आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Agricultural Costs Tripled In 10 Years, Production Cost Not Even Doubled; Main Crops Were Surveyed In Six States

दिव्य मराठी विशेष:शेती खर्च 10 वर्षांत तिप्पट, उत्पादन किंमत दुप्पटही नाही; सहा राज्यांत मुख्य पिकांचा आढावा घेतला

अहमदाबाद/ औरंगाबाद/रायपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकार दरवर्षी हमीभाव वाढवत आहे, मात्र यावर खरेदीत निष्फळ
  • शेतीच्या एकूण खर्चात डिझेल खर्चाची 20% आणि कृषी मजुरी 30-35% पर्यंत हिस्सेदारी
Advertisement
Advertisement

विविध सरकारी दावे आणि योजना असतानाही आपले शेतकरी दिवसेंदिवस दारिद्रयात का जात आहेत, या प्रश्नाचे उत्तर शेतीचा खर्च आणि उत्पन्नाला मिळणाऱ्या भावात दडले आहे. आकडेवारीनुसार, गेल्या १० वर्षांत आमच्या देशातील बहुतांश पिकांचा खर्च तिपटीपर्यंत वाढला, मात्र उत्पन्नाला मिळणाऱ्या किमतीत दुपटीपर्यंतही वाढ झाली नाही. कापसाशिवाय अन्य सर्व पिकांची स्थिती एकसारखीच आहे. सरकारच्या हमीभावावर खूप जास्त खरेदी होत नसल्यानेही शेतकऱ्यांना बाजारातून योग्य भाव मिळू शकत नाही. शेतकऱ्यांची स्थिती पाहण्यासाठी दिव्य मराठी नेटवर्कने गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, महाराष्ट्र, हरियाण आणि पंजाबच्या प्रमुख पिकांचा आढावा घेतला. गुजरातमध्ये या वर्षी रबी हंगामात ४५ लाख टन गव्हाचे उत्पादन झाले. मात्र, सरकार हमीभावावर सुमारे २७ हजार टन गव्हाची खरेदी करू शकली. हे एकूण उत्पादनाच्या केवळ ०.५०% समान आहे. येथे गव्हाचा पेरणी खर्च १० वर्षांत २२८% वाढला आहे. एवढ्याच कालावधीत ठोक बाजारपेठांत गव्हाचा भाव केवळ ३२% वाढला. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने हमीभावांत वाढ केली नाही तरी चालेल, मात्र सरकारने त्यांचा उत्पादित केलेला संपूर्ण माल खरेदी केला पाहिजे. गुजरातमध्ये भुईमूग, कापूस आणि धान सर्वात जास्त पीक घेतले जाते. येथे भुईमुगाचा पेरणी खर्च १० वर्षांपूर्वी प्रतिएकर ११,००० रुपये होता. आता येथे २३,७५० रुपये आहे. या पिकाची किंमत ३,५०० ते ३,७५० रु. प्रतिक्विंटल होती. ही आतापर्यंत ६ हजार ते ६५०० रु. क्विंटलपर्यंत पोहोचली आहे. शेतकरी विक्रम सिंहदेव यांच्यानुसार, १० वर्षांपूर्वी धानाचे पिकासाठी प्रतिएकर ४ हजार रुपये खर्च येत होता. आता वाढून १० हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बियाणे खरेदी करावे लागल्यास एक हजार रुपयांचा खर्च आणखी वाढतो. दहा वर्षांपूर्वी प्रतिक्विंटल धानाची किंमत १,२५० रु. होती. आता ही १,८५० रु. आहे. मात्र, राज्य सरकारकडून मिळणाऱ्या ६५० रुपयांच्या बोनसमुळे एकूण किंमत २,५०० रु. प्रतिक्विंटल होते. म्हणजे, खर्च दुप्पट वाढला आहे आणि किंमत दुप्पट झाली. े १० वर्षांमध्ये उत्पन्नात जवळपास एक तृतीयांश वाढ होऊनही शेतकऱ्यांचे एकूण उत्पन्न १० वर्षांपूर्वीच्या पातळीवर आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रामुख्याने कापूस हे असे एक पीक आहे, ज्याच्या भावात गुंतवणूक खर्चाच्या तुलनेत जास्त वाढ. १ एकर कापूस लावण्यासाठीचा खर्च दहा वर्षांपूर्वी १० ते १२ हजार रु. होता. हा आता वाढून २२ ते २५ हजार रुपये राहिला आहे. कापसाच्या भावात चौपट वाढ झाली आणि हा १२०० रु प्रतिक्विंटलवरून वाढून ५००० रु. प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला आहे.

 

Advertisement
0