आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • America Has Left 8,84,311 Weapons And Military Equipment In Afghanistan, Fighter Helicopters Planes Are In The Hands Of Taliban

तालिबानच्या हातात अमेरिकन शस्त्रांचा खजिना:अमेरिकेची 8.84 लाख शस्त्रे आणि लष्करी वाहने अफगाणिस्तानात राहिली, आता आधुनिक विमाने आणि हेलिकॉप्टरवरही तालिबानचा ताबा

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तालिबान आता ही अत्याधुनिक शस्त्रे वापरण्याची तयारी करत आहे

19 व्या शतकाच्या सुरुवातीपासून अफगाणिस्तान हे महासत्तांसाठी खेळाचे मैदान राहिले आहे. 19 व्या शतकात ब्रिटन, 20 व्या शतकात रशिया आणि 21 व्या शतकात अमेरिका.... प्रत्येक वेळी सुरुवातीच्या विजयानंतर तिन्ही महासत्तांना शेवटी पराभूत व्हावे लागले आहे.

असे असूनही, महासत्तेचा खेळ असा राहिला की, 1989 मध्ये रशियन सैन्याने माघार घेतल्यानंतर आधी मुजाहिद्दीन आणि नंतर तालिबान रशियन AK 47 सह T -55 टँकवर स्वार झालेले दिसले आणि आता हे तालिबानी हमवी (humvee) या अमेरिकन लष्करी वाहनांवर स्वार होऊन हातात M16 रायफल घेतलेले दिसत आहेत.

फोर्ब्सच्या अंदाजानुसार, अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये 8,84,311 आधुनिक लष्करी शस्त्रे सोडली आहेत. यामध्ये M16 रायफल, M4 कार्बाइन्स, 82 mm मोर्टार लाँचर्ससारख्या इंफेंट्री शस्त्रांसह humvee सारखे लष्करी वाहन, ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर, A29 लढाऊ विमान, नाईट व्हिजन, दळणवळण आणि पाळत ठेवण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे यांचा यात समावेश आहे. 2003 पासून ही लष्करी उपकरणे अफगाण सैन्य आणि पोलिसांसाठी खरेदी केली जात होती. फोर्ब्सने अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या पेंटागॉनच्या डिपार्टमेंट ऑफ लॉजिस्टिक एजन्सी (DLA) च्या डेटाबेसचा अभ्यास करून हा डेटा गोळा केला आहे.

खरं तर, तालिबानच्या विरोधात युद्ध पुकारणाऱ्या अमेरिकेने 2003 पासून अफगाण सैन्य आणि पोलिसांना शस्त्रे आणि प्रशिक्षणावर 83 अब्ज डॉलर म्हणजेच 6 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च केले. अफगाणिस्तानमध्ये शिल्लक असलेल्या लष्करी उपकरणांमध्ये 5.99 लाखांहून अधिक शुद्ध शस्त्रे, 76 हजारांहून अधिक लष्करी वाहने आणि 208 लष्करी विमानांचा समावेश आहे.

तज्ज्ञांच्या मते, अफगाण सैन्याने माघार घेतल्यानंतर आणि सरकार पायउतार झाल्यावर यातील बहुतेक शस्त्रे तालिबानच्या हाती लागली आहेत. इतकी मोठी शस्त्रे मजबूत सैन्य उभी करण्यासाठी पुरेशी आहेत.

अमेरिकन सरकारने वेबसाइटवरून ऑडिट रिपोर्ट काढून टाकला
विशेष गोष्ट म्हणजे जो बायडनचे प्रशासन अफगाणिस्तानसाठी खरेदी केलेली शस्त्रे आणि लष्करी उपकरणांचे ऑडिट अहवाल लपवत आहे. फोर्ब्स डॉट कॉमनुसार, यासंदर्भातील दोन महत्त्वाचे अहवाल सरकारी वेबसाइटवरून काढून टाकण्यात आले आहेत. अमेरिकेत सरकारी खर्चाशी संबंधित वॉच डॉग ओपन द बुक्स डॉय कॉम (openthebooks.com) ने हे दोन्ही अहवाल आपल्या वेबसाइटवर पोस्ट केले आहेत.

अफगाण हवाई दलाचे A-29 विमान तालिबानने ताब्यात घेतले आहे. अनेक अमेरिकन ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर देखील तालिबानच्या ताब्यात आहेत.
अफगाण हवाई दलाचे A-29 विमान तालिबानने ताब्यात घेतले आहे. अनेक अमेरिकन ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर देखील तालिबानच्या ताब्यात आहेत.

गेल्याच महिन्यात अमेरिकेतून सात विमाने दाखल झाली होती
अलीकडेच तालिबानने अमेरिकेचे ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर आणि ए - 29 सुपर तुकानो हल्ला करणारे विमान ताब्यात घेतले. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने गेल्याच महिन्यात अमेरिकेतून आलेल्या सात नवीन हेलिकॉप्टरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची किंमत 150 ते 270 कोटी असू शकते.

तालिबान विमानांचे भाग विकून लाखो डॉलर्स कमवू शकतो
अमेरिकन लढाऊ विमानांबाबत तज्ज्ञांची दोन मते आहेत. प्रथम - तालिबानला या विमानांचा वापर माहीत नाही, परंतु त्याचे भाग खूप महाग किंमतीला विकू शकतात. अफगाण सैन्याला दिलेल्या काही विमानांची इंधन टाकी 35 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 25 लाख रुपयांना विकली जाऊ शकते. काही

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तालिबान या विमानांचा वापर अफगाण सैन्याच्या प्रशिक्षित वैमानिकांना स्वतःसोबत जोडून किंवा पाकिस्तानकडून प्रशिक्षण घेऊन करू शकतो. PC-12 टोही आणि पाळत ठेवणारी विमाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. तालिबानच्या ताब्यात ही विमाने येणे अत्यंत चिंताजनक आहे.

1250 कोटींचे स्कॅन ईगल ड्रोनही गायब
2017 मध्ये अमेरिकन सैन्याने 1250 कोटी रुपयांचे स्कॅन ईगल ड्रोन गमावले होते. हे ड्रोन अफगाणिस्तान राष्ट्रीय सैन्याला त्यांच्या संरक्षणासाठी देण्यात आले होते. अफगाण सैन्याने त्यांचा लगेच वापर केला नाही, पण काही महिन्यांनी अफगाण सैन्याला दिलेले ड्रोन गायब असल्याचे आढळून आले. स्पेशल इन्स्पेक्टर जनरल फॉर अफगाणिस्तान रिकन्स्ट्रक्शन (SIGAR) चा हा लेखापरीक्षण अहवाल त्यांच्या वेबसाईटवरूनही काढून घेण्यात आला आहे.

अमेरिकन कॅगच्या मते 6 लाख इंफेंट्री शस्त्रे
भारतीय कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल (CAG) प्रमाणे अमेरिकेत कार्यरत असलेल्या गव्हर्नमेंट अकाउंटेबिलिटी ऑफिस (GAO) च्या अहवालानुसार, अमेरिकेने 2003 पासून अफगाण सशस्त्र दलांना 6 लाख इंफेंट्री शस्त्रे दिली आहेत. यामध्ये एम 16 रायफल्स, सुमारे 1.62 दळणवळण साधने आणि 16 हजारांहून अधिक नाइट व्हिजन यांचा समावेश होता.

जर तालिबानने ही शस्त्रे वापरण्याचे तंत्र अवगत केले नाही तर ते लवकरच निरुपयोगी होतील. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ही उपकरणे ज्या देशांना अमेरिकन तंत्रज्ञान मिळवायचे आहे त्यांना विकली जाऊ शक्यता नाकारता येणार नाही.

15 ऑगस्ट रोजी काबूल ताब्यात घेतल्यानंतर अमेरिकन एम 16 रायफल्ससह चौकीवर तैनात तालिबानी.
15 ऑगस्ट रोजी काबूल ताब्यात घेतल्यानंतर अमेरिकन एम 16 रायफल्ससह चौकीवर तैनात तालिबानी.
अफगाणिस्तानमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर हेरात येथे अमेरिकन लष्करी वाहन humvee वर सशस्त्र तालिबान.
अफगाणिस्तानमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर हेरात येथे अमेरिकन लष्करी वाहन humvee वर सशस्त्र तालिबान.

तालिबान अत्याधुनिक शस्त्रे वापरण्याची तयारी करत आहे
इंटेलिजन्सच्या अंदाजानुसार, आतापर्यंत तालिबान हमवीसह 2,000 हून अधिक चिलखत वाहने, UH-60 ब्लॅक हॉक्स अटॅक हेलिकॉप्टरसह 40 पेक्षा जास्त लष्करी विमाने आणि स्कॅन ईगल ड्रोन्स आपल्या ताब्यात घेऊन ते वापरण्याची तयारी करत आहे.

काबूलमध्ये तालिबान्यांजवळ रॉकेट-फायर हँड ग्रेनेड (आरपीजी) लाँचर्स दिसले. या लाँचरवर लांब पल्ल्यावर निशाणा साधण्यासाठी यूएस-निर्मित इन्फ्रारेड लेझर डेजिगनेटर PEQ18⁠ लागले आहेत.
काबूलमध्ये तालिबान्यांजवळ रॉकेट-फायर हँड ग्रेनेड (आरपीजी) लाँचर्स दिसले. या लाँचरवर लांब पल्ल्यावर निशाणा साधण्यासाठी यूएस-निर्मित इन्फ्रारेड लेझर डेजिगनेटर PEQ18⁠ लागले आहेत.
तालिबानच्या वेबसाईटवर पोस्ट करण्यात आलेल्या एका छायाचित्रात एक व्यक्ती अमेरिकन कमांडो फोर्सच्या विशेष FN SCAR 7.62mm रायफलसह दिसत आहे. ही रायफल अमेरिकन मरीन कमांडो किंवा आर्मी रेंजर्स वापरतात.
तालिबानच्या वेबसाईटवर पोस्ट करण्यात आलेल्या एका छायाचित्रात एक व्यक्ती अमेरिकन कमांडो फोर्सच्या विशेष FN SCAR 7.62mm रायफलसह दिसत आहे. ही रायफल अमेरिकन मरीन कमांडो किंवा आर्मी रेंजर्स वापरतात.
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी 15 ऑगस्ट रोजी देश सोडल्यानंतर तालिबानने राष्ट्रपती भवन ताब्यात घेतला. या दरम्यान, जगभरात प्रसारित झालेल्या छायाचित्रात तालिबान अमेरिकन रायफल्ससह दिसत होते.
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी 15 ऑगस्ट रोजी देश सोडल्यानंतर तालिबानने राष्ट्रपती भवन ताब्यात घेतला. या दरम्यान, जगभरात प्रसारित झालेल्या छायाचित्रात तालिबान अमेरिकन रायफल्ससह दिसत होते.

सिनेटर्स म्हणाले - तालिबानच्या ताब्यात असलेले ब्लॅक हॉक पाहून त्यांना धक्का बसला आहे
अमेरिकेतील रिपब्लिकन सिनेटर्सनी अफगाणिस्तानमध्ये राहिलेल्या अमेरिकन शस्त्रांचा हिशेब मागण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांना पाठवलेल्या पत्रात सिनेटर्सनी लिहिले की, तालिबानकडे ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर पाहून त्यांना धक्का बसला. अमेरिकन लोकांच्या करातून विकत घेतलेली आधुनिक लष्करी शस्त्रे तालिबान आणि त्यांच्या दहशतवादी साथीदारांच्या हातात पडली आहेत, याची कल्पना करणेही कठीण आहे. अफगाणिस्तानातून माघार घेण्यापूर्वी अमेरिकेच्या मालमत्तेचे संरक्षण करणे संरक्षण विभागाचे सर्वोच्च प्राधान्य असायला हवे होते.

बातम्या आणखी आहेत...