आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Air Force | 4 Rafal Coming To India In A Month; This Will Increase The Strength Of Fighting Simultaneously On Two Fronts: Airchief Marshal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हवाई दलाचे सर्व लष्करी सराव रद्द:4 राफेल महिनाभरात भारतात; यामुळे शक्ती अनेक पट वाढली : हवाई दल प्रमुख

नवी दिल्ली (मुकेश कौशिक)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
तेजसने उड्डाण करताना हवाईदल प्रमुख. - Divya Marathi
तेजसने उड्डाण करताना हवाईदल प्रमुख.
  • हवाई दल प्रमुख आर. के. एस. भदोरिया यांची भास्करशी विशेष बातचीत

हवाई दलाने इतर देशांसोबत केला जाणारा संयुक्त लष्करी सराव सहा महिन्यांसाठी रद्द केला आहे. याशिवाय महिनाभरात फ्रान्सहून चार नवी राफेल विमाने भारतात आणली जात आहेत. या विमानांच्या तैनातीमुळे हवाई दलाची दोन आघाड्यांवर लढण्याची शक्ती कित्येक पटींनी वाढणार आहे. भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर हवाई दल प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी दैनिक भास्करशी विशेष मुलाखतीत ही माहिती दिली. जगात अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या यादीत आघाडीवर असलेली राफेल विमाने अंबाला तळावर तैनात केली जातील. येथून काही क्षणांत लडाख पोहाेचता येते. सध्या याच भागांत भारत-चीनच्या जवानांदरम्यान तणाव आहे.

दरम्यान, हवाई दलाचा संयुक्त सराव कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. मात्र, सीमेवर असलेला तणाव पाहता हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. हवाई दल गेल्या काही दिवसांपासून दोन आघाड्यांवर एका वेळी युद्धाची तयारी करताना दिसत आहे. गेल्या वर्षी गगनशक्ती लष्करी सराव करून आपली क्षमता व यशाचे मूल्यमापन करण्यात आले होते. चार रफाल विमाने भारतात आल्यानंतर शक्ती कित्येक पटीने वाढेल. हवाईदल प्रमुख म्हणाले, सद्यस्थितीत आम्ही आंतरराष्ट्रीय लष्करी सरावात सहभागी होण्याचा निर्णय रद्द केला आहे. २०२१ मध्ये अशा संयुक्त सरावात सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय त्या वेळी घेतला जाईल. आम्ही सराव सुरू केल्यानंतर कोविड-१९ बाबतचे नवे नियम संयुक्तरीत्या निश्चित केले जातील. कोरोनामुळे फ्रान्सकडून रफाल विमाने मिळण्यास विलंब झाला आहे. मेरिनयाक तळावर प्रशिक्षण घेणारे भारताचे पायलट पुढील महिन्यांत ही रफाल विमाने भारतात घेऊन येतील. लडाख आणि ईशान्य भारतात सीमेजवळ धावपट्टया तयार करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. यामुळे नागरिक तसेच हवाईदलाच्या कर्मचाऱ्यांना जा-ये करण्यास चांगली मदत होणार आहे.

८३ तेजस घेण्यास प्रथम प्राधान्य, त्यानंतर एलसीए मार्क-२ वर लक्ष देणार

हवाईदल प्रमुखांनी सांगितले की, ८३ एलसीए तेजससोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्र खरेदीला प्राधान्य दिले जाणार आहे. निधीच्या तरतुदींनुसार काही निर्णयांवर विचार केला जाईल. यातून २५ टक्के कपात केली जाणार आहे. हवाईदलाने गरजेनुसार धोरण ठरवले असून आम्ही ८३ एलसीए तेजस मिळवल्यानंतर एलसीए मार्क-२ आणि पाचव्या पिढीची स्वदेशी लढाऊ विमाने एमका वर लक्ष देऊ. आमचा फिल्ड रडार्स, सेंसर्स आणि शस्त्रास्त्रांचा स्वदेशी पुरवठा यावर भर असेल. यामुळे स्वावलंबनाच्या मोहिमेला गती येईल. अंतराळासाठी गगनयान मोहिमेत सहभागी वैमानिकांना रशियाने पुन्हा प्रशिक्षण देणे सुरू कले आहे.

बातम्या आणखी आहेत...