आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • After The Vaccine, Get The Corona Test Done Immediately In Contact With The Infected, If The Result Is Negative, Get The Second Test Done Within 5 To 7 Days, Know What Is Necessary To Do

लसीकरणानंतरही सावधगिरी बाळगणे आवश्यक:लस घेतल्यानंतर तुम्ही कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलात तर लगेच चाचणी करुन घ्या, निगेटिव्ह असल्यास 5-7 दिवसांत दुसरी चाचणी करा

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

कोविड -19 लसीचे सुमारे 50 कोटी डोस भारतात देण्यात आले आहेत. अभ्यास असा दावा करतात की, लस दिली गेली असल्यास कोविड -19 मुळे गंभीर लक्षणे किंवा मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या नवीन अभ्यासात काही नवीन तथ्य समोर आले आहेत.

या अहवालात दावा करण्यात आला आहे की, लसीच्या दोन्ही डोसनंतरही संसर्ग होत आहे. याचे कारण कोविड -19 चा डेल्टा व्हेरिएंट आहे. म्हणजेच लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही धोका टळलेला नाही. म्हणूनच, लसीकरण केलेल्या लोकांना देखील कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे. अशा परिस्थितीत, प्रश्न उद्भवतो की जर लसीकरण केलेली व्यक्ती कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आली तर त्याने ताबडतोब स्वतःला आयसोलेट करायला हवे का?

चला तर लस घेतल्यानंतर कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास काय करावे ते जाणून घेऊया...

 • जर तुम्ही कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला असाल तर तुम्ही इतरांपासून अंतर ठेवा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या मते, लस कोरोनाच्या गंभीर संसर्गाचा धोका म्हणजेच, हे गंभीर आजारी पडण्यापासून रोखू शकते, परंतु संसर्ग होऊ शकतो. या प्रकरणात, लसीकरण केलेली व्यक्ती इतरांना संक्रमित करू शकते.
 • कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर किमान 14 दिवस स्वतःची काळजी घ्या आणि आरोग्याशी संबंधित कोणत्याही बदलाकडे दुर्लक्ष करू नका. सीडीसीच्या मते, जरी लसीकरण केलेल्या लोकांद्वारे संक्रमणाचा धोका खूप कमी असला तरीही त्यांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर सर्वप्रथम चाचणी करुन घ्या.
 • मिनियापोलिसमधील वॉल्डेन विद्यापीठाचे एपिडेमिओलॉजिस्ट डॉ. वासिलियोस मार्गराइटिस यांचे म्हणणे आहे की, पहिली कोरोना चाचणी तातडीने करुन घ्या, टेस्टचा रिपोर्ट िनगेटिव्ह आल्यानंतर 5 ते 7 दिवसांनी दुसरी चाचणी करा.
 • जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसली तर ताबडतोब स्वतःला आयसोलेट करा आणि कोरोना चाचणी करुन घ्या. ताप, खोकला, श्वसनाचा त्रास, चव आणि वास घेण्याची क्षमता गमावणे आणि थकवा ही कोविड -19 ची सामान्य लक्षणे आहेत.
 • जर कोविड -19 ची चाचणी पॉझिटिव्ह असेल तर किमान 14 दिवस स्वतःला इतरांपासून दूर ठेवा. सीडीसीच्या मते, जर चाचणी पॉझिटिव्ह असेल तर 10 ते 14 दिवस किंवा जोपर्यंत कोरोनाची लक्षणे आहेत तोपर्यंत स्वतःला इतरांपासून दूर ठेवा. तसेच, डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 • वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) ने डेल्टा व्हेरिएंटच्या वाढत्या प्रकरणांनंतर मास्क घालण्याचा सल्ला जारी केला आहे. ब्रिटनमध्ये लसीकरण केलेल्या लोकांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.
 • भारतात व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटवर लक्ष ठेवणाऱ्या इंसाकॉग (INSACOG) चा अहवाल सांगतो की, भारतात नोंदवलेल्या प्रत्येक दहा प्रकरणांपैकी सुमारे नऊ प्रकरणांसाठी डेल्टा प्रकार जबाबदार आहे. आयसीएमआरच्या नवीन अभ्यासानंतर, हे स्पष्ट झाले आहे की डेल्टा व्हेरिएंटपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ही लस फार प्रभावी नाही.

लस घेतल्यानंतर किती दिवसांनी तुम्ही फुल्ली व्हॅक्सिनेटेड असल्याचे म्हटले जाते?

 • सीडीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लसीचे दोन्ही डोस घेतल्याच्या 2 आठवड्यांनंतर तुम्ही फुल्ली व्हॅक्सिनेटेड होतात.

लसीकरण झालेल्या लोकांकडून कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका किती आहे?

 • याचे उत्तर शोधण्यासाठी आतापर्यंत फार थोडा अभ्यास केला गेला आहे. स्कॉटलंडमधील आरोग्य सेवकांमध्ये केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लसीकरण न झालेल्या कुटुंबातील सदस्यांच्या तुलनेत संसर्ग होण्याचा धोका 30% कमी आहे.
 • त्याचप्रमाणे, इंग्लंडमध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार, लसीकरणानंतर घरांमध्ये संसर्ग पसरण्याचा धोका 40% ते 50% पर्यंत कमी होतो. परंतु वेगाने ट्रांसमिट होणारे व्हेरिएंट हा दावा खोटा ठरवू शकतात. सध्या डेल्टा प्रकाराबाबतही असेच घडत आहे. तरीदेखील कोविड लसीने रिकव्हरीचा वेळ कमी करण्यासोबतच व्हायरस लोड कमी करण्यात यश मिळवलेले दिसत आहे.
बातम्या आणखी आहेत...