आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Andrea, Who Overcame Cancer, Became The First Woman To Complete The Triathlon, Covering A Distance Of 538 Km In 5 Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंडे पॉझिटिव्ह:कर्करोगावर मात करणारी अँड्रिया ट्रायथलॉन पूर्ण करणारी पहिली महिला बनली, 5 दिवसांत 538 किमी अंतर पार

लंडन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 330 किमी सायकलिंग, 170 किमी धावणे, 38 किमी जलतरणाची कामगिरी

कर्करोगाला मात देणाऱ्या ब्रिटनच्या ३९ वर्षीय अँड्रिया मेसन सी टू समिट ट्रायथलॉनचे आव्हान पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांनी एकूण ५३८ किमी अंतर पूर्ण केले. फ्रान्सच्या लेक एनेसीमध्ये ३८ किमीच्या जलतरणानंतर मेसन यांनी माउंट ब्लॅकवर ३३० किमीची सायकलिंग केली. जलतरणात त्यांना १० तासांहून कमी वेळ लागला. माउंट ब्लॅकवर त्यांनी १७० किमी धावणे व गिर्यारोहणही केले. हे युरोपातील दुसरे सर्वोच्च शिखर आहे. मेसनने ही कामगिरी ४ दिवस २३ तास व ४१ मिनिटांत पूर्ण केली. यादरम्यान मेसन यांनी अल्पकाळ झोप घेतली होती. त्यांचा आहारदेखील अल्प होता.

ट्रायथलॉन पूर्ण केल्यानंतर अँड्रिया म्हणाल्या, सर्वकाही नियोजनानुसार पार पडल्याचा आनंद वाटतो. या पाच दिवसांत मला मनाजाेगी कामगिरी करून दाखवता आली. परंतु या गोष्टी खरेच कठीण होत्या. कारण झोपेसाठी वेळ कमी होता. मी झोपू शकत नव्हते. धावताना सोबत भोजन बाळगता येत नव्हते. ट्रायथलॉन बहुक्रीडा स्वरूपाची स्पर्धा असते. त्यात जलतरण, सायकलिंग, धावणे इत्यादींचा समावेश असतो. स्पर्धेदरम्यान ट्रायथलॉन सोडून देण्याचाही विचार अनेकदा आला, परंतु खेळाची सुरुवात का केली? याचा नेहमी विचार करायचे. २०१७ मध्ये मेसनला अँडोमेट्रियोसिस व सर्व्हायकल कॅन्सरचे निदान झाले होते. त्यानंतर शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांनी महिलांच्या आराेग्यासाठी लोकांमध्ये जागृती करण्याचा संकल्प केला.

अँड्रियाला आधी धावणे, गिर्याराेहणाची नव्हती माहिती

३९ वर्षीय अँड्रिया ट्रायथलॉन इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्समध्ये पूर्ण करायची होती. त्यांनी फ्रान्सच्या चॅमोनिक्समध्ये बेस तयार केला होता. परंतु परतण्यापूर्वीच कोरोनामुळे सीमा बंद झाल्या. त्यामुळे त्यांना नियोजन बदलावे लागले. अँड्रिया म्हणाल्या, नियोजन अतिशय आव्हानात्मक होते. धावणे, गिर्यारोहणाबद्दल त्यांना जास्त माहिती नव्हती. यादरम्यान त्यांनी ४ सप्टेंबरपासून सुरुवात केली. ५ दिवसांत ते आव्हान पूर्ण करून दाखवले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser