आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राच्या अमरावती येथे 21 जून 2022 रोजी रात्री मेडिकलचे दुकान चालवणाऱ्या उमेश कोल्हे यांची रस्त्याच्या मधोमध गळा चिरून हत्या करण्यात आली. 54 वर्षीय उमेश यांचे कोणाशीही वैर नव्हते. भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरून वाद सुरु होता, तेव्हाची ही घटना आहे.
तपासात समोर आले की, उमेश कोल्हेंनी मित्रांच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर नुपूरच्या समर्थनार्थ पोस्टही पाठवली होती. इथून तार जुळत गेल्या, पोलिसांनी तपास सुरू केला, जो एटीएसमार्फत एनआयएकडे आला. उमेश यांचे 16 वर्षांपासूनचे डॉक्टर मित्र युसूफ याच्यासह अन्य 10 जणांनी या हत्येचा कट रचल्याचे तपासात समोर आले.
'गुस्ताख-ए-नबी की एक सजा, सर तन से जुदा' एनआयएने आपल्या आरोपपत्रात या घोषणेचाही उल्लेख केला आहे. याच प्रेरणेतून या 11 जणांनी उमेश यांच्या हत्येचा कट रचला. NIA ने शुक्रवारी म्हणजेच 16 डिसेंबर रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र दिव्य मराठी नेटवर्ककडे आहे, त्यानुसार उमेश यांची हत्या फक्त एका पोस्टचा बदला घेण्यासाठी करण्यात आली.
युसूफ आणि उमेश कोल्हे हे एकमेकांना 16 वर्षांपासून ओळखत होते. तो उमेशच्या मेडिकल दुकानातूनच औषधे खरेदी करायचा. युसूफला बहिणीच्या लग्नासाठी मदतीची गरज असताना उमेश कोल्हेनेच त्याला मदत केली होती. युसूफ तबलिगी जमातशी संबंधित होता. उमेश यांच्या मेसेजचा स्क्रीन शॉट त्यानेच प्रथम दुसऱ्या ग्रुपमध्ये प्रसारित केला. उर्वरित 10 आरोपी हे तबलिगी जमातचे सदस्य आहेत.
हे प्रकरण सुरुवातीपासून समजून घेऊया...
26 मे 2022 रोजी एका वृत्तवाहिनीवर चर्चा सुरू होती. त्याचवेळी भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्याविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली. दिल्लीपासून 1100 किमी अंतरावर असलेल्या अमरावतीमध्ये त्याचा परिणाण दिसायला लागला. नुपूर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडिया ग्रुप्समध्ये फिरू लागला.
8 जून रोजी इरफान खान आणि मौलाना मुशफिक अहमद यांच्यासह काही लोक नुपूर शर्माविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी त्यांचा एफआयआर नोंदवला नाही कारण दिल्ली, तेलंगाणा आणि पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये या प्रकरणी आधीच गुन्हे नोंदवले गेले होते. पोलिसांच्या या युक्तिवादाने इरफान आणि मुशफिकचे समाधान झाले नाही.
9 जून रोजी दोघांनी 'मीटिंग ओन्ली' या व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे नुपूर शर्माविरोधातील एफआयआर आणि 10 जून रोजी पुकारलेल्या भारत बंदबाबत बैठक बोलावली होती. बऱ्याच चर्चेनंतर ठरले की मुस्लीम समाजातील लोक केसही दाखल करणार नाही आणि भारत बंदमध्येही सहभागी होणार नाही. या निर्णयावर इरफान खान, मुशफिक, शेख शकील आणि त्यांचे साथीदार खूश नव्हते.
14 जून रोजी उमेश कोल्हेंनी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पोस्ट केली - मी नुपूर शर्माला सपोर्ट करतो
उमेश कोल्हे हे ‘अमित मेडिकल’ नावाने पशुवैद्यकीय औषधांचे दुकान चालवत होते. त्यांच्या हत्येतील आरोपी युसूफ खान त्यांच्या दुकानात औषध खरेदीसाठी येत असे. दोघेही 'ब्लॅक फ्रीडम' नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये होते. युसूफ खान हा या ग्रुपचा एकमेव मुस्लीम सदस्य होता आणि उमेश कोल्हे ग्रुपचे अॅडमिन होते.
14 जून रोजी उमेश कोल्हेंनी त्याच ग्रुपमध्ये नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ त्यांच्या फोटोसह एक संदेश पोस्ट केला होता. युसूफने ही पोस्ट पाहिली आणि त्याचा स्क्रिन शॉट घेतला आणि उमेशचा मोबाइल नंबर, मेडिकल दुकानाचा पत्ता आणि मेसेजसह अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर तो प्रसारित केला. याला धडा शिकवायचा आहे असे या मेसेजमध्ये लिहिले होते. हा मेसेज 'कलीम इब्राहिम व्हॉट्सअॅप ग्रुप'मध्येही शेअर करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान खान या ग्रुपमध्ये होता.
याबाबत युसूफ खानने आतिब रशीदशीही संवाद साधला. आतिब हा त्याचा ग्राहक होता. 18 जून रोजी आतिब रशीदने त्याचा साथीदार मोहम्मद शोएबची भेट घेतली. दोघेही उमेश कोल्हेबद्दल बोलले. यानंतर आतिबने इरफान खानशीही संवाद साधला. इरफानही 'कलीम इब्राहिम' ग्रुपशी संबंधित होता, त्यामुळे त्याला संपूर्ण प्रकरण आधीच माहीत होते.
हा मेसेज त्याला 'हंसी मजाक' नावाच्या दुसऱ्या ग्रुपवरही मिळाला होता. तो अब्दुल तौफिक शेख याने पाठवला होता. अब्दुल मुशिफिक अहमद, शेख शकील आणि मुदस्सीर अहमद हे नुपूर शर्माच्या प्रकरणात आधीच खूप आक्रमक होते. आतिब रशीद आणि इरफान खान यांनी 19 जून रोजी गौसिया हॉलमध्ये पुन्हा भेटण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मोहम्मद शोएबसोबत शहीम अहमद नावाच्या व्यक्तीलाही बोलावण्यात आले होते.
4 आरोपी भेटले आणि ठरवले की उमेश कोल्हेंना 'शिक्षा' द्यायचीय
दुसऱ्या दिवशी मोहम्मद शोएब, आतिब रशीद, इरफान खान आणि शहीम अहमद यांची गौसिया हॉलमध्ये भेट झाली आणि उमेश कोल्हेंनी पैगंबर मोहम्मद यांच्या सन्मानाचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना शिक्षा दिली पाहिजे असा निर्णय घेतला. मोहम्मद शोएब, आतिब रशीद आणि शहीम अहमद यांनी याची जबाबदारी घेतली.
यासाठी सर्व प्रकारची मदत करण्यास तयार असल्याचे इरफानने सांगितले. त्याने तिघांनाही सांगितले की, मोबाईल नेऊ नका, काळे टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घाला आणि कोणी ओळखू नये म्हणून तोंड झाकण्यास सांगितले. इरफान या टोळीचे नेतृत्व करत होता.
यानंतर आतिब रशीदने उमेश कोल्हेंची ओळख पटवण्यासाठी मोहम्मद शोएबला दुचाकीवरून त्यांच्या मेडिकल दुकानात नेले. दोघेही ज्या ठिकाणी ठार मारण्याचे ठरले होते तेथे गेले.
या हत्येचा संपूर्ण कट मोहम्मद शोएब, आतिब रशीद, इरफान खान आणि शहीम अहमद यांनी रचल्याचे तपासात समोर आले आहे. या चौघांनाही मुशफिक अहमद या मौलवीने पाठिंबा दिला होता. मुशफिक इरफान खानच्याही जवळचा आहे. नुपूर शर्मांविरोधात एफआयआर न लिहिल्याने दोघेही नाराज होते.
20 जून रोजी मारण्यासाठी बाहेर पडले, मात्र उमेश सापडले नाही
20 जून 2022 रोजी रात्री 9:30 च्या सुमारास मोहम्मद शोएब आणि शहीम अहमद दुचाकीवरून घंटाघर लेनमध्ये पोहोचले, तिथे उमेश कोल्हे यांची हत्या होणार होती. बराच वेळ प्रतीक्षा करूनही उमेश न आल्याने ते त्यांना पाहण्यासाठी मेडिकल दुकानात पोहोचले. दुकान बंद होते, त्यामुळे त्यांना उमेश यांना मारता आले नाही.
यानंतर मोहम्मद शोएब आणि शहीम अहमद यांनी आतिब रशीद यांची भेट घेतली आणि योजना अयशस्वी झाल्याबद्दल सांगितले. आतिब रशीदने हीच गोष्ट इरफानला सांगितली आणि इरफानने शाहरुख खाँ आणि अब्दुल तौफिक शेख यांना सांगितले. कोल्हे यांची रेकी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. अशा प्रकारे तेही या कटात सामील झाले.
21 जून रोजी तिघांनी केली रेकी, तिघांनी खून केला
आतिब आणि इरफानच्या सांगण्यावरून 21 जून रोजी मुदस्सीर अहमद, शाहरुख खाँ आणि अब्दुल तौफिक शेख हे उमेश कोल्हे यांच्या मेडिकलच्या दुकानात रेकी करण्यासाठी पोहोचले. शाहरुख खाँ अशा ठिकाणी उभा राहिला जिथून त्याला उमेश कोल्हेंचे लोकेशन दिसेल. त्याने स्कार्फने तोंड झाकले होते. तिघेही उमेश यांच्या हालचाली मोबाइलवर एकमेकांना सांगत राहिले.
शाहरुख खाँ 'रहबर हेल्पलाइन' या एनजीओची रुग्णवाहिका चालवायचा. अब्दुल तौफिक शेख हा रहबर हेल्पलाइनशीही संबंधित होते. मोहम्मद शोएब, आतिब रशीद, शहीम अहमद याच कार्यालयात भेटले होतेय गुन्ह्याच्या ठिकाणी त्यांचे लोकेशन सापडू नये म्हणून त्यांनी त्यांचे मोबाईल रुग्णवाहिकेतच ठेवले होते.
यानंतर मोहम्मद शोएब, शहीम अहमदने चाकू घेतला आणि अतिब रशीदसोबत दुचाकीवरून निघून गेले. उमेश ज्या वाटेवरून जाणार होते, तिथे तिघांनीही पोझिशन घेतली. उमेश कोल्हे हे दुकान बंद करून रात्री 10.20 वाजता घंटाघर लेनमध्ये पोहोचले. तिघांनी त्यांना थांबवले. त्यांना गुडघ्यावर बसवले आणि मोहम्मद शोएबने चाकूने उमेश यांचा गळा चिरला.
शहीम अहमदही चाकू काढणार होता, तोपर्यंत उमेश यांचा मुलगा आणि सून तेथे आले. दोघांनी आवाज केल्यावर शोएब आणि शहीम दुचाकीवरून पळून गेले. उमेश यांचा मुलगा आणि सुनेने तिन्ही आरोपींना पळताना पाहिले होते. ते या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. दोघांनी उमेश यांना जवळच्या रुग्णालयात नेले, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
हल्ल्यानंतर उमेश जिवंत आहे की नाही हे तपासत राहिले.
यादरम्यान शेख शकील उमेश कोल्हेंचे अपडेट्स घेत होता. इरफान खानच्या सांगण्यावरून अब्दुल अरबाज उमेश कोल्हे जिवंत आहे की नाही याची माहिती घेण्यासाठी रुग्णालयात गेला. मृत्यूची माहिती मिळताच सर्व आरोपींनी जल्लोषात पार्टी केली.
एनआयएच्या म्हणण्यानुसार, 11 आरोपींपैकी कोणाचेही उमेश कोल्हेंशी वैर नव्हते. त्यांना फक्त नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याचा बदला घ्यायचा होता. लोकांमध्ये दहशत पसरवणे हाच या हत्येचा उद्देश होता. सर्व आरोपी एकमेकांना आधीच ओळखत होते आणि ते सतत मोबाईलवर बोलत होते.
मोहम्मद शोएबने गळा चिरण्याचा सराव केला होता
उमेश कोल्हे यांचा गळा चाकूने चिरणारा मोहम्मद शोएब याने यासाठी सरावही केला होता, असे आरोपपत्रात म्हटले आहे. 22 जून 2022 रोजी अमरावतीच्या सेंट्रल हॉस्पिटलने जाहीर केलेल्या पोस्टमॉर्टमनुसार उमेश कोल्हेंच्या मानेवर अनेक खोल जखमा आढळल्या. त्यांचा मेंदू आणि डोळ्यांच्या नसाही खराब झाल्या होत्या.
हत्येनंतर शोएबने चाकू त्याच गौसिया हॉलमध्ये लपवून ठेवला होता जिथे हत्येची प्लॅनिंग करण्यात आली होती. हत्येनंतर तो शहीम अहमदसह अमरावतीतून पळून गेला होता.
नुपूर शर्माला पाठिंबा देणाऱ्या अनेकांना धमक्या आल्या होत्या
याच दरम्यान, सोशल मीडियावर अनेकांनी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट करण्यास सुरुवात केली होती. अशा सुमारे 10 जणांना फोनवरून धमक्या आल्या होत्या. त्यापैकी एक होते अमरावतीचे डॉ.श्रीगोपाल राठी. नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ त्यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस पोस्ट केले होते.
9 जून रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. कॉलरने आपले नाव राजिक मिर्झा बेग असे सांगितले आणि व्हॉट्सअॅप स्टेटस डिलीट न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली. त्यांचा हा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला. कॉलरने डॉ. राठी यांना माफी मागतानाचा व्हिडिओ बनवून व्हॉट्सअॅप स्टेटसवर टाकण्यास सांगितले.
11 जून रोजी डॉ.राठी यांनी व्हिडिओ बनवून तो फेसबुकवर अपलोड करून राजिक मिर्झा यांना पाठवला. डॉ. राठी यांनी हा व्हिडिओ त्यांचे सहाय्यक डॉ. जमीन यांना पाठवला आणि तो त्यांच्या समुदायात प्रसारित करण्यास सांगितले. यानंतर राजिक मिर्झा बेग यानेही माफीचा व्हिडिओ व्हायरल केला. या घटनेनंतर पोलिसांनी डॉ.राठी यांच्या रुग्णालयाबाहेर गस्त वाढवून त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.
10 जून रोजी मोबाईल शॉपी चालवणाऱ्या जय कुमारला एका ग्रुप फोन कॉलवर धमकी देण्यात आली होती. मुदस्सीर अहमद आणि शेख शकील आणि बाबा नावाच्या व्यक्तीवर जयकुमारला धमकावल्याचा आरोप आहे. त्यांचे रेकॉर्डिंगही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
12 जून 2022 रोजी अमरावतीच्या विशाल बाहद यांनी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ फेसबुकवर पोस्ट केली होती. ही पोस्ट त्यांचे नाव, फोटो, पत्ता आणि मोबाईल क्रमांकासह व्हायरल करण्यात आली. उमेश कोल्हेंच्या हत्येतील आरोपी मुदस्सीर अहमद याने विशाल यांना फोन करून धमकी दिली होती. त्यानंतर विशाल यांनी आपला मोबाईल बंद केला, त्याचे फेसबुक अकाउंट डिलीट केले आणि नोकरीवरून 15 दिवसांची सुट्टी घेऊन अमरावतीहून निघून गेले.
सुटी संपवून ते परत आले असता उमेश कोल्हे यांचा खून झाल्याचे त्यांना समजले. यानंतर त्यांनी आपल्या 5 वर्षांच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि घरी परतले. यानंतर भीतीपोटी विशाल आणि त्यांचे कुटुंब महिनाभर घराबाहेर पडले नाही. उमेश कोल्हे खून प्रकरणातील आरोपी शेख शकील याला 9 जून रोजी अटक करण्यात आली होती. 15 दिवस अमरावती सोडण्याच्या अटीवर त्याची सुटका करण्यात आली.
उमेश यांच्या हत्येनंतर 6 दिवसांनी राजस्थानमध्ये कन्हैयालालची हत्या
उमेश यांच्या हत्येनंतर 6 दिवसांनी 28 जून रोजी राजस्थानमधील उदयपूरमध्ये टेरल कन्हैयालालची हत्या करण्यात आली होती. कन्हैयानेही नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती. याचा बदला घेण्यासाठी मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद हे दोन तरुण कपडे शिवण्याच्या बहाण्याने आले आणि त्यांनी कन्हैयाची हत्या केली.
150 देशांमध्ये तबलिगी जमातचे सदस्य
उमेश हत्या प्रकरणातील आरोपी तबलिगी जमातशी संबंधित आहेत.1927 मध्ये स्थापन झालेली तबलिगी जमात ही सुन्नी मुस्लिमांची सर्वात मोठी संघटना आहे. हरियाणातील मेवात येथे मुहम्मद इलियास अल-कांधलवी यांनी धार्मिक सुधारणा चळवळ म्हणून याची सुरुवात केली होती. 150 देशांतील सुमारे 35 कोटी लोक तबलिगी जमातशी संबंधित आहेत. यापैकी 25 कोटी लोक दक्षिण आशियाई देशांतील आहेत. याचे मुख्यालय निजामुद्दीन, दिल्ली येथे आहे.
दहशत पसरवल्याच्या आरोपावरून उझबेकिस्तान, कझाकिस्तान आणि ताजिकिस्तानमध्ये यावर बंदी घालण्यात आली आहे. 2011 मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने तबलिगी जमातला वॉच लिस्टमध्ये ठेवले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.