आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:विमान इंधनात 50 टक्के इथेनॉल वापराचे हवाई दलात परीक्षण

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इथेनॉलमिश्रित इंधन सुरक्षित आहे?
हे पूर्णपणे सुरक्षित आहे. इथेनॉल मिश्रित इंधनाच्या वापरासाठी चारचाकी व दुचाकीच्या इंजिनात थोडे बदल करण्याची गरज आहे. परंतु विमानांच्या इंजिनात काहीही बदलाची गरज नाही. विमानाच्या इंधनात ५० टक्क्यापर्यंत इथेनॉल मिसळल्यास कार्बन उत्सर्जन ८० टक्के कमी होऊ शकते. ब्राझीलच्या लढाऊ विमानांत अशाच इंधनाचा वापर केला जात आहे. अलीकडेच भारतीय हवाई दलाने देखील परीक्षणासाठी मंजुरी दिली आहे.

भारतात इथेनॉलमिश्रित इंधन मिळते का?
भारतात तूर्त १० टक्के इथेनॉलची तरतूद लागू आहे. सध्या ते १५ राज्यांत उपलब्ध आहे. इतर राज्यांत ते कमी टक्क्यांत मिळते. सरकारने तेल कंपन्यांना इथेनॉलचे पंप सुरू करण्याची सूचना केली आहे. सध्या देशात केवळ पुण्यात तीन इथेनाॅल पंप आहेत. सरकारने जूनमध्ये पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टाला २०३० ऐवजी २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता.

जगभरात इथेनॉलमिश्रित इंधनाचा वापर कुठे केला जातो?
भारत, ब्राझील तसेच अमेरिकेचा पॅटर्न लागू करण्याच्या प्रयत्नात आहे. ब्राझीलमध्ये ई-२७ ते १०० टक्के इथेनॉल असलेले इंधन पंप आहेत. येथे लोकांच्या क्रयशक्तीनुसार पेट्रोल किंवा पूर्ण इथेनॉलचाही पर्याय आहे.

अमेरिकेत इथेनॉल किती टक्के मिसळले जाते?
अमेरिका वार्षिक इंधनाच्या उपलब्धतेनुसार इथेनॉल ब्लँडिंगचा निर्णय घेते. यंदा तेथे इ-३० इंधनाची विक्री केली जात आहे. सामान्य, फ्लेक्स फ्युल अशा दोन्ही वाहनांसाठी इंधन उपलब्ध होते.

इथेनॉल उत्पादन किती आहे?
जगभरातील इथेनॉल उत्पादनात ब्राझीलची भागीदारी ३१ टक्के आहे. अमेरिका इथेनॉलचा मोठा उत्पादक,निर्यातक आहे. जगभरातील ५३ टक्के इथेनॉलचे उत्पादन केले जाते. कॅनडा तिसऱ्या स्थानी आहे. कॅनडात फ्लेक्स फ्युल वाहने जास्त आहे. अमेरिकेतून २५ टक्के इथेनॉल कॅनडाला जाते. अमेरिकेेतून १५ टक्के इथेनॉल ब्राझील, भारतातही येते.

उर्वरित पिकांपासूनही इथेनाॅल एवढ्या प्रमाणात तयार हाेईल ?
भारतात मक्याचे उत्पादन प्रति हेक्टर ३ टन आहे. जगभरात हे प्रमाण सरासरी ६ टन आहे. देशात उत्पादन हेक्टरी ५ टन झाल्यास गरज भागवता येईल.
सध्या देशात ३३५ काेटी लिटर इथेनाॅलची निर्मिती हाेते आणि २०२५ पर्यंत वार्षिक दीड हजार काेटी लिटर इथेनाॅलचे उत्पादन सुरू हाेईल.

इथेनाॅल उत्पादन वाढवण्यासाठी उसाचे उत्पादन वाढवावे लागेल?
त्याची आवश्यकता नाही. सध्या देशातील एकूण इथेनाॅलमध्ये साखर कारखान्यांचे याेगदान ९० टक्के आहे. देशातील संपूर्ण सरप्लस साखरेपासून देखील इथेनाॅलचे उत्पादन झाले तरी २०२५ पर्यंत साखर कारखान्यांतूनही ७५० ते ८०० काेटी लिटरपर्यंत इथेनाॅल तयार हाेऊ शकेल.

मागणी १००० काेटी लिटरपर्यंत जाईल, मग तूट कशी भरून काढणार?
मका, तांदळासारखी धान्ये यावर आधारित प्रकल्पातून देखील सुमारे ७०० लिटर इथेनाॅल तयार करण्याची याेजना आहे. भारतात सध्या १७ लाख टन धान्य सरप्लस आहे. इथेनाॅलमध्ये त्याचा वापर हाेऊ शकताे. पाण्याचा वापर प्रति महिन्याच्या हिशेबाने पाहिला जावा.

त्यात शेतकऱ्यांना काय लाभ?
साखर कारखाना संघटनेचे अविनाश वर्मा म्हणाले, इथेनाॅलमुळे साखर कारखान्यांतील व्यवहार सुधारेल. थकबाकी तत्काळ मिळेल.

मिश्रित इंधनाची वाहने कोठे चालतात? भारतात कधीपर्यंत उपलब्ध होतील?
फ्लेक्स फ्युल व्हेइकल म्हणजे १०० टक्के इथेनॉलचा वापर करता येऊ शकेल अशी वाहने.
- एका अभ्यासानुसार १०० टक्के इथेनाॅलमुळे युराे-६ वाहनांच्या तुलनेत ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन ७७ टक्क्यांनी कमी हाेते.
- भारत सरकार लवकरच फ्लेक्स फ्युल व्हेइकलचे नियम घेऊन येणार आहे. त्यानंतर आॅटाे कंपन्यांना फ्लेक्स फ्युल इंजिन लावणे बंधनकारक हाेणार आहे. त्यासाठी सरकारने सर्वाेच्च न्यायालयाची परवानगी मागितली आहे.
- सरकारच्या आवाहनानंतर काही आॅटाे कंपन्यांनी अशा प्रकारच्या वाहनांची निर्मिती देखील सुरू केली आहे. अद्याप बाजारात नाहीत.
- ब्राझीलमध्ये रस्त्यावर धावणारी ८५ टक्के वाहने फ्लेक्स फ्युल व्हेइकल आहेत. येथे अशा प्रकारच्या वाहनांचे ८० हून जास्त पर्याय आहेत.

बातम्या आणखी आहेत...