आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Agneepath Scheme Vs Youth Protest । Know Why Army Recruitment Scheme Opposed By Student From Bihar, UP, MP, Rajasthan

'अग्निपथ'ला 7 राज्यांतून विरोध:लष्करातील 50% जवान बिहार, MP, राजस्थानसह याच राज्यांतून, जाणून घ्या आक्रोशाचे 5 मुद्दे

लेखक: अभिषेक पाण्डेय / नीरज सिंह12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'अग्निपथ'ची लष्कर भरतीची योजना जाहीर झाल्यानंतर सलग तीन दिवस विरोधाची आग धुमसत आहे. यूपी, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थानसह 7 राज्यांमध्ये निदर्शने होत आहेत. हरियाणातील रोहतकमध्ये सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली.

विरोधादरम्यान, सरकारने गुरुवारी रात्री उशिरा अग्निपथ योजनेची वयोमर्यादा पहिल्या वर्षासाठी 21 वर्षांवरून 23 वर्षे केली, परंतु प्रश्न केवळ वयोमर्यादेचा नाही.

भास्कर एक्स्प्लेनरमध्ये 5 मुद्द्यांमध्ये समजून घ्या, सात राज्यांमध्ये अग्निपथ योजनेला विरोध होण्याचे कारण काय आहे?

1. अग्निपथच्या घोषणेनंतरचे 5 मुद्दे, ज्यामुळे तरुणाई संतप्त

  • 4 वर्षांची तयारी, 4 वर्षे नोकरी आणि नंतर बेरोजगारी.
  • देशात कोरोनाच्या नावाखाली भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले नव्हते, परंतु यादरम्यान बंगाल, यूपी, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये मोठ्या निवडणूक सभा आणि निवडणुकाही झाल्या.
  • फिजिकल आणि मेडिकल असूनही किमान 10 रॅली अर्धवट सोडल्या, आता त्या रद्द केल्या आहेत.
  • अग्निवीरांना बिल्ला, बॅज आणि चिन्हासह रँकही वेगळी राहील. तरुणांना यामुळे भेदभाव वाढण्याची भीती आहे.
  • पुढील 15 वर्षांसाठी निवडल्या जाणार्‍या 25% अग्निवीरांसाठी कोणतीही स्पष्ट पारदर्शक पद्धत नाही.

2. देशाला जवान देण्याबाबत बिहार हे नंबर 2 राज्य, म्हणूनच तिथे सर्वाधिक हिंसाचार

15 मार्च 2021 रोजी केंद्र सरकारने राज्यसभेत सांगितले होते की, तिन्ही सेवांमध्ये 13.40 लाखांहून अधिक सैनिक आहेत. लष्करात 11.21 लाख, हवाई दलात 1.47 लाख आणि नौदलात 84 हजार सैनिक आणि अधिकारी आहेत. यापैकी 2.18 लाख जवान यूपीमधून आले आहेत. तर बिहार दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथून 1.04 लाख जवान येतात. बिहारमध्ये अग्निपथ योजनेला सर्वाधिक तीव्र आणि हिंसक विरोध होण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे.

खाली दिलेल्या ग्राफिक्सवरून जाणून घ्या कोणत्या मोठ्या राज्यांनी तिन्ही सैन्यदलांत जास्तीत जास्त जवान दिले…

लोकसंख्येनुसार पाहिल्यास जवान देण्याबाबत चकीत करतील पर्वतीय राज्ये...

3. तोडफोड, जाळपोळ असलेल्या राज्यांत बेरोजगारीही जास्त

4. बिहार, यूपीच्या भरती मेळाव्यात येतात एक लाख तरुण, पाच वर्षांपासून भरती कमी

या वर्षी एप्रिलमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत सांगितले होते की, देशभरात दरवर्षी सरासरी 90 ते 100 सैन्य भरती मेळाव्यांचे आयोजन केले जाते. 2020-21 मध्ये 97 मेळावे होणार होते, पण फक्त 47 होऊ शकले. त्याच वेळी 2021-22 मध्ये 87 मेळाव्यांचे नियोजन होते आणि फक्त 4 झाले. कोरोनामुळे सामाईक प्रवेश परीक्षा झाली नाही, त्यामुळे भरती झाली नाही.

वर्षभरती मेळावे
2017-18106
2018-1992
2019-2095
2020-2147
2021-2204

दरवर्षी 90 ते 100 भरती मेळाव्यांद्वारे सुमारे 60 हजार जवानांची भरती होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. यापैकी सुमारे 40% मेळावे यूपी, बिहार, राजस्थान, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये आयोजित केले जातात. हिमाचल वगळता जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये प्रत्येक मेळाव्यात 1 ते 1.5 लाख तरुण सहभागी होतात. या तरुण लोकसंख्येचा एक मोठा वर्ग अग्निपथ योजनेला कडाडून विरोध करत आहे.

5. नियमित जवानापेक्षा अग्निवीर किती वेगळा असेल, हेच निषेधाचे मूळ

बातम्या आणखी आहेत...