आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Against Child Abuse | Report One Against Child Porn | Marathi News| Three Reported Child Porn Cases And How Police Nabbed The Culprits | Divya Marathi Series

चाइल्ड पॉर्नोग्राफी रिपोर्ट 1:अवघ्या 13 वर्षांच्या मुलीला कळले सुद्धा नाही आणि पॉर्न व्हिडिओ झाला शूट, चाइल्ड पॉर्नोग्राफीची 3 धक्कादायक प्रकरणे

वैभव पलनीटकर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तारीख होती 16 नोव्हेंबर आणि मंगळवार सकाळची नाश्ताची वेळ. सीबीआयचे अधिकारी आपल्या प्लॅनिंगला फिनिशिंग टच देत होते. एजंसीने आधीच प्रत्येक गल्ली, प्रत्येक घर आणि एक-एका व्यक्तीवर कारवाईचे नियोजन केले होते. पण, एकाच वेळी 14 राज्यातील 77 वेग-वेगळ्या ठिकाणी छापा टाकणे एक आव्हान होते. त्यामुळे, रिस्क घेता येत नव्हते. अल्पवयीन मुला-मुलींना मोठ्या संकटातून काढणे एक मोठीच जबाबदारी होती. यात तुमच्या आमच्यासारख्यांची मुले-मुली नकळत संकटात सापडलेली होती. विशेष म्हणजे, आपली मुलं कोणत्या अडचणीला सामोरे जात आहेत याची माहिती त्यांच्या पालकांना सुद्धा नव्हती. या ठिकाणी आम्ही अशाच 13 आणि 16 वर्षांची मुलगी तसेच एका 8 वर्षांच्या मुलासोबत घडलेला घृणास्पद प्रकार मांडत आहोत.

पहिले प्रकरणः ऑनलाइन भेट, व्हर्चुअल मैत्री आणि कित्येक महिन्यांचे लैंगिक शोषण

हैदराबाद येथे राहणारी 13 वर्षीय ऐश्वर्या (काल्पनिक नाव) एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आहे. वडील सॉफ्टवेयर इंजीनिअर तर आई एक डॉक्टर आहे. एकुलती एक मुलगी अभ्यास करण्यासह इंटरनेटवर सर्फिंग करण्यात वेळ घालत असते. 2018 मध्ये सोशल मीडियावर ऐश्वर्याची एका प्रौढ महिलोसोबत मैत्री झाली होती. सुरुवातीला हाय, हॅलो सुरू होते. मग हळू-हळू ऐश्वर्या त्या महिलोसबत आपल्या पर्सनल गोष्टी सुद्धा शेअर करायला लागली.

वयात येत असताना आपल्या शरीराचा आकार योग्य नाही असे ऐश्वर्याला नेहमीच मनात वाटत होते. आपल्या मैत्रिणी यावरून आपली मस्करी करतात असे तिने आपल्या या महिला मित्रासमोर व्यक्त केले. सोशल मीडियावरील या मैत्रिणीने तिला समजावून सांगण्याचे आणि शेप व्यवस्थि करण्यात मदत करण्याचे आश्वासन दिले. यानंतर ऐश्वर्याने त्या महिलेसोबत ऑनलाइन फिजिकल ट्रेनिंग सुरू केले. याच दरम्यान त्या महिलेने ऐश्वर्याला कपडे काढून काही व्यायाम करण्यास सांगितले.

या घटनेच्या 4 महिन्यांनंतर ऐश्वर्याच्या चुलत भावाला इंटरनेट सर्फिंग करताना एक चाइल्ड पॉर्न व्हिडिओ सापडला. त्यातील मुलगी ऐश्वर्या होती. कुटुंबियांना ही गोष्ट कळाली तेव्हा ते सगळेच प्रचंड घाबरले. त्यांना काहीच सूचनेनासे झाले होते. काही वेळानंतर पालकांनी बाल लैंगिक शोषणाविरोधात काम करणाऱ्या सुनीथा कृष्णन यांच्याशी संपर्क साधला आणि संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली. सुनीथा यांच्या 2016 मध्ये अशाच विशेष सामाजिक कामगिरीबद्दल पद्मश्री सन्मान देण्यात आला आहे.

सुनीथा यांनी सांगितले, "ऐश्वर्याची केस अशी होती की यात त्या मुलीला माहिती सुद्धा नव्हते की तिचे ऑनलाइन लैंगिक शोषण केले जात आहे. तिला याची जाणीव झाली तेव्हा तिने स्वतःला एका खोलीत बंद केले. सर्वांशी संपर्क बंद केला."

ऐश्वर्याच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार करण्यास नकार दिला. ऐश्वर्यासारखी कित्येक प्रकरणे पोलिसांच्या नोंदीतच येत नाहीत. त्यामुळेच ऑनलाइन बाल लैंगिक शोषणाचे प्रकार वाढत आहेत.

दुसरे प्रकरण- डार्क वेबच्या काळोखात 16 वर्षीय मुलगी

केरळ पोलिसांना डार्क वेब सर्व्हेलन्सचे काम करत असताना एका 16 वर्षीय मुलीसोबत घडलेला अंगावर शहारे आणणारा प्रकार दिसून आला. पोलिसांनी यासाठी सलग तीन महिने डार्क वेब खांगाळावे लागले. विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीने व्हिडिओ कोणत्या पत्त्यावरून अपलोड करण्यात आला त्याची माहिती मिळवण्यात आली.

कोरोनाची पहिली लाट जानेवारी 2021 च्या सुमारास ओसरली होती. त्याच दरम्यान केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये एका 16 वर्षीय मुलगी राधिका (काल्पनिक नाव) चे लैंगिक शोषण झाले. तिचा छळ करणारा बाहेर नव्हे तर घरातच राहणारा तिचा काका होता. आरोपीने तिचा व्हिडिओ देखील बनवला होता. हाच व्हिडिओ त्याने चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या डार्क वेबमध्ये विकला होता.

केरळचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि सायबर विभागाचे प्रमुख मनोज अब्राहम यांनी सांगितले, "आमच्याकडे अशा अनेक तक्रारी आल्या ज्यामध्ये अल्पवयीनांचे शोषण करून ते त्यांच्या पालकांकडून किंवा घरातील व्यक्तीकडूनच रेकॉर्ड करण्यात आले. चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या लाइव्ह स्ट्रीमिंगने हे लोक मोठा पैसा कमवतात. अशा पद्धतीने घरातच लहानग्यांचे शोषण सुरू आहे."

तिसरे प्रकरण- मुंबईत चॅटिंग, मैत्री, सेक्सटिंग आणि ब्लॅकमेलिंग

मुंबईत एका मध्यम वर्गीय कुटुंबात राहणारा 8 वर्षांचा राहुल (काल्पनिक नाव) आपल्या मित्रांप्रमाणेच इंटरनेटवर सक्रीय होता. 2016 मध्ये सोशल मीडियावरच राहुलची एकासोबत मैत्री झाली. एक दिवस अचानक त्या व्यक्तीने राहुलला आपल्या प्रायव्हेट पार्टचे फोटो पाठवले. यानंतर राहुलने सुद्धा तशाच प्रकारचे फोटो पाठवण्यास सुरुवात केली.

राहुलचे हेच फोटो गोळा करून समोरील व्यक्ती त्याला ब्लॅकमेल करायला लागली. या फोटोंची भीती दाखवून आणखी फोटो आणि व्हिडिओची मागणी करायला लागली. असे नाही केल्यास जुने फोटो व्हायरल करणार अशी धमकी राहुलला मिळायला लागली.

याच भीतीने राहुलने आपले न्यूड व्हिडिओ शूट करून समोरील व्यक्तीला पाठवले. आई-वडिलांना ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांनी वेळीच आपल्या पाल्यासोबत घडलेल्या प्रकाराची पोलिसांत तक्रार नोंदवली. तपास केला असता राहुलने आपल्या लैंगिक शोषणाचा तपशील मांडला. हीच माहिती बाल लैंगिक शोषणाविरुद्ध काम करणारी संस्था आरंभ इंडियाचे सदस्य सिद्धार्थ पिल्लई यांना मिळाली. सिद्धार्थ स्वतः एक आयटी एक्सपर्ट आहेत. ते चाइल्ड पॉर्नोग्राफीचा कंटेन्ट इंटरनेटवर शोधून ते हटवण्याचे काम करत असतात.

80% पीडितांचे वय 14 किंवा त्यापेक्षा कमी

इंटरपोलच्या आकडेवारीनुसार, 2017 ते 2020 दरम्यान भारतात ऑनलाइन चाइल्ड पॉर्नोग्राफी आणि लैंगिक शोषणाच्या 24 लाख घटना समोर आल्या आहेत. यातील 80% पीडित 14 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुली होत्या.

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच 14 राज्यांत 70 ठिकाणांवर छापेमारी केली. तपासात दिल्ली, नोएडा, ढेंकनाल, झांसी आणि तिरुपती अशा विविध ठिकाणांवरून 7 जणांना अटक करण्यात आली. या निमित्ताने आम्ही चाइल्ड पॉर्नोग्राफीचा अभ्यास केला आणि 3 रिपोर्ट तयार केल्या आहेत.

'child porn', 'sexy child' या कीवर्ड्सचा होतो वापर

एप्रिल 2020 मध्ये इंडिया चाइल्ड प्रोटेक्शन फंड (ICPF) ने भारतात चाइल्ड पॉर्न कंटेन्टच्या मागणीवर संशोधन केले. त्यातून भारताच्या 100 शहरांमध्ये सरासरी 50 लाख चाइल्ड पॉर्न कंटेन्टची डिमांड केली जाते असे समोर आले. पब्लिक इंटरनेटवर 'child porn', 'sexy child' आणि 'teen sex videos' ट्रेंडिंग सर्च आहेत. हा कंटेन्ट पाहणारे 90% लोक पुरुष आहेत. पॉर्न साइट पॉर्नहबच्या आकडेवारीप्रमाणे भारतात 24 मार्च आणि मार्च 2020 दरम्यान पॉर्नची मागणी 95% वाढली.

चाइल्ड पॉर्न कंटेंट भारतात सर्वाधिक

सेक्शुअल अब्यूज मटेरियल (CSAM) वर काम करणारी अमेरिकन संस्था नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉइडेट चिल्ड्रन (NCMEC) च्या माहितीप्रमाणे चाइल्ड पॉर्न कंटेन्टच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. 2020 मध्ये भारतात 2.17 कोटी चाइल्ड पॉर्न कंटेन्टच्या रिपोर्ट्स मिळाल्या. 2019 च्या तुलनेत 2020 या वर्षी अशा कंटेन्टमध्ये 28% वाढ पाहायला मिळाली. अर्थातच कोरोना काळात ही वाढ पाहायला मिळाली आहे.

चाइल्ड पॉर्नोग्राफीवर आमचा पहिला रिपोर्ट वाचून आपल्याही लक्षात आले असेल की हा प्रकार किती घातक आणि विभत्स आहे. आपल्या घरातील आपली मुले-मुली दिवस-रात्र इंटरनेटवर वेळ घालवतात. अशी मुले-मुली उद्या चाइल्ड पॉर्नोग्राफीची शिकार होऊ शकतात. पुढच्या सिरीजमध्ये आम्ही राजस्थानमध्ये घडलेल्या एका घटनेची माहिती देणार आहोत. त्या केसमधूनच चाइल्ड पॉर्नोग्राफीचा हा घाणेरडा धंदा कसा चालतो? गुन्हेगार कोणत्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करतात? आणि पोलिस त्यांना कसे शोधून काढतात? हे निदर्शनास येईल. यासोबत केरळ आणि मुंबई पोलिसातील अधिकाऱ्यांनी चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या गुन्हेगारांना कसे पकडले याचा खुलासा देखील करणार आहोत.

बातम्या आणखी आहेत...