आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Officials Said; How To Defeat An Enemy In 6 Months Of Training, It Takes 5 Years For The Jawans To Be Ready

आता सैन्यात 4 वर्षांसाठी जवान:अधिकारी म्हणतात- जवान घडायला लागतात 5 वर्षे, शत्रूला 6 महिन्यांच्या प्रशिक्षणाने कसे हरवणार

अक्षय बाजपेयी17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैन्यात 12.64 लाख, वायुसेनेमध्ये 1.55 लाख आणि नौदलात 84 हजार सैनिक आहेत. सध्या सैन्यात भरती झालेल्या सैनिकांना 42 आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण दिले जात असल्याचे भारताच्या संरक्षण मंत्रालयाने 2017 मध्ये सांगितले होते.

प्रत्यक्षात 5 ते 6 वर्षांच्या सैनिकी सेवेनंतर जवान युनिटचा भाग बनतात. त्यांना सैन्य हेच त्यांचे घर असल्याचे लक्षात येते. त्यामुळे त्यांची तळमळ आणि समर्पण खूप उच्च पातळीवरचे असते.

निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया यांनी सांगितले की, माझ्या मते, अग्निपथ योजना 1.52 लाख कोटी रुपयांचे पेन्शन बिल वाचवण्यासाठी आणली आहे. यामुळे आपल्या संरक्षण क्षेत्राची ताकद कमी होईल.

ज्या जंगलात, पर्वतांमध्ये आणि उंचावर आपले जवान आता शत्रूंना झोडपून काढत आहेत, तिथे 4 वर्षांसाठी भरती झालेले हे सैनिक कसे काम करू शकतील, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

नवीन मुले टेक्नो-फ्रेंडली असल्याचे सांगितले जात आहे, परंतु या ठिकाणी तंत्रज्ञानाची नव्हे तर उत्कटता आणि स्पेशलायझेशन आवश्यक आहे, जे संपूर्ण समर्पण आणि योग्य प्रशिक्षणातून येते.

ज्या 75% कर्मचाऱ्यांना काढले जाईल ते काय करतील?

सरकार भरतीचा आधार बदलत नाहीये किंवा निकषांमध्येही बदल करण्यात आलेला नाही. केवळ सेवेच्या अटी बदलण्यात आल्या आहेत. म्हणजे भरतीसाठी येणारे तेच युवा असतील जे आतापर्यंत येत होते. फरक एवढाच असेल की आतापर्यंत आम्ही 17 वर्षे काम करत होतो आणि आता 4 वर्षे करू. 25% लोकांना पुढील 15 वर्षांसाठी नोकरीची संधी मिळेल मात्र, यातील 75% कर्मचारी काढून टाकले जातील?

इस्त्रायल आणि अमेरिकेतही असेच होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, इस्रायलची लोकसंख्या दिल्लीपेक्षा कमी आहे. तेथे जगण्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाला सैन्यात भरती होणे अनिवार्य आहे. आणि अमेरिकेत तर परिस्थिती अशी आहे की, भरती अधिकारी घरोघरी जाऊन सैन्यात भरती होण्यास सांगतात, कारण तिथल्या लोकांना चैन करण्याची सवय आहे.

आपल्या देशात तशी परिस्थिती नाही. आमची मुलं 4 वर्षांपूर्वीपासून सैन्यात भरती होण्याची तयारी करत आहेत, कारण त्यांना माहीत आहे की, एकदा सैन्यात दाखल झाले की, संपूर्ण कुटुंब सुरक्षित होईल.आता कोणी 4 वर्षाच्या नोकरीसाठी 4 वर्ष आधीच तयारी का करेल.

सैन्य नेहमीच तरुण असेल

दुसरीकडे, निवृत्त लेफ्टनंट जनरल सतीश दुआ म्हणाले की, सरकारची ही कसरत लष्कराला तरुण बनवण्यासाठी आहे. जवान जास्तीत जास्त 25 वर्षे सैन्यात राहतील. यामुळे सैन्य नेहमीच तरुण राहील. नवीन मुलांना तंत्रज्ञानाशी जुळवून घेता येते. याचाही फायदा होईल आणि सरकारचा पेन्शन, पगार खर्चही वाचेल.

लष्करासाठी काही आव्हाने असतील, पण प्रशिक्षण कमी वेळेतही करता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. इतर देशांमध्ये सक्तीने भरती केली जाते, त्यामुळे जवानांना प्रेरणा मिळत नाही. आपल्या देशात एक फायदा आहे की, आपल्याला प्रेरित जवान मिळतील.

मला योजनेबद्दल फारशी माहिती नाही

अग्निपथ योजनेमुळे लष्कराची रचना बिघडणार का? प्रसारमाध्यमांच्या या प्रश्नावर माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री जनरल व्हीके सिंह म्हणाले की, कोणतीही नवीन गोष्ट समोर येत नाही तोपर्यंत त्याबद्दल माहिती नसते. ज्या टीमने ही योजना बनवली त्या टीमचा मी भाग नाही, मला त्याबद्दल फारशी माहिती नाही. योजना नुकतीच जाहीर झाली आहे, बघूया वेळेवर काय होते आणि काय नाही.

एकरकमी 12 लाख मिळतील

या योजनेत 17.5 ते 21 वर्षे वयोगटातील मुले अर्ज करू शकतात. त्यांना निश्चित पगार मिळेल. पहिल्या वर्षी 30 हजार, दुसऱ्या वर्षी 33 हजार, तिसऱ्या वर्षी 36500 आणि चौथ्या वर्षी 40 हजार रुपये मिळणार आहेत.

सेवा निधीसाठी एकूण योगदान 10.04 लाख असेल. जवानाला व्याजासह चार वर्षांनी 11.71 लाख रुपये मिळतील. सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास कुटुंबाला एक कोटी रुपये दिले जातील. येत्या 90 दिवसांत या योजनेत भरती सुरू होईल.

बातम्या आणखी आहेत...