आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआसाममधील सोनपूर शहरातील एका घरात 72 वर्षीय डॉक्टर आपल्या बेडवर पडलेले आहेत. त्यांना नीट बोलता येत नाही. त्यांची सहकारी रूपा हिने त्यांना सांगितले की, अमेरिकेत डुकराचे हृदय मानवी शरीरात धडधडले. हे ऐकून ते डॉक्टर फक्त हसले. अमेरिकेत आज जो चमत्कार घडला, तो 25 वर्षांपूर्वीच प्रत्यक्षात आणण-या या 72 वर्षीय डॉक्टरांचे नाव आहे डॉ. धनी राम बरुहा.
कदाचित त्यांना तो 25 वर्षांचा किस्सा आठवला असेल, जेव्हा त्यांनीदेखील असाच प्रयोग केला होता. पण 25 वर्षांपूर्वी 1997 मध्ये औषधी विज्ञानशास्त्रातील या अचंबित करणाऱ्या प्रयोगाने देशाला हुरळून नव्हे तर हादरुन टाकले होते. देशातील राजकारणी तर इतके हादरले की त्यांनी हा प्रयोग राबविणारे डॉ. धनी राम बरुहा यांना थेट तुरुंगात टाकले होते. काय घडले होते 25 वर्षांपूर्वी चला सविस्तर जाणून घेऊया...
डुकराचे हृदय माणसात प्रत्यारोपित करणारे भारतीय डॉक्टर कोण होते?
1995 च्या काळात, आसामचे रहिवासी असलेले डॉ. धनी राम बरुआ यांनी देशभरातील टॉप कार्डिओलॉजी डॉक्टर म्हणून ठसा उमटवला होता. केवळ आसाममधीलच नव्हे, तर देशभरातील हृदयरोगी बरुआ यांच्यापर्यंत पोहोचायचे. डॉ. बरुआ हे सोनपूरमध्ये हार्ट इन्स्टिट्यूट चालवायचे. त्यांच्या संस्थेचे नाव होते धनी राम बरुआ इन्स्टिट्युट. कर्करोगासह इतर अनेक मोठ्या आजारांवर त्यांनी जनुकीय विज्ञानाच्या क्षेत्रात केलेल्या संशोधनाचे जगभरातून कौतुक होत आहे.
डॉ.बरुआ यांना कोणत्या परिस्थितीत हृदय प्रत्यारोपण करावे लागले
आसाममधील धनी राम बरुआ हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये 25 वर्षांपूर्वी एका रुग्णाला दाखल करण्यात आले होते. या 32 वर्षीय रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. रुग्णाला वाचवण्यासाठी डॉ बरुआ यांच्याकडे डुकराचे हृदय शरीरात प्रत्यारोपित करण्याशिवाय पर्याय नव्हता.
अशा परिस्थितीत बरुआ यांनी चीनमधील हाँगकाँग येथील डॉ. जोनाथ हो की-शिंग यांच्यासोबत हे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोन्ही डॉक्टरांनी मिळून सोनपूर येथील संस्थेत ही शस्त्रक्रिया केली.
डॉ. बरुआ आणि जोनाथ यांना शर्थीचे प्रयत्न करूनही रुग्णाला वाचवता आले नाही
1997 मध्ये डॉ. धनी राम बरुहा यांनी हॉगकॉग येथील प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. जोनाथ हो की-शिंग यांच्या मदतीने हृदयाशी संबंधित आजारी असणा-या 32 वर्षीय तरुणावर हा प्रयोग केला होता. त्यांनी त्याच्यावर डुकराचे हृदय प्रत्यारोपण केले होते. त्याकाळात आरोग्य विज्ञान एवढे प्रगत नसताना हा प्रयोग करण्याचे धाडस त्यांनी दाखविले. या प्रयोगानंतर रुग्ण सात दिवस जिवंत राहिला. या प्रयोगाला देशाने डोक्यावर घेतले नाही तर या प्रयोगाने राजकारणी हादरले होते. हृदयावर आणि फुफ्फुसांना संसर्ग होऊन रुग्ण दगावला.
रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉ. बरुआ यांना तुरुंगात जावे लागले
या घटनेनंतर आसाम सरकारने चौकशीसाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीने केलेल्या तपासणीत दोन्ही डॉक्टरांनी या हृदय प्रत्यारोपणापूर्वी कोणतीही सरकारी परवानगी घेतली नसल्याचे आढळून आले. डॉ. बरुआ यांच्या संस्थेनेही हृदय प्रत्यारोपणाशी संबंधित कायद्याकडे दुर्लक्ष केले होते.
अशा परिस्थितीत दोन्ही डॉक्टरांविरुद्ध आयपीसीच्या कलम 304 आणि मानवी शरीरात हृदय प्रत्यारोपण कायदा 1994 च्या कलम 18 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अटक केल्यानंतर सुमारे 40 दिवसांनी दोन्ही डॉक्टरांची जामिनावर सुटका करण्यात आली.
डॉ. बरुआ 18 महिने नजरकैदेत होते
तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही डॉ. बरुआ बराच काळ पूर्वीप्रमाणे मुक्त नव्हते. बरुआ यांच्या लॅबचा वीज आणि पाणीपुरवठाही सरकारने बंद केला होता. पुढील 18 महिने त्यांना नजरकैदेत राहावे लागले होते. पावसाचे पाणी आणि मित्र किंवा सामाजिक संस्थेने दिलेले अन्न खाऊन त्यांनी कसेबसे दिवस काढले होते.
हृदय प्रत्यारोपणानंतर डॉ. धनी राम बरुआ यांची बाजू काय होती?
हृदय प्रत्यारोपणापूर्वी एका मुलाखतीत डॉ. धनी राम बरुआ म्हणाले होते, 'मानवाच्या शरीरात हृदय प्रत्यारोपणासाठी डुक्कर हा सर्वात योग्य प्राणी आहे.' त्याच्या संशोधन आणि प्रत्यारोपणावर होत असलेल्या टीकेबद्दल ते म्हणाले होते, 'जेव्हा गॅलिलिओने पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे सांगितले तेव्हा लोकांनी त्याला वेडा म्हटले.' नंतर बघा, त्यांचा मुद्दा खरा ठरला आहे. "शास्त्रज्ञांवर त्यांच्या कार्याबद्दल अनेकदा टीका झाली आहे," असेही ते म्हणाले होते.
जेव्हा इंदिरा गांधींनी डॉ. बरुआ यांना हार्ट लॅब उघडण्याची केली होती अपील
या वादाच्या आधी 1980 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी आणि आसामचे मुख्यमंत्री हितेश्वर सैकिया यांनी डॉ. बरुआ यांना हृदय प्रत्यारोपण प्रयोगशाळा उघडण्यासाठी आमंत्रित केले होते. यानंतर 1989 मध्ये डॉ. बरुआ यांनी पहिल्यांदा मुंबईत हार्ट वॉल्व फॅक्ट्रीची स्थापना केली.
पुढे सोनपूरमध्येही डॉ.बरुआ यांनी हृदय प्रत्यारोपण संस्था सुरू केली. याच संस्थेत 1997 मध्ये डुकराचे हृदय माणसात प्रत्यारोपित करण्यात आले होते, त्यानंतर वाद निर्माण झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.