आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापारंपरिक ज्ञानानुसार राग वाईट मानला जातो. मात्र 'स्टेप अपः लीड इन सिक्स मोमेन्टस दॅट मॅटर'चे लेखक हेन्री इव्हान्स आणि कॉम फॉस्टरच्या संशोधनानुसार हाय-परफॉर्मर्समध्ये प्रत्येक भावना तीव्र असते. यात रागाचाही समावेश असतो. तेव्हाच यश मिळते आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचतात. यशस्वी लोक स्वतःच्या रागाला योग्य दिशा देतात. त्यामुळेच ते जास्त केंद्रित असतात. निश्चयात्मक असतात आणि जास्त मजबूतही असतात. यशस्वी लोक आपल्या हाय इमोशनल आयक्यूच्या बळावर आपल्या रागावर नियंत्रण ठेवतात.
जगातील टॉप लीडर्स आणखी काय करतात, आज मॅनेजमेन्ट मंत्रामधून जाणून घ्या...
आपल्या डोक्यात...
1. राग स्वाभाविक, हेल्दी असल्याचे ते मानतात - जेव्हा तुम्ही रागाकडे गरजेच्या भावनेतून बघतात. याला घाबरणे सोडतात. तेव्हा तुम्ही त्याचे फायदेही बघू शकतात. तुम्ही रागावर नियंत्रण मिळवल्यावर तुम्ही तो शांततेने अधिक सावधतेने जाहीर करतात.
2. दुसऱ्यांऐवजी स्वतःवर फोकस करतात - अनेकदा लोक रागात दुसऱ्यांना संबोधित करतात. 'तुझ्यामुळे मला उशीर होतोय' किंवा 'तु अजून मला रिपोर्ट दिला नाही' अशा संबोधनातून लोक स्वतःचा बचाव सुरु करतात. मात्र स्वतःला उद्देशून बोलल्याने लोक कामासाठी पुढे येतात. सहानुभूती दाखवतात. त्यामुळे अडचणीवर मात करणे सोपे होते. असे संबोधित करावे की - 'मला लेट व्हायला आवडत नाही' किंवा 'मला लवकर रिपोर्ट हवा, मी तुम्हाला काही मदत करू?'
3. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहतात - सेल्फ क्रिटिकल असणे चांगले आहे. मात्र जेव्हा नकारात्मक स्वयं चर्चा तुम्हाला पुढे जाऊ देत नसेल किंवा तुमच्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि भावनिक विकासात अडथळा बनत असेल तर तुम्हाला काहीतरी करावे लागेल. जेव्हा तुम्ही स्वतःच्या उणीवांवर बोलतात तेव्हा त्या सुधारण्यावरही बोला. उणीवांवर केवळ विचार करू नका अन्यथा नैराश्याचा बळी ठराल. स्वतःविषयी नेहमी सकारात्मक राहा.
कामावर...
1. समस्येवर फोकस करतात, व्यक्तीवर नाही - दुर्घटना आणि चुका रोजच होतात. अशात दुसऱ्यांना दोष देणे किंवा त्यांच्यावर रागावणे खूप सोपे आहे. मात्र या समस्येवर तोडगा निघणार नाही. लोकांना दोष देऊन स्वतःचा वेळ वाया घालवू नका.
2. कुणाविषयीही द्वेषभावना बाळगत नाही - कुणाविषयीही द्वेषभावना ठेवून काहीही मिळत नाही. याने तुमची ऊर्जा कमी होते. यामुळे तुमच्यात नकारात्मकता येते. तुम्ही जगाकडेही नकारात्मक नजरेतून बघता. यशस्वी लोक क्षणा करतात आणि पुढे जातात.
3. रागात असताना कधीही ईमेल पाठवत नाही - तुम्ही कामावर लोकांसोबत कसे वागता यावर तुमचे भविष्य अवलंबून असते. ईमेल लोकांशी संपर्क करण्यासोबत नोंदीतही राहते. जर तुम्ही रागात असाल तर कधीही ईमेलवर संदेश पाठवला नाही पाहिजे. जर रागात असाल तर दुसरे काहीतरी लिहिले पाहिजे. रिकाम्या मेलमध्ये लिहून तो डिलीट करा.
घरी...
1. मेडिटेशनला वेळ देतात - मेडिटेशन तुम्हाला ताण आणि अस्वस्थतेपासून दूर ठेवते. तणावादरम्यान रिलीज होणारे हार्मोन मेडिटेशनमुळे नियंत्रित होते. मेडिटेशनमुळे शरीरात फील गूड हार्मोन रिलीज होते. ते तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवते आणि तुम्हाला भावनांविषयी जास्त सजग बनवते.
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेटस् म्हणतात - 'रागाचे व्यवस्थापन प्रत्येकाने शिकायला हवे. याला जीवनातील गरजेचे कौशल्य मानावे. एक परिपक्व प्रौढ होण्यासाठी हे गरजेचे आहे.'
गूगलचे सीईओ सुंदर पिचाईंनुसार - 'रिअॅक्शन' नेहमी तत्काळ होते तर 'रिस्पॉन्ड' नेहमी विचारपूर्वक केले जाते. रागात, अस्वस्थतेत किंवा नैराश्यात कोणताही निर्णय घेऊ नये. 'रिअॅक्टिव्ह'ऐवजी 'रिस्पॉन्सिव्ह' होण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जीवनात हे समजले म्हणजे सर्व समजले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.