आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • After Reading 14,000 Science Papers, 200 Scientists From 60 Countries Said – In The Next 20 Years, The Global Temperature Will Increase By 1.5 Degrees And The Devastation Will Start.

पृथ्वीसाठी धोक्याची घंटा:200 शास्त्रज्ञ सांगतात - पुढील 20 वर्षात जागतिक तापमान 1.5 अंशांनी वाढेल आणि महाविनाशाला सुरुवात होईल

जनार्दन पांडेय4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जागतिक तापमानवाढ 1.5 अंश सेल्सियसच्या पुढे गेल्यास त्याचे परिणाम महाभंयकर असतील.

या वर्षी 9 जुलै रोजी कॅनडात पहिल्यांदा पारा 49.6 अंशांवर पोहोचला. भीषण उकाड्यामुळे लोक हैराण झाले होते. तर दुसरीकडेच त्याच दिवशी अमेरिकेच्या उत्तर कॅलिफोर्निया सीमेवर 4 लाख एकरपेक्षा जास्त जंगलाच वणवा पेटला होता. न्यूझीलंडमध्ये इतका बर्फ पडला की रस्ते बंद झाले. घरातून बाहेर पडण्यास बंदी घातली गेली.

हवामानाच्या या विलक्षण बदलावर 60 देशांतील 200 शास्त्रज्ञांनी संशोधन केले आणि 3,500 पानांचा अहवाल लिहिला. सात वर्षांच्या अभ्यासानंतर, जेव्हा या अहवालाला नाव देण्याची वेळ आली, तेव्हा शास्त्रज्ञांनी त्याला a code red for humanity म्हणजे मानवी जीवन धोक्याच्या लाल पातळीवर पोहोचले आहे असे म्हटले आहे.

हा अहवाल संपूर्ण जगाबद्दल आहे आणि पुढील 100 वर्षांत या पृथ्वीवर होणाऱ्या बदलांविषयी सांगतो. आम्ही त्यातील महत्वाचे गोष्टी उदाहरणांसह सांगत आहोत. भारताबद्दलही जाणून घेऊयात...

सर्वप्रथम बोलुयात जगाबद्दल -
50 वर्षांत येणारी उष्णतेची लाट दरवर्षी येण्यास सुरुवात होईल, हवामानाच्या तीव्र परिस्थितीमुळे हाहाकार माजेल
या संशोधनातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हवामानाची अत्यंत वाईट परिस्थिती. अभ्यासानुसार, भूस्खलन, मुसळधार पाऊस, ढगफुटी, चक्रीवादळ, गारपीट, पूर किंवा तीव्र दुष्काळ यासारख्या आपत्ती जी 50 वर्षांतून एकदा येते असते, 2100 सालापर्यंत दरवर्षी येईल.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात कॅनडाचे तापमान जे सरासरी 16.4 अंश सेल्सिअस असते, ते 49.6 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. याचे कारण उष्णतेची लाट होती. शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे, कार्यालये, लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली होती. कॅनडातील व्हँकुव्हर, पोर्टलँड, इडाहो, ओरेगॉनच्या रस्त्यांवर वॉटर स्प्रिंकलर मशीन बसवण्यात आली. आगीच्या भीतीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

उष्णतेच्या लाटेच्या 2 प्रणाली होत्या. हवामानातील व्यवस्थेचा अर्थ तुम्हाला माहितेय? हे अगदी आपण एखाद्या कामासाठी जशी सिस्टम बनवतो आणि त्याप्रमाणे काम सुरु राहते, अगदी त्यासारखेच आहे. झाले असे की, अलास्कामधील अलेउतियन बेटे आणि कॅनडा मधील जेम्स बे-हडसन बे पासून येणा-या उष्ण वा-याने एक प्रणाली तयार केली. थंड समुद्राची हवा त्यांच्या आत शिरू शकत नव्हती. उदाहरणार्थ प्रेशर कुकरच्या सभोवतालची हवा थंड असते, पण आतल्या गरम वाफेने अन्न शिजते. त्यावेळी अमेरिका आणि कॅनडा अशाच प्रेशर कुकरच्या आत असल्याचे जाणवत होते. त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या 2 दिवसात न्यूझीलंडमध्ये 8 इंचापेक्षा जास्त बर्फ पडला. 55 वर्षांनंतर जून -जुलैमध्ये न्यूझीलंडचे तापमान -4 अंशांपर्यंत पोहोचले होते. इतकी थंडी पडत होती की राजधानी वेलिंग्टनमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली. समुद्राच्या किनाऱ्यावर 12 मीटर उंच लाटा उसळत होत्या.

पृथ्वीच्या एका छोट्याशा भागात पाऊस पडेल, तो मुसळधार असेल, एक मोठा भाग दुष्काळामुळे ग्रस्त असेल, उष्णतेने तापेल
संशोधनात असेही दिसून आले आहे की, उच्च अक्षांशांच्या फक्त एका लहान भागात पाऊस पडेल. उच्च अक्षांश क्षेत्र म्हणजे वर्षभर पाऊस पडत असतो. यामध्ये युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियाचा काही भाग आणि न्यूझीलंडचा बहुतेक भाग समाविष्ट आहे.

येथे पावसाचा जोर आणखी वाढेल. इतका की पूरसदृश परिस्थिती कायम राहील. उर्वरित मोठा भाग सतत तापत राहिल. याच वर्षी हंगेरी, सर्बिया, युक्रेन या युरोपियन देशांमध्ये विक्रमी उष्णतेची लाट पसरली होती. पारा 40 अंशाच्या वर पोहोचला होता, इटलीमध्ये इतका पाऊस पडला की प्रचंड पूर आला. जर्मनीमध्ये चक्रीवादळाने कहर केला. 120 वर्षांनंतर, रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये तापमान 35 अंशांवर पोहोचले.

समुद्राची पातळी 4 मीटर पर्यंत वाढणार आहे, म्हणजेच एक मजली घराइतकी उंच पुढील 20 वर्षांत जगाचे तापमान 1.5 डिग्री सेल्सिअसने वाढेल. त्याचा परिणाम खूप गंभीर होणार आहे. यामुळे हिमनदी वितळणे सुरु होईल आणि त्यामुळे समुद्राची पातळी 3-4 मीटर पर्यंत वाढेल. असे या शतकाच्या अखेरीस होईल. यामुळे, समुद्रकिनारी शहरांमध्ये राहणारे जगातील 100 कोटींहून अधिक लोक बेघर होतील.

वर्षभरापूर्वी जगाच्या हवामानाचा मागोवा ठेवणाऱ्या जागतिक हवामान संघटनेने म्हणजेच WMO ने सांगितले होते की, अंटार्क्टिकाच्या पर्वतांमध्ये तापमान वाढत आहे. 2020 मध्ये प्रथमच येथील तापमान 20 अंशांवर पोहोचले होते. जर हिमनद्या इथे वितळू लागल्या तर समुद्रात वाढलेले पाणी पृथ्वीवर कहर निर्माण करेल.

आता भारताबद्दल बोलुया...

आपली 12 शहरे 3 फूट पाण्याखाली जाणार आहेत, त्यात मुंबईचा समावेश आहे
आयपीसीसी अहवालाचा हवाला देत नासाने भारतातील सुमारे 12 शहरे 3 फूट पाण्याखाली जाणार असल्याचे सांगितले आहे. नासाने म्हटले आहे की, जगभरातील मनुष्य जिथे राहतात त्याचे क्षेत्र कमी होणार आहे, कारण समुद्राचे पाणी वाढेल.

यात भारतातील ओखा, मोरमुगाओ, कांडला, भावनगर, मुंबई, मंगलोर, चेन्नई, विशाखापट्टणम, तुतीकोरन, कोच्ची, पारादीप आणि पश्चिम बंगालमधील किद्रोपूर किनारपट्टीचे क्षेत्र 3 फूट पाण्याखाली जाईल.

आपल्याकडे 15 वर्षांत हवामान बदलाचे अत्यंत वाईट परिणाम दाखवणा-या 310 घटना घडल्या आहेत 1970 ते 2005 दरम्यानच्या 35 वर्षांमध्ये, हवामान बदलाच्या अत्यंत वाईट परिस्थितीमुळे 250 घटना घडल्या होत्या, परंतु 2005 ते 2020 दरम्यान, फक्त 15 वर्षात 310 अशा घटना घडल्या. या वर्षी 7 फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमध्ये हिमनदी फुटल्याने ऋषीगंगा आणि धौलीगंगा खोऱ्यांमध्ये अचानक पूर आला. सुमारे 200 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

15 वर्षांत दुष्काळ 13 पटीने वाढला, 40% पूरप्रवण जिल्ह्यांमध्ये दुष्काळ
2005 ते 2020 पर्यंत दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये 13 पट वाढ झाली आहे. 2005 पर्यंत भारतात फक्त 6 दुष्काळग्रस्त जिल्हे होते, पण आता त्यांची संख्या वाढून 79 झाली आहे. यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता केवळ 40% पूरप्रवण जिल्ह्यांनाही दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

2005 पासून चक्रीवादळामुळे प्रभावित जिल्ह्यांची संख्या वार्षिक सरासरी दुप्पट झाली आहे. गेल्या दशकात, पूर्व किनारपट्टीचे सुमारे 258 जिल्हे चक्रीवादळामुळे प्रभावित झाले आहेत.

3 दिवसांचा पाऊस 3 तासात पडू लागला
स्कायमेटचे महेश पहलवत म्हणतात की, पूर्वी अरबी समुद्राची वादळे 2 वर्षात एकदा यायची, आता ती वर्षातून दोनदा येऊ लागली आहेत. ते भारताच्या हवामानाचा ओलावा सौदी अरेबियाकडे ओढतात. यामुळे भारतातील पावसावर पुढील पाच वर्षे वाईट परिणाम होतो.

10 वर्षांपूर्वी 3 दिवसांत जेवढा पाऊस पडायचा तेवढा पाऊस आता 3 तासात होतो. यापूर्वी, 1 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान 122 दिवसांत सुमारे 880 मिमी पाऊस पडायचा. तरीही, पावसाचे एकूण प्रमाण फारसे बदललेले नाही, परंतु पावसाचे दिवस आता 60 किंवा त्यापेक्षा कमी झाले आहेत. पावसाळी दिवस म्हणजे ज्या दिवशी 2.4 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला तो दिवस पावसाचा दिवस असतो.

IPCC म्हणजे काय?
इंटरगव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) ही संयुक्त राष्ट्रांची एक संस्था आहे. 1988 साली हवामान बदलासंबंधी अभ्यास करण्यासाठी तिची स्थापना झाली. ही संस्था वेगवेगळ्या सरकारांना जागितक तापमानवाढीसंदर्भात स्वतःचं धोरण ठरवण्यासाठी शास्त्रीय माहिती पुरवते. 1992 साली या संस्थेने हवामान बदलावरचा पहिला सर्वसमावेशक मूल्यांकन अहवाला सादर केला होता. 9 ऑगस्ट रोजी या संस्थेने सहावा अहवाल सादर केला.

सरकार बैठका घेत राहतील, परंतु पृथ्वी वाचवण्यासाठी आपण ही 5 पावले उचलली पाहिजेत

अखेर हे सर्व टाळण्याचा काही मार्ग आहेत का? या अहवालाचे लेखक फ्रेडरिक ओटो म्हणतात की, जर आपण पृथ्वीचे सरासरी तापमान 1.5 अंशांवर किंवा त्यापेक्षा कमी ठेवले तर खराब हवामानाची परिस्थिती टाळता येईल. जर ही स्थिती कायम राहिली तर 2040 च्या अखेरीस जागतिक तापमान 1.5 डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक होईल.

काही महिन्यांनंतर, जगभरातील सरकारे ग्लासगो, स्कॉटलंड येथे परिषद घेतील. अशा परिषदा या आधीही झाल्या आहेत. पण पर्यावरण रक्षणासाठी आपण काय करू शकतो?

नेट झिरो गाठण्यासाठी ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजेच हरित वायू उत्सर्जन शक्य तेवढे कमी करावे लागणार आहे. त्यासाठी प्रदूषण न करणारे तंत्रज्ञान वापरणे, उर्वरित उत्सर्जन कार्बन कॅप्चर आणि स्टोरेजच्या माध्यमातून उर्वरित उत्सर्जन टाळणे किंवा जास्तीत जास्त झाडे लावणे, अशी पावले उचलावी लागणार आहेत. अजून आपण काय करु शकतो

  • ओला आणि सुका घरगुती कचरा वेगळा ठेवा, कारण बहुतेक ओला कचरा कंपोस्ट बनवण्यासाठी वापरला जातो आहे.
  • विनाकारण मोबाईल फोन आणि इंटरनेट वापरू नका. प्रत्येक वेळी जेव्हा आपण इंटरनेटसाठी क्लिक करतो, तेव्हा आपल्या स्क्रीनवर तो शोध दाखवण्यासाठी कार्य करणारी साधने हरितगृह वायू सोडतात.
  • प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करा.
  • पेट्रोल-डिझेल कार, बाईक फक्त तेव्हाच वापरा जेव्हा त्याची खूप गरज असेल.
  • घरात गरज नसताना बल्ब, दिवे, एसी कोणत्याही परिस्थितीत वापरू नका.
बातम्या आणखी आहेत...