आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Agni 5 Missile Range Vs Pakistan China; All About India Nuclear Weapons Intercontinental Ballistic Missile

एक्सप्लेनर:भारत उद्या घेणार अग्नी -5 ची चाचणी; या क्षेपणास्त्राला चीन का घाबरतो? त्याचे वैशिष्ट्य काय? याविषयी जाणून घ्या

आबिद खान4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • याविषयी जाणून घ्या सविस्तर...

भारत 23 सप्टेंबर रोजी 'अग्नी- 5 इंटर कॉन्टिनेन्टल बॅलेस्टिक मिसाईल' (ICBM) ची चाचणी घेऊ शकतो. अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या या क्षेपणास्त्राची ही 8 वी चाचणी असेल. 5000 किमी पर्यंत रेंजच्या या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात चीनची अनेक शहरे येतात. दरम्यान चीनदेखील शांतता आणि सुरक्षेबद्दल बोलत आहे. भारताने या वर्षी जूनमध्ये अग्नी प्राइमची चाचणी घेतली होती आणि अग्नी -6 वरही काम सुरु आहे.

हे क्षेपणास्त्र सैन्यात सामील झाल्यानंतर भारत जगातील त्या देशांमध्ये सामील होईल ज्यांच्याकडे आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे (ICBM) आहेत.

अग्नी -5 चे वैशिष्ट्य काय आहे? पाकिस्तान आणि चीनकडेही अशी क्षेपणास्त्रे आहेत का? क्षेपणास्त्र चाचणीबाबत चीनने काय म्हटले आहे? आणि चीन कोणत्या UNSC ठरावाबद्दल बोलत आहे?

अग्नी -5 ची शक्ती काय आहे?

 • अग्नी -5 हे भारताचे पहिले आणि एकमेव आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आहे, जे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने विकसित केले आहे. भारताकडे असलेल्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांपैकी हे एक आहे.
 • पाच हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता असलेले 'अग्नि-5' हे क्षेपणास्त्र 17 मीटर लांब आणि दोन मीटर रुंद असून त्याचे वजन 50 टन एवढे आहे.
 • अवघ्या 20 मिनिटांत आपले लक्ष्य भेदण्यास सक्षम असलेल्या या क्षेपणास्त्रात एक टन अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे.
 • हे मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल रीएंट्री व्हीकल (MIRV) ने सुसज्ज आहे. त्यात रिंग लेसर गायरोस्कोप, इनर्शियल नेव्हिगेशन प्रणाली व पर्यायी जी.पी.एस.चा वापर करण्यात आल्याने हे क्षेपणास्त्र नेमक्या दिशेने मार्गक्रमणा करू शकेल. क्षेपणास्त्र एका वेळी तीन लक्षांचा वेध घेऊ शकते.
 • त्याची गती मॅक 24 आहे, म्हणजेच आवाजाच्या वेगापेक्षा 24 पट जास्त आहे.
 • अग्नी -5 च्या प्रक्षेपण प्रणालीमध्ये कॅनिस्टर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे हे क्षेपणास्त्र सहज कुठेही नेता येऊ शकते.
 • अग्नी -5 क्षेपणास्त्र हाताळण्यास अतिशय सोपे आहे, ज्यामुळे ते देशात कुठेही तैनात केले जाऊ शकते.

या क्षेपणास्त्राचा थोडा इतिहास देखील जाणून घ्या

अग्नी मालिकेचे हे 5 वे क्षेपणास्त्र आहे. त्याची पहिली चाचणी 19 एप्रिल 2012 रोजी ओडिशा येथे करण्यात आली, जी यशस्वी झाली. क्षेपणास्त्राची पहिली कॅनिस्टर चाचणी जानेवारी 2015 मध्ये घेण्यात आली. त्यानंतर रोड मोबाइल लाँचरमधून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. क्षेपणास्त्राची शेवटची चाचणी 10 डिसेंबर 2018 रोजी करण्यात आली. विशेष गोष्ट म्हणजे आतापर्यंत क्षेपणास्त्राच्या 7 चाचण्या झाल्या आहेत, सर्व यशस्वी झाल्या आहेत. अग्नि -5 ला 2020 मध्येच लष्करात समाविष्ट केले जाणार होते, परंतु कोरोनामुळे चाचणीला विलंब झाला.

पाकिस्तान-चीनकडे अशी क्षेपणास्त्रे आहेत का?
पाकिस्तानच्या गौरी -2 क्षेपणास्त्राची रेंज 2300 किमी आणि शाहीन -2 क्षेपणास्त्राची रेंज 2500 किमी आहे. पाकिस्तान शाहीन -3 वरही काम करत आहे, ज्याची रेंज 2700 किमी असू शकते. चीनकडे भारतापेक्षा अधिक रेंज आणि आधुनिक तंत्रज्ञानाची क्षेपणास्त्रे आहेत. चीनच्या DF-31 क्षेपणास्त्राची रेंज 8000 किमी आणि DF-41 क्षेपणास्त्राची रेंज 12000 किमी आहे.

क्षेपणास्त्र चाचणीबाबत चीन काय म्हणाला?

अग्नि -5 च्या चाचणीसंदर्भात, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजान यांनी म्हटले आहे की, दक्षिण आशियात शांतता, सुरक्षा आणि स्थिरता राखण्यात सर्वांचे समान हित आहे. ते म्हणाले की, आम्हाला आशा आहे की सर्व पक्ष या दिशेने विधायक प्रयत्न करतील. लिजान म्हणाले की, भारत अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम बॅलेस्टिक क्षेपणास्त्र विकसित करू शकत नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) ठराव 1172 मध्ये या संदर्भात आधीच स्पष्ट नियम आहेत.

चीन कोणत्या UNSC ठरावाबद्दल बोलत आहे?
चीन UNSC ठराव 1172 बद्दल बोलत आहे. जून 1998 मध्ये झालेल्या अणुचाचणीनंतर सुरक्षा परिषदेचा ठराव 1172 लागू करण्यात आला. या ठरावामध्ये भारत आणि पाकिस्तानचा अण्वस्त्र कार्यक्रम रद्द करण्याची आणि दोन्ही देशांनी पुढील अण्वस्त्र चाचण्यांपासून दूर राहण्याची मागणी केली होती. तसेच दोन्ही देशांना अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा विकास थांबवण्याचे आवाहन केले होते. मात्र, भारत हा प्रस्ताव स्वीकारण्यास बांधील नाही.

सध्या कोणत्या देशांजवळ ICBM आहे?

सध्या जगातील मोजक्याच देशांजवळ इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाइल (ICBM) आहेत. यामध्ये रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, इस्रायल, ब्रिटन, चीन आणि उत्तर कोरिया यांचा समावेश आहे. या शक्तीने सुसज्ज होणारा भारत हा जगातील 8 वा देश असेल.

बातम्या आणखी आहेत...