आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिंद्रा 'थार'ची ब्रँड बनण्याची कहाणी:महायुद्धासाठी तयार करण्यात आलेल्या जीप शिल्लक राहिल्यानंतर महिंद्राने त्या भारतात आणल्या; जाणून घ्या 73 वर्षांचा इतिहास

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर...

तुम्ही रस्त्यावरुन जात असताना जर तुमच्या शेजारुन महिंद्रा थार गेली, तर तुम्ही नक्कीच एकदा तरी मागे वळून बघाल. पण लोकांची मनं जिंकून घेणा-या थारचा हा प्रवास काही एका दिवसाचा नाही. त्याची मुळे दुसरे महायुद्ध आणि अमेरिकेशी जुळली आहेत.

परदेशी जीपपासून सुरू झालेला प्रवास भारतातील सर्वात आवडत्या ऑफ रोड कारपर्यंत कसा पोहोचला हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. जाणून घ्या महिंद्रा थारची ब्रँड बनण्याची कहाणी...

दुसरे महायुद्ध आणि परिस्थितीची मागणी
दुसऱ्या महायुद्धाची ही गोष्ट आहे. अमेरिकन लष्कराला अशा वाहनाची गरज होती, जे सर्व प्रकारच्या भूप्रदेशावर सहज धावेल आणि जे टँक किंवा ट्रकइतके जड नसावे आणि सोबतच जे विमानातून सहज
उतरवले जाऊ शकले असते. देशभरातील ऑटोमोबाईल कंपन्यांकडून डिझाईन मागवण्यात आली होती. सुरुवातीचे डिझाईन बँटम कंपनीने दिले होते.

अमेरिकेला एका सप्लायरची गरज होती, ज्यांच्याकडे मोठ्या संख्येने कार बनवण्याची क्षमता होती. Willy आणि Ford कंपनीनेही त्यांचे डिझाइन सादर केले आणि त्यावर शिक्कामोर्तब झाले. Willy ने 1940 मध्ये जीप ट्रेडमार्कची नोंदणी केली. महायुद्धात सुमारे 6 लाख जीप बनवण्यात आल्या.

महिंद्राने Willyची जीप भारतात आणली
पहिले महायुद्ध 1944 मध्ये संपले. अमेरिकन सैन्याची मागणी कमी झाली. Willy ने उरलेली वाहने सर्वसामान्यांना विकण्यास सुरुवात केली. मॉडेलला नाव दिले - CJ -2A. त्याची चांगली विक्री होत नव्हती. अशा परिस्थितीत भारताचे दोन बिझनेस टायकून जेसी महिंद्रा आणि केसी महिंद्रा अमेरिकेत पोहोचले.

त्यांनी Willyची जीप भारतात आयात करण्याच्या करारावर शिक्कामोर्तब केले. 1949 मध्ये महिंद्राने या जीप आयात करून भारतात विकण्यास सुरुवात केली. जीप इतर वाहनांपेक्षा स्वस्त असली तरीही ती भारतातील सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर होती.

महिंद्राने स्वतः जीप बनवायला सुरुवात केली
1960 च्या दशकाच्या सुरुवातीला महिंद्राने Willy सोबत आणखी एक करार केला आणि भारतात CJ-3A निर्मितीचा परवाना मिळवला. यामुळे त्याची किंमत कमी झाली आणि त्या काळात त्याने भारतातील 25% कार बाजार व्यापला.

बदल : डावीकडून उजवीकडे, पेट्रोल ते डिझेल
या जीप अमेरिकेतून आयात केल्या होत्या, त्यामुळे 1968 पर्यंत त्यांचे ड्रायव्हिंग डाव्या हाताचे होते. 1969 मध्ये महिंद्राने ते राइट हँड ड्राइव्ह बनवले. सुरुवातीच्या काळात फक्त पेट्रोल इंजिन होते. 1970 च्या दशकात महिंद्राने डिझेल इंजिनवर लक्ष केंद्रित केले. महिंद्रा CJ-3B मध्ये B-275 डिझेल इंजिन बसवण्यात आले. महिंद्राने जवळपास 40 वर्षांपर्यंत CJ-3B जीपचे विविध व्हर्जन तयार केले.

21 वे शतक आणि कमी होणारी क्रेझ
21 व्या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षांत बोलेरो, स्कॉर्पियोमुळे जीपची लोकप्रियता कुठेतरी हरवली जात होती. स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून महिंद्रा जीपचे निष्ठावंत ग्राहक असलेले भारतीय सैन्य आता जिप्सीकडे वळत होते. कारचे शौकिन असलेल्या लोकांना जीपमध्ये आकर्षण दिसत नव्हते. अशा परिस्थितीत महिंद्राला 'ऑफ रोड' कारसाठी सकारात्मक दिशा आवश्यक होती.

महिंद्राने लाँच केली 'खिचडी कार' अर्थात थार
ऑक्टोबर 2010 मध्ये महिंद्रा थार लाँच करण्यात आली. ही स्कॉर्पिओ, मेजर आणि सीजे -5 द्वारे प्रेरित एक खिचडी कार होती. त्याच्या लूक आणि फीलने रोड ड्राइव्हची आवड असलेल्या लोकांना आपल्याकडे आकर्षित केले.

पण दैनंदिन वापर आणि सुरक्षिततेच्या समस्यांमुळे ते अजूनही विक्रीमध्ये मागे होते. 2015 मध्ये महिंद्राने ते अपडेट केले आणि पुन्हा लाँच केले. यामुळे थार अधिक आकर्षक झाली.

सरकारने कारबाबत नवीन नियम जारी केले, ज्यात महिंद्रा थार बसत नव्हती. म्हणून 2019 मध्ये शेवटच्या उर्वरित 700 कार विकण्यासाठी कंपनीने थार -700 एडिशन आणले. या गाड्या आनंद महिंद्राच्या स्वाक्षरी आणि स्टिकर लावून विकल्या गेल्या.

ऑक्टोबर 2020 मध्ये महिंद्राने पुन्हा एकदा थारचे नवीन व्हर्जन लाँच केले. लोकांचा ओढा याकडे वाढला. एका वर्षात 75 हजार वाहने बुक केली गेली आहेत आणि सुमारे 1 वर्षांचा वेटिंग पीरिएड चालू आहे. महिंद्रा थार 2020 ची थेट स्पर्धा मारुती जिम्नीसोबत आहे, जी लवकरच लाँच केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...