरिक या मार्गाने पाकिस्तानात पोहोचले आहेत.

तालिबान सध्या अफगाणिस्तानला टेकओव्हर का करत आहे?
याचे एक मोठे कारण म्हणजे अमेरिकन सैन्य या महिन्याच्या अखेरीस म्हणजे ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानातून बाहेर पडेल. अमेरिकन सैन्याची माघार मे महिन्यात सुरू झाली होती.

अमेरिकेने 11 सप्टेंबर 2001 रोजी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांविरोधात वॉर ऑन टेरर म्हणजे दहशतवादाविरुद्ध युद्ध सुरू केले होते. या हल्ल्याला जबाबदार असलेल्या अल-कायदावर तालिबानने कारवाई केली नाही. एवढेच काय, तर त्याला पाठिशी घातले. याचा राग म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला. काही महिन्यांतच तालिबान्यांना देशातून हद्दपार करण्यात आले. अमेरिकेला सततचे युद्ध आणि देशाची पुनर्बांधणी करणे खूप अवघड झाले.

जेव्हा अमेरिकेचे लक्ष इराककडे गेले तेव्हा तालिबान पुन्हा इथे सक्रिय झाला. गेल्या काही वर्षांत त्याने अफगाणिस्तानचे अनेक प्रांत काबीज केले होते.

गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याची घोषणा केली होती. त्याने तालिबानशी करारही केला. तालिबानविरुद्ध मर्यादित लष्करी कारवाईवर ते सहमत झाले. यानंतर, राष्ट्राध्यक्ष झालेल्या जो बायडेन यांनी ऑगस्टच्या अखेरीस अमेरिकन सैन्य परत येत असल्याची घोषणा केली.

ही तारीख जवळ येता येता तालिबानने त्यांचे हल्ले तीव्र केले आणि ते वेगाने आपले पाय पसरु लागले. रविवारी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूल ताब्यात घेऊन आपले वर्चस्व सिद्ध केले.

अफगाणिस्तानात अडकलेल्या ब्रिटिशांची सुटका करण्यासाठी ब्रिटिश सैन्याची एक तुकडी लंडनहून काबूलला रवाना झाली.
अफगाणिस्तानात अडकलेल्या ब्रिटिशांची सुटका करण्यासाठी ब्रिटिश सैन्याची एक तुकडी लंडनहून काबूलला रवाना झाली.

अफगाण सैन्याने तालिबानचा सामना का केला नाही?

याचे संक्षिप्त उत्तर म्हणजे भ्रष्टाचार. म्हणूनच 70-80 हजार तालिबानी अफगाणिस्तान लष्कराच्या 3 लाख सैनिकांवर भारी पडले.

अमेरिका आणि नाटोच्या मित्र राष्ट्रांनी अफगाण सुरक्षा दलांना प्रशिक्षण देण्यासाठी मागील दोन दशकांत अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत. तीन लाखांहून अधिक अफगाण सैनिक, अब्जावधी डॉलरची शस्त्रे अफगाण सैनिकांकडे होती. तालिबानपेक्षा अफगाणिस्तानच्या सैनिकांची कुमक आणि शस्त्रसज्जता किमान कागदावर तालिबानपेक्षा अधिक होती. मात्र, भ्रष्टाचार, अनुभवहीन नेतृत्व, प्रशिक्षणाचा अभाव आणि दीर्घ काळापासून सुरू असलेल्या संघर्षामुळे ढासळलेले नीतीधैर्य या अफगाण सैनिकांच्या कमकुवत बाजू होत्या. पाश्चिमात्य देशांच्या पाठिंब्याने स्थापन झालेल्या सरकारने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. कमांडरांनी परदेशी पैशाचा फायदा घेतला आणि सैनिकांची संख्या वाढवून सांगितली.

अमेरिकेची सैन्य मागे घेण्याच्या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली, तेव्हा अफगाण सैन्य निराश झाले.अफगाणिस्तानच्या सैनिकांनी सुरुवातीला दक्षिणेकडील लष्कर गाहसारख्या ठिकाणी तालिबानशी लढा देण्याचा नेटाने प्रयत्न केला. मात्र, या वेळी त्यांना अमेरिकेच्या हवाई हल्ल्याचे आणि लष्कराचे साह्य नव्हते. संख्येने लहान असले, तरी अधिक संघटित आणि मूलतत्त्ववादी भावनेने प्रेरित असलेल्या तालिबानशी दीर्घ काळ लढा देणे अफगाण सैनिकांना जमले नाही. अफगाण लष्कराने तालिबानसमोर अक्षरश: शस्त्रांसह शरणागती पत्करली. काही ठिकाणी लष्कराची पूर्ण युनिटही तालिबानला शरण गेली.

वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसच्या बाहेर अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या कब्जाविरोधात निदर्शने होत आहेत. लोकांची मागणी आहे की पाकिस्तानला दहशतवादाला प्रोत्साहन देण्यापासून रोखले पाहिजे.
वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसच्या बाहेर अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या कब्जाविरोधात निदर्शने होत आहेत. लोकांची मागणी आहे की पाकिस्तानला दहशतवादाला प्रोत्साहन देण्यापासून रोखले पाहिजे.

अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचे काय झाले?

राष्ट्राध्यक्ष तर देश सोडून पळून गेले. राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यापूर्वी अफगाणिस्तान सोडून निघून गेले. तालिबान रविवारी काबूलला पोहचला तेव्हा गनी पळून गेले. ते म्हणाला की, मला रक्तपात नको आहे, या कारणामुळे देश सोडून जाणेच योग्य आहे. पण ते कुठे गेले हे स्पष्ट झालेले नाही.

लोक अफगाणिस्तानची तुलना सायगॉनशी का करत आहेत?

1975 मध्ये उत्तर व्हिएतनामी सैन्याने सायगॉन जिंकले होते. तेव्हाच व्हिएतनाम युद्ध संपले होते. तेव्हापासून सायगॉन अमेरिकेच्या पराभवाचे प्रतीक बनले. त्या वेळी अमेरिकन आणि व्हिएतनामी समर्थकांना हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करण्यात आले होते. पण अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी सायगॉनची अफगाणिस्तानशी तुलना नाकारली आहे. ते म्हणाला - हे सायगॉन नाही.

काबूलच्या रस्त्यावर तालिबानी दिसत आहेत.
काबूलच्या रस्त्यावर तालिबानी दिसत आहेत.

आता अफगाणिस्तानात काय होईल?

अद्याप काहीही स्पष्ट नाही. तालिबान म्हणतो - इतर गटांसोबत मिळून आम्ही 'सर्वसमावेशक इस्लामिक सरकार' बनवू. यासाठी आम्ही जुन्या सरकारच्या नेत्यांसह देशातील वरिष्ठ नेत्यांचा सल्ला घेत आहोत.

तालिबानने इस्लामिक कायदा लागू करण्याचे म्हटले आहे. सोबतच अनेक दशकांच्या युद्धानंतर सामान्य जनजीवन परत येण्यासाठी सुरक्षित वातावरण प्रदान करणार असल्याचा शब्ददेखील दिला आहे. मात्र, अफगाण जनतेचा तालिबानवर विश्वास नाही. त्यांना भीती वाटते की तालिबान राजवट हिंसक असेल. तालिबानला अफगाणिस्तानचे नाव बदलून इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान करायचे आहे. यामुळे देखील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील वेळी तालिबानने त्याच नावाने राज्य केले होते.

महिला आणि मुले काबुलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
महिला आणि मुले काबुलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

तालिबानच्या ताब्यानंतर महिलांसाठी कशी परिस्थिती निर्माण होईल?

अनेक महिलांना भीती वाटतेय की, त्यांचे हक्क हिरावून घेतले जातील. तालिबानची सत्तेवरून हकालपट्टी झाल्यानंतर अफगाण महिलांना अनेक अधिकार मिळाले होते. त्यांना भीती वाटते की त्यांना पुन्हा एकदा घरात बंदिस्त केले जाईल. तालिबानने म्हटले आहे की, ते महिलांच्या शाळेत जाणाच्या विरोधात नाही. सोबतच सरकारमध्ये महिलांचाही समावेश असेल असेही तालिबानने सांगितले आहे. तरीदेखील महिलांच्या हक्कांबाबतचे धोरण स्पष्ट नाही. अफगाणिस्तान सुरुवातीपासून पुराणमतवादी देश आहे. प्रमुख शहरांबाहेर महिलांची स्थिती अत्यंत दयनीय आहे, विशेषत: तालिबानी राजवटीत.

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटले आहे की, अफगाणिस्तानचे सरकार चालवण्यासाठी तालिबानची भूमिका महत्त्वाची असेल. यामुळे तालिबानला जगभर मान्यता मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटले आहे की, अफगाणिस्तानचे सरकार चालवण्यासाठी तालिबानची भूमिका महत्त्वाची असेल. यामुळे तालिबानला जगभर मान्यता मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

तालिबान पुन्हा एकदा अल-कायदा सारख्या संघटनांची भरभराट होण्यास मदत करेल?

प्रत्येक तज्ज्ञ हीच शंका उपस्थित करत आहे. अमेरिकन लष्करी अधिकारी देखील त्याच गोष्टीबद्दल चिंतित आहेत. गेल्या वर्षी तालिबानने अमेरिकेबरोबर शांतता करार केला होता. यामध्ये तालिबानने दहशतवादाविरोधात लढण्याचे वचन दिले होते. तसेच अफगाणिस्तानला दहशतवादी हल्ल्यांचे अड्डे बनू दिले जाणार नाही असेही म्हटले. हा करार अंमलात आणणे अमेरिकेला सोपे जाणार नाही.

गेल्या 20 वर्षांमध्ये तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अमेरिकेला येमेन आणि सोमालिया सारख्या देशांमध्ये संशयित दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात मदत झाली आहे. या ठिकाणी अमेरिकेच्या सैन्याचा कायमचा तळ नाही. 11 सप्टेंबरच्या हल्ल्यासाठी तालिबानला मोठा दंड चुकता करावा लागला आहे. जर त्याने आपली सत्ता बळकट करायची असेल, तर तो पुन्हा त्याच्या चुका करणे टाळेल.

या वर्षाच्या सुरुवातीला, पेंटागॉनच्या महत्त्वाच्या नेत्यांनी सांगितले होते की, अल-कायदा सारखे कट्टरपंथी गट पुन्हा उदयास येऊ शकतात. पण सद्यपरिस्थिती बघता असे गट अपेक्षेपेक्षा वेगाने वाढू शकतात.

अफगाणिस्तान इस्लामिक स्टेटशी संबंधित गटांचे घर आहे. अलिकडच्या वर्षांत त्याने शिया अल्पसंख्याक समुदायावरील हल्ले तीव्र केले. तालिबानने या हल्ल्यांचा निषेध केला. क्षेत्र ताब्यात घेण्यावरून दोन्ही गट आपापसात भांडत आहेत. तालिबान सरकार इस्लामिक स्टेटला दडपण्याचे धोरण अंमलात आणते का हे पाहणे बाकी आहे.

बातम्या आणखी आहेत...