आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Amar Jawan Jyoti History (India Gate); Memorial For Indian Soldiers Who Killed In 1971 India Pakistani War

एक्सप्लेनर:अमर जवान ज्योतीवर आहे अज्ञात शहीद जवानाची रायफल आणि हेल्मेट, जाणून घ्या 50 वर्षांपासून कशी तेवत आहे ज्योती

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

इंडिया गेटवर गेल्या 50 वर्षांपासून सलग तेवत असलेल्या अमर जवान ज्योतीचे राष्ट्रीय युद्ध स्मारकातील अमर जवान ज्योतीमध्ये विलिनीकरण केले जात आहे. अमर जवान ज्योतीची स्थापना 1972 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी 1971 भारत-पाक युद्धाच्या शहीदांच्या स्मरणार्थ केली होती. अमर जवान ज्योतीच्या स्थानांतरणाविषयी मोदी सरकारच्या निर्णयावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.

चला जाणून घेऊया की, अखेर काय आहे अमर जवान ज्योती? काय आहे याचा अर्थ? याची ज्योत कशी गेल्या 50 वर्षांपासून सलग तेवत आहे? कोण करते याची देखरेख?

अमर जवान ज्योतीचा इतिहास?

3 डिसेंबर 1971 ला भारत-पाकिस्तानमध्ये लढाई सुरु झाली. 13 दिवसांपर्यंत हा संघर्ष सुरु होता. 16 डिसेंबरला भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या 93,000 सैनिकांना ताब्यात घेतले आणि बांग्लादेशच्या 7.5 कोटी लोकांना स्वातंत्र्य दिले. या युद्धात भारताचे 3,843जवान शहीद झाले.

त्या शहीदांच्या स्मरणार्थ त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अमर ज्योती जाळण्याचा निर्णय घेतला. 26 जानेवारी 1972 ला इंडिया गेटवर अमर जवान ज्योतीचे उद्घाटन करण्यात आले.

येथे काळ्या रंगाचे एक स्मारक बनलेले आहे. ज्याच्यावर अमर जवान असे लिहिले आहे. यावर L1A1 सेल्फ लोडिंग रायफल, एक सैन्य हेलमेट ठेवले आहे. सलग पाच दशकांपासून ही ज्योत तेवत आहे.

अमर जवान ज्योतीमध्ये लावली आहे अज्ञात सैनिकाची रायफल आणि हेल्मेट

 • अमर जवान ज्योतीची सर्वात मोठी खासियत ही आहे की, याची एक ज्योत नेहमी तेवत असते.
 • अमर जवान ज्योतीमध्ये एक संगमरमरचा चबूतरा आहे, हा चबूतरा 4.5 मीटर रुंद आणि 1.29 मीटर उंच आहे.
 • या चबूतऱ्यावर एक स्मारक आहे. या स्मारकाच्या चारही बाजूंनी सोनेरी शब्दात 'अमर जवान' असे लिहिले आहे.
 • याच्या माथ्यावर एक L1A1 सेल्फ-लोडिंग रायफलच्या बॅरलवर एक अज्ञात शहीद सैनिकाचे हेल्मेट लावले आहे.
 • अमर जवान ज्योतीच्या संगमरमरच्या चबुतऱ्याच्या चारही कानांवर चार कलश आहे. ज्यामध्ये एकाची ज्योत नेहमी तेवत राहते.
 • आपल्या उद्घाटनानंतरपासून अमर जवान ज्योतीची ही ज्योत गेल्या 50 वर्षांपासून सलग तेवत आहे.
 • याच्या इतर तीन ज्योती स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जाळल्या जातात. म्हणजेच 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला अमर जवान ज्योतीची चारही ज्योती जाळल्या जातात.

अमर जवान ज्योतीची ज्योत पहिले LPG ने तेवत होती, आता यासाठी CNG चा वापर होतो

 • अमर जवान ज्योतीची ज्योत नेहमी तेवत राहावी यासाठी विशेष व्यवस्था केली गेली आहे.
 • अमर जवान ज्योतीच्या प्रत्येक ज्योतला जाळण्यासाठी एक वेगळा गॅस बर्नर लावला आहे.
 • 1972 ते 2006 पर्यंत अमर जवानची ज्योत जाळण्यासाठी लिक्विड पेट्रोलियम गॅसचा वापर केला जात होता.
 • 2006 पर्यंत एक गॅसचा सिलिंडर जवळपास 36 तास चालत होता. तेव्हा सिलिंडर स्मारकाच्या छतावर ठेवला जात होता.
 • 2006 नंतर अमर जवान ज्योतीचा गॅस जाळण्यासाठी कंप्रेस्ड नॅचलर गॅस (CNG) चा वापर होऊ लागला.
 • यासाठी 2005 मध्ये कस्तूरबा गांधी मार्गाने इंडिया गेटपर्यंत जवळपास अर्धा किलोमीटर लांब अंडरग्राउंड गॅस पाइपलाइन टाकण्यात आली आहे.
 • आता या गॅसचा सप्लाय इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) करते. CNG हे LPG पेक्षा स्वस्त आणि सुरक्षित असल्यामुळे याचा वापर केला जातो.

कोण करते अमर जवान ज्योतीची देखरेख?

 • अमर जवान ज्योतीवर 24 तास लष्कर, वायुसेना आणि नौसेनाचे जवान तैनात राहतात. येथे तिन्ही सैन्यांचे झेंडेही फडकतात.
 • अमर जवान ज्योती नेहमी तेवत राहावी, हे पाहण्यासाठी एक व्यक्ती ज्योतच्या मेहराबच्या खाली असलेल्या खोलीत नेहमी राहतो.

26 जानेवारीला अमर जवान ज्योतीवर काय असते?
1972 मध्ये उद्घाटन झाल्यापासून दरवर्षी, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडपूर्वी अमर जवान ज्योती येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहतात.

2019 मध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या निर्मितीनंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त अमर जवान ज्योतीऐवजी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रथा 2020 पासून सुरू झाली आहे.

राष्ट्रीय युद्ध स्मारक काय आहे?
स्वतंत्र भारतात देशासाठी प्राण गमावलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ 2019 मध्ये नवी दिल्लीतील इंडिया गेटच्या परिसरात राष्ट्रीय युद्ध स्मारकाची स्थापना करण्यात आली आहे. ते जानेवारी 2019 मध्ये पूर्ण झाले आणि 25 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.

नॅशनल वॉर मेमोरिअलमध्ये चीन आणि पाकिस्तानसोबतच्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांची नावे, 1961 मधील गोवा युद्ध आणि श्रीलंकेतील ऑपरेशन पवन आणि जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या विविध ऑपरेशन्समध्ये शहीद झालेल्या सैनिकांची नावे सुवर्णाक्षरात कोरलेली आहेत.

राष्ट्रीय युद्ध स्मारकात चार चक्रे आहेत. अमर चक्र, वीरता चक्र, त्याग चक्र आणि सुरक्षा चक्र. त्यात 25,942 सैनिकांची नावे कोरलेली आहेत, ज्यांनी स्वातंत्र्यानंतर देशासाठी युद्ध आणि संघर्षात आपले प्राण दिले.

21 जानेवारी 2022 रोजी अमर जवान ज्योती येथे 50 वर्षांपासून अखंड तेवत असलेली ज्योत राष्ट्रीय युद्ध स्मारकात हलवली जात आहे.

इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात येणार
अमर जवान ज्योतीचे इंडिया गेटवरुन राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीनीकरण होत असताना, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्याची घोषणा केली.

एका ट्विटमध्ये पीएम मोदी म्हणाले की, 'ज्या वेळी संपूर्ण देश नेताजी सुभाष बोस यांची 125 वी जयंती साजरी करणार आहे, तेव्हा मला कळवायला अतिशय आनंद होत आहे की, इंडिया गेटवर ग्रॅनाइटपासून बनवलेला त्यांचा भव्य पुतळा बसवला जाईल. नेताजींबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे हे प्रतीक असेल.'

नेताजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त 23 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. जोपर्यंत नेताजींची मूर्ती तयार होत नाही, तोपर्यंत नेताजींचा होलोग्राम पुतळा तिथे उपस्थित राहणार आहे. याआधी 60 च्या दशकात इंडिया गेटवर ब्रिटनचे किंग जॉर्ज पंचम यांचा पुतळा बसवण्यात आला होता. आता हा पुतळा तेथून काढून कॉरोनेशन पार्कमध्ये पाठवण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...