आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात सध्या डीएनएच्या मुद्यांवर चांगलेच वादंग सुरु आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी हा मुद्दा उपस्थित केला होता. देशातील प्रत्येक भारतीयांचे डीएनए एकच असल्याचे भागवत यांनी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे सांगितले होते. त्यानंतर काँग्रेस, एमआयएमसह अनेक पक्षांतील नेत्यांनी यावर टीकाटीप्पणी करायला सुरुवात केली होती.
परंतु, मोहन भागवत यांच्या या दाव्यामध्ये किती सत्य आहे? हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. कारण एकीकडे संपुर्ण भारतातील लोकांचे डीएनए एक असू शकत नाही असे विज्ञान आणि इतिहास सांगते. त्यामुळे विज्ञान आणि इतिहासानुसार, मोहन भागवत यांचा हा दावा पूर्णपणे खोटा ठरतो.
हा मुद्दा आताच का उपस्थित केला जातोय?
सरसंघचालक मोहन भागवत यांनी हा मुद्दा आताच का उपस्थित केला यावरुन राजकीय तज्ज्ञांमध्ये तर्क विर्तक लावले जात आहे. काही तज्ञांच्या मते, भागवत यांनी हे विधान उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये केल्याने यांच्या विधानातून मोठे अर्थ निघतात. यामुळे उत्तर प्रदेशातील निवडणुकीला सुरुवात झाली असे काही तज्ञांचे मत आहे. कारण आधीच राज्यात धर्मांतरण आणि 2 चाइल्ड पॉलिसीमुळे लोक दोन गटात विभागले गेले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांचे हे अधिक महत्त्वाचे मानले जात आहे.
DNA म्हणजे काय व तो कुठून येतो?
डीएनए म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक अॅसीड होय. आपली उंची किती असणार, नाक कसे असेल, आपण कसे विचार करणार हे सर्व आपल्यातील डीएनएच्या कोडींगमुळे ठरत असते. आपले शरीर 200 पेक्षा जास्त कोशिकापासून तयार झाले आहे. हे डीएनए आपल्या शरीरातील लहान लहान धाग्याप्रमाणे असतात. जे आपल्या आई व वडीलांमधून आपल्यामध्ये येतात.
यातील दोन महत्वाचे मुद्दे
1. क्रोमोसोम - जे फक्त आपल्या आई आणि वडीलांपासून आपल्याला मिळते.
2. परंतु, डीएनएमधील जीन्स हे आपल्या आजी-आजोबा, काका, मामा व आई-वडिलांच्या दोन्ही कुटुंबापासून मिळत असते.
भारतीयांच्या जातीत अनेक प्रकारचे डीएनए
विज्ञानाच्या सिद्धांतानुसार, एकाच व्यक्तीत दोन वेगवेगळ्या पीढ्यांचे जीन्स येऊ शकतात. यावरुन हे सिद्ध होते की, भारतीयांच्या डीएनएमध्ये पाश्चिमात्य देशातील जीन्स होण्याची शक्यता अधिक आहे. कारण भारतात यापूर्वी पोर्तुगाल, फ्रान्स, यूके, ग्रीस आदी देशांतील लोक बरेच दिवस भारतात वास्तवाला होते. त्यांनी आपल्या देशातील महिलेंसोबत लग्न केले आणि मुलांचा जन्म झाला. यामुळे भागवत यांच्या या विधानाला आधार मिळत नाहीये.
विशेष म्हणजे देश स्वतंत्र झाल्यावरही संसदेमध्ये दोन जागा अँग्लो-भारतीयांसाठी राखीव ठेवल्या गेल्या आहेत. अँग्लो-इंडियन म्हणजे भारतीय स्त्रियांपासून जन्मलेले ब्रिटिशांची मुले किंवा ब्रिटीश स्त्रियांपासून जन्मलेले भारतीयांची मुले असा त्यांचा अर्थ होतो. त्यामुळे या मुलांमध्ये भारत आणि पाश्चिमात्य देशातील दोघांचे जीन्स आहेत. हे विसरता येणार नाही.
आर्यनंतर आपल्या देशात दुसऱ्या जातीचे लोक आले
भारत देशात अनेक लोकांनी वास्तव केले आहेत. आर्यांनंतर आपल्या देशांमध्ये ग्रीक, मंगोल, मुस्लिम, पारशी, पोर्तुगाल, फ्रान्स आणि ब्रिटीश आदी लोक आलेत. त्यांनी येथे आल्यानंतर आपल्या देशातील स्त्रियांसोबत लग्न केले आणि मुलं जन्माला घातली. त्यामुळे आपल्या आजघडीला अनेक प्रकारच्या जातीत शेकडो डीएनए अस्तित्त्वात आहे.
मोदी सरकार आणणार होते मानवी डीएनए प्रोफाइलिंग बिल
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार 2015 मध्ये मानवी डीएनए प्रोफाइलिंग विधेयक आणण्याच्या तयारीत होते. जर हे विधेयक त्यावेळी संसदेत मंजुर झाले असते तर डीएनएवरुन एवढे वादंग उठले नसते. कारण या बिलामुळे आपल्या सर्वांचे डीएनए आपल्याला माहित झाले असते. परंतु, केंद्र सरकारचे हे विधेयक समोर आले नाही.
राजकीय पक्ष डीएनएला निवडणुकीचा मुद्दा का बनवतात?
देशात निवडणूक जवळ आली अनेक मुद्दे बाहेर काढले जातात. याचा फायदा हा निवडणुकीत संबंधित पक्षांना होतो. त्यामुळे आम्ही हा मुद्दा समजून घेतला पाहिजे की, राजकीय पक्ष वारंवार डीएनएसारख्या वैज्ञानिक आणि ऐतिहासिक गोष्टी का उपस्थित करतात? विशेष म्हणजे डेक्कन महाविद्यालय पुणेचा याबाबतचा अहवाल 2019 मध्येच का यावा? जेव्हा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी माजली होती. त्यावरुन हे आम्ही समजून घेणे खूप गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.