आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • American Researcher Claims Omicron Wave Like The Flu Epidemic In 1918, Even At That Time Mask And Lockdown Were Necessary

इतिहासातून काय शिकलात?:1918 मध्ये सुद्धा होती महामारी, मास्क-लॉकडाउनची सक्ती; फरक इतकाच की आज लस आहेत त्यावेळी नव्हत्या! ...म्हणूनच लस घ्या

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा याविषयी सविस्तर...

जगभरात ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे आलेली लाट 1918 च्या फ्लू साथीच्या आजाराशी साधर्म्य साधणारी आहे. शतकापूर्वीही लोक मास्क घालूनच घराबाहेर पडत होते आणि आज शतकानंतरही तेच दृश्य पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील ओरेगन स्टेट युनिव्हर्सिटीचे संशोधक क्रिस्टोफर मॅकनाइट निकोल्स यांच्या मते, आताच्या ओमायक्रॉनप्रमाणेच 1918 साली आलेल्या फ्लूच्या लाटनेदेखील तरुण आणि निरोगी लोकांना आपल्या विळख्यात घेतले होते.

1918 मध्येही लोक निष्काळजीपणे वागायचे

द वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात निकोल्स यांनी लिहिले की, फेब्रुवारी 1918 मध्ये आलेला फ्लू पहिल्या महायुद्धामुळे अमेरिकेपासून संपूर्ण जगात पसरला. हा देखील हवेतून पसरणारा रोग होता. त्याचा संसर्ग जगभरात पसरण्यासाठी केवळ 6 महिने लागले होते. ओमायक्रॉन प्रमाणे या फ्लूचादेखील मृत्यू दर कमी होता.

पहिल्या महायुद्धामुळे 1918 मध्ये आलेला फ्लू अमेरिकेपासून संपूर्ण जगात पसरला होता.
पहिल्या महायुद्धामुळे 1918 मध्ये आलेला फ्लू अमेरिकेपासून संपूर्ण जगात पसरला होता.

फ्लूची काही लक्षणे ओमायक्रॉन सारखीच होती. त्यात लोकांना सर्दी, ताप यायचा. त्यानंतरही निष्काळजीपणा दाखवून लोकांनी 3 दिवस राहिलेला ताप म्हणून फ्लूकडे दुर्लक्ष केले होते. निकोल्स यांच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर 1918 मध्ये या फ्लूचा एक धोकादायक व्हेरिएंट आला होता, ज्यामुळे अमेरिकेत एका महिन्यात 2 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. 1919 पर्यंत फ्लूचे रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाले होते. जगभरातील फ्लू महामारीमुळे एकूण 5 कोटी लोक मृत्यूमुखी पडले होते.

जगभरात फ्लू महामारीमुळे एकूण 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता.
जगभरात फ्लू महामारीमुळे एकूण 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता.

1918 च्या फ्लू महामारीच्या काळातही लॉकडाउन सारखी परिस्थिती निर्माण झाली होती
लोकांच्या निष्काळजीपणामुळे 1918 च्या फ्लू महामारीच्या काळातही सरकारांनी चित्रपटगृहे, पूल आणि इतर सार्वजनिक ठिकाणे बंद केली होती. लोकांनी घराबाहेर पडताना मास्क लावणे अनिवार्य होते. मास्क न घातल्याने लोकांना तुरुंगात टाकण्यात यायचे. फ्लूची लागण झाल्यावर आयसोलेशन आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे देखील सामान्य होते.

1918 मध्येही लोकांनी घराबाहेर पडताना मास्क घालणे आवश्यक झाले होते.
1918 मध्येही लोकांनी घराबाहेर पडताना मास्क घालणे आवश्यक झाले होते.

एक शतकापूर्वी, शास्त्रज्ञांनी लस बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला
निकोल्स सांतात की, शास्त्रज्ञांनी 1918 मध्ये फ्लूवर लस तयार करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, परंतु त्यावेळी त्यांना यश आले नव्हते. म्हणूनच सध्याच्या घडीला आपल्यासाठी ज्या काही लस आणि बूस्टर डोस उपलब्ध आहेत त्याचा वापर करणे खूप महत्त्वाचे आहे.

ज्याप्रमाणे फ्लू विषाणू अजूनही वातावरणात आहेत, त्याचप्रमाणे कोरोना विषाणू देखील अस्तित्वात राहणार.
ज्याप्रमाणे फ्लू विषाणू अजूनही वातावरणात आहेत, त्याचप्रमाणे कोरोना विषाणू देखील अस्तित्वात राहणार.

फ्लूप्रमाणे कोरोना कधीच संपणार नाही
निकोल्स यांच्या मते, ज्याप्रमाणे फ्लू विषाणू अजूनही वातावरणात आहे, त्याच प्रकारे कोरोना विषाणू देखील कोठेही जाणार नाही. काही काळानंतर कोरोना हा देखील आपल्यासाठी फ्लूसारखा सामान्य विषाणू बनेल.

बातम्या आणखी आहेत...