आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर EXPLAINER:कोरोनानंतर एमआरएनए लस आता कर्करोगातून बरे करेल, संशोधकांना मोठी अपेक्षा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही प्रकारच्या कर्करोगामागे विषाणू असल्याचे संशोधकांना वाटते. म्हणूनच एमआरएनए या कर्करोगाच्या लसीचे परीक्षण सुरू आहे. फायझर-बायोंटेक व मॉडर्नाच्या एमआरएनए लस आधी कोरोनापासून बचावासाठी वापरण्यात आली होती. या प्रकारचे तंत्र अनेक वर्षांपासून विकसित केले जात होते. अनेक रोगांसाठी त्याचे परीक्षण सुरू होते. त्यापैकी कर्करोगही एक आहे. त्याविषयी जाणून घेऊया.

एमआरएनए तंत्रज्ञान काय आहे?
अमेरिकेच्या ह्यूस्टन मेथॉडिस्ट हॉस्पिटलचे डॉ. जॉन कुक म्हणाले, एमआरएनए (मेसेंजर रिबोन्यूक्लिक अॅसिड) ही कर्करोगाच्या निदानासाठी इम्यून सिस्टिम विकसित करण्याची पद्धती आहे. ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील तज्ञ अन्ना ब्लॅकनी म्हणाल्या, एमआरएनए लस कर्करोगाच्या पेशींवरील प्रथिनांना आेळखण्याचे काम करते. सोबतच रोगप्रतिकारशक्तीला त्यादृष्टीने सक्षम बनवण्याचे काम करते.

कोणत्या प्रकारच्या कर्करोगात एमआरएनए लस प्रभावी ठरू शकते?
डॉ. कुक म्हणाले मेलनोमासारख्या कर्करोगाच्या बाबतीत लस प्रभावी ठरू शकते. एमआरएनए तंत्रज्ञानामुळे मेलनोमा कर्करुग्णांमधील सामान्य बदलाचा वेध घेतला जाऊ शकतो. बायोटेकने हीच पद्धती स्वीकारली आहे. त्यांनी कर्करोगाशी संबंधित चार विशेष अँटिजन शोधल्या आहेत. मेलनोमाच्या ९० टक्क्यांहून जास्त रुग्णांमध्ये त्यापैकी किमान एक अँटिजन असते.

एकाच प्रकारच्या रुग्णांसाठी ही लस प्रभावी ठरेल?
हार्वर्डचे डेना-फार्बर कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये फिजिशियन सायंटिस्ट डेव्हिड ब्राऊन म्हणाले, प्रत्येक कर्करुग्णांत वेगवेगळे बदल होतात. समान बदल होणे दुर्मिळ असू शकते. विषाणू प्रत्येकाच्या इम्यून सिस्टिमवर वेगवेगळ्या प्रकारे हल्ला करू शकतो. भलेही त्यांना एकसारखाच कर्करोग झाला असला तरी हे घडते. म्हणूनच प्रत्येक स्थितीमधील रुग्णांसाठी लस तयार कराव्या लागतील. ट्यूमरच्या डीएनए व आरएनए तपासणीतून ही बदलणारी स्थिती तपासता येते.

कर्करोगाच्या लसीचे काम कुठपर्यंत आले?
ह्यूस्टन मेथोडिस्ट रुग्णालयात कर्करोगतज्ञांचा चमू कर्करोग होण्याची जोखीम असलेल्या लोकांसाठी लस तयार करत आहे. त्यात बीआरसीए २ म्युटेशन असलेल्या लोकांचा समावेश आहे. अशा लोकांना स्तनाचा कर्करोग होण्याची जोखीम जास्त असते. हार्वर्डच्या डेना-फार्बर इन्स्टिट्यटमध्येही लसीवर काम सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...