आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्नी-5 हायपरसोनिक क्षेपणास्त्र आहे?:उंची, वेग आणि मार्गक्रमणामुळे शंका; विकसित करण्यात भारत 4 वर्षांपासून प्रयत्नरत

लेखक: नीरज सिंह2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताने 15 डिसेंबर रोजी देशातील सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-5 ची रात्रीची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशातील अब्दुल कलाम बेटावरून प्रथमच हे क्षेपणास्त्र पूर्ण अंतरावर डागण्यात आले. 5500 किमी अंतरावर जाऊन याने अचूकपणे लक्ष्यभेद केला.

केंद्र सरकारच्या अनेक मंत्र्यांनीही ट्विट करून डीआरडीओचे अभिनंदन केले आहे. त्याचवेळी संरक्षणविषयक बातम्यांवर नजर ठेवणाऱ्या एका वेबसाइटने दावा केला आहे की, ही अग्नी-5 ची चाचणी नसून हायपरसोनिक ग्लाईड क्षेपणास्त्राची आहे. चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राची उंची, वेग आणि प्रक्षेपणाचे विश्लेषण केल्यानंतर हा दावा करण्यात आला आहे. दिव्य मराठी एक्सप्लेनरमधून जाणून घेऊया की तज्ञ कोणत्या कारणांमुळे याला हायपरसोनिक क्षेपणास्त्र म्हणत आहेत? यासोबतच घातक हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचे वैशिष्ट्यही आम्ही सांगणार आहोत.

सर्वप्रथम अग्नी-5 क्षेपणास्त्राविषयी जाणून घ्या

कमी उंचीवरून उड्डाण केल्याने हे हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या श्रेणीत येते

इंडियन एरोस्पेस डिफेन्स न्यूजने प्रक्षेपणाच्या वेळी काढलेल्या या फोटोच्या आधारे अग्नी-5 क्षेपणास्त्र हायपरसोनिक क्षेपणास्त्र असल्याचा दावा केला आहे.
इंडियन एरोस्पेस डिफेन्स न्यूजने प्रक्षेपणाच्या वेळी काढलेल्या या फोटोच्या आधारे अग्नी-5 क्षेपणास्त्र हायपरसोनिक क्षेपणास्त्र असल्याचा दावा केला आहे.

स्वतंत्र संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चाचणीच्या वेळी अग्नी-5 क्षेपणास्त्र ज्या प्रकारे पृथ्वीच्या वातावरणात अत्यंत कमी उंचीवरून गेले त्यावरून ते बॅलेस्टिक क्षेपणास्त्र नव्हते हे स्पष्ट होत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रथम अंतराळात जाते. यानंतर, तेथून ते आपल्या लक्ष्याकडे जाते.

इंडियन एरोस्पेस डिफेन्स न्यूज म्हणजेच आयएडीएन या संरक्षणविषयक बातम्यांचे विश्लेषण करणाऱ्या वेबसाइटनुसार, ही चाचणी हायपरसोनिक ग्लाईड वाहनासारखी आहे. याचे कारण म्हणजे लो ट्रॅजेक्टरी म्हणजेच कमी उंचीवर उड्डाण करणे. एका ट्विटर थ्रेडमध्ये, IADN ने 2018 मधील चीनचे हायपरसोनिक क्षेपणास्त्र DF-ZF HGV च्या प्रक्षेपणाचा फोटो पोस्ट केला आणि त्याची तुलना अग्नी-5 शी केली आहे.

या दोन्ही क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण सारखेच असल्याचे सांगण्यात आले आहे. IADN ने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अग्नी-5 क्षेपणास्त्राच्या चाचणीची जी छायाचित्रे आलेली आहेत, ती पाहता याला बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी म्हणता येणार नाही. स्थानिक लोकांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की क्षेपणास्त्र स्टीप कर्व्ह म्हणजेच वेगाने वर गेल्यावर दिशा बदलते. तथापि, बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीमध्ये असे होत नाही.

IADN ने आपल्या दाव्यात म्हटले आहे की, अग्नी-5 क्षेपणास्त्र वर जाण्याऐवजी हायपरसोनिक ग्लाईडच्या उंचीपर्यंतच गेले.
IADN ने आपल्या दाव्यात म्हटले आहे की, अग्नी-5 क्षेपणास्त्र वर जाण्याऐवजी हायपरसोनिक ग्लाईडच्या उंचीपर्यंतच गेले.

DRDO 2018 पासून हायपरसोनिक क्षेपणास्त्र बनवण्यात प्रयत्नरत

संरक्षण तज्ञ लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) जेएस सोढी म्हणतात की अग्नी-5 ची श्रेणी आणि वेग हायपरसोनिक क्षेपणास्त्राप्रमाणेच असल्याने ते हायपरसोनिक क्षेपणास्त्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO ने 2020 मध्ये हायपरसोनिक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक वाहन म्हणजेच HSTDV ची यशस्वी चाचणी केली आहे. तसे पाहिले तर, DRDO 2018 पासून हायपरसोनिक क्षेपणास्त्रांवर काम करत आहे.

तसेच, भारत रशियाच्या सहकार्याने ब्रह्मोस-II क्षेपणास्त्र विकसित करण्यात व्यस्त आहे, जे हायपरसोनिक क्षेपणास्त्र आहे. ब्रह्मोस-II ची रेंज 1500 किमी पर्यंत असेल आणि त्याचा वेग ध्वनीच्या 7-8 पट (ताशी सुमारे 9000 किमी) असेल. त्याची चाचणी 2024 पर्यंत होणे अपेक्षित आहे.

आता जाणून घ्या हायपरसोनिक क्षेपणास्त्र म्हणजे काय?

तुम्हा सर्वांनी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पाहिला असेल. मोठा आवाज करत विजेचा लखलखाटही तुम्हाला आठवत असेल. या दरम्यान आकाशात लख्ख प्रकाश पसरत. परंतु चकाकल्यानंतर त्याच्या स्फोटाचा आवाज खूप वेळानंतर ऐकू येतो. म्हणजेच आवाज खूप मागे राहतो. हायपरसोनिक क्षेपणास्त्रे ही अशीच असतात.

ध्वनीच्या वेगापेक्षा 10 पट वेगवान. दुस-या शब्दात सांगायचे तर, हे क्षेपणास्त्र जेव्हा लक्ष्य नष्ट करते तेव्हा त्याचा आवाज 10 पट मागे असतो.

जाणून घ्या हायपरसोनिक मिसाइलशी संबंधित 5 खास गोष्टी

1. ध्वनीपेक्षा 5-10 पट जास्त वेग

सामान्यतः हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा वेग मॅक 5 म्हणजेच ताशी 5000-6000 किमी असतो. अग्नी-5 क्षेपणास्त्राचा वेग मॅक 24 म्हणजेच ध्वनीपेक्षा 24 पट जास्त आहे.

2. हायपरसोनिक क्षेपणास्त्रे पकडणे कठीण

या क्षेपणास्त्रांची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्त वेग, कमी उंची, म्हणजेच कमी उंचीवरून उड्डाण केल्यामुळे त्यांना अमेरिकेसह जगातील कोणत्याही रडारद्वारे पकडणे कठीण आहे. या कारणास्तव, जगातील कोणतीही क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा त्यांना भेदू शकत नाही.

3. अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम

हायपरसोनिक क्षेपणास्त्रे अनेक टन वजनी अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असतात. ही क्षेपणास्त्रे 480 किलो वजनाचे अण्वस्त्र वा पारंपारिक शस्त्र वाहून नेऊ शकतात.

4. सामान्य क्षेपणास्त्रांपेक्षा अधिक विध्वंसक

हायपरसोनिक क्षेपणास्त्रे भूगर्भातील शस्त्रास्त्रांची गोदामे नष्ट करण्याच्या बाबतीत सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांपेक्षा अधिक घातक असतात. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, हायपरसोनिक क्षेपणास्त्रे अत्यंत वेगवान असल्याने अधिक विध्वंसक असतात.

5. हवेत मार्ग बदलण्यास सक्षम

ही क्षेपणास्त्रे मॅन्युव्हरेबल टेक्नॉलॉजीमध्ये अर्थात हवेतच मार्ग बदलण्यात सक्षम असतात. यामुळे ते बदलणाऱ्या लक्ष्याचाही भेद घेऊ शकतात. या क्षमतेमुळे त्यांच्यापासून वाचणे कठीण ठरते.

हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचे किती प्रकार आहेत?

हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचे दोन प्रकार आहेत - हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रे आणि हायपरसोनिक ग्लाईड व्हेईकल.

1. हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र

हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र त्याच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी हाय-स्पीड जेट इंजिन वापरते. ज्यामुळे ते ध्वनीच्या वेगाच्या 5 पट (मॅक 5) वेग गाठू शकते. हे एक नॉन-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य करते. जे त्याच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करतात.

2. हायपरसोनिक ग्लाईड व्हेईकल

हायपरसोनिक ग्लाईड व्हेईकल रॉकेटमधून प्रक्षेपित केले जाते. प्रक्षेपणानंतर, ग्लाईड वाहन रॉकेटपासून वेगळे होते आणि कमीतकमी मॅक-5 च्या वेगाने लक्ष्याकडे सरकते.

हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या शर्यतीत रशिया अमेरिका-चीनच्या पुढे आहे

रशिया, अमेरिका आणि चीन अनेक वर्षांपासून हायपरसोनिक क्षेपणास्त्रांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. तथापि, या शर्यतीत रशिया आघाडीवर आहे.

रशिया : रशियाने युक्रेनमध्ये किंझल हायपरसोनिक क्षेपणास्त्राचा वापर केला आहे. याशिवाय त्याच्याकडे 2019 पासूनच अॅव्हनगार्ड नावाचे आणखी एक हायपरसोनिक क्षेपणास्त्र आहे. याशिवाय रशियाकडे 3M22 झिरकोन नावाचे जहाजविरोधी हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रही आहे.

अमेरिका: अमेरिका 2011 पासून हायपरसोनिक क्षेपणास्त्रे बनवण्यात व्यस्त आहे आणि त्यांनी अनेक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या आहेत. लॉकहीड मार्टिनने नुकतेच हायपरसोनिक कन्व्हेन्शनल स्ट्राईक वेपन आणि AGM-1831 एअर लाँच रॅपिड रिस्पॉन्स वेपन तयार करण्यासाठी अमेरिकन सरकारशी करार केला आहे. अमेरिकेला 2023 पर्यंत पहिले हायपरसोनिक क्षेपणास्त्र मिळण्याची शक्यता आहे.

चीन : गेल्या वर्षी जुलैमध्ये अमेरिकेने चीनवर हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा आरोप केला होता. रिपोर्ट्सनुसार, चीन डी-17 हायपरसोनिक क्षेपणास्त्र बनवण्याच्या अगदी जवळ आहे. त्यांनी 2018 मध्येच लिंगयून-1 नावाच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. तसेच DF-ZF हे हायपरसोनिक क्षेपणास्त्र तयार करण्याच्या अगदी जवळ आहे आणि त्यांनी मॅक 6 (सुमारे 7000 किमी/ता) वेग असलेल्या स्टॅरी स्काय-2 नावाच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी देखील केली आहे. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, चीनने गेल्या 5 वर्षांत शेकडो हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या आहेत, तर अमेरिकेने अशा केवळ 9 चाचण्या केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...