आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा26 वर्षीय अनंत अंबानीला अलीकडेच दोन नवीन सोलर कंपन्यांचे डायरेक्टर बनवण्यात आले आहे. 2020 मध्ये, अनंत रिलायन्स जिओच्या बोर्डात सामील झाला, जिथे ईशा आणि आकाश आधीच होते. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी सध्या चर्चेत आहे. 26 वर्षीय अनंत अंबानीवर नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 5 जुलै रोजी त्याची रिलायन्स न्यू एनर्जी सोलर आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जी यांच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. फेब्रुवारीमध्ये, त्याला रिलायन्स ऑईल टू केमिकल्सचे संचालक केले गेले. याशिवाय तो जिओ प्लॅटफॉर्मच्या बोर्डमध्ये एडिशनल डायरेक्टर देखील आहे.
आपल्या वडिलांच्या व्यवसायात आधीच अनेक जबाबदा-या सांभाळणार्या अनंतला मिळालेल्या नवीन जबाबदारीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुकेश अंबानीच्या वारसदारांबद्दल गुंतवणूकदारांमध्ये ब-याच शक्यता वर्तवल्या जात आहेत. या चर्चेमागचे कारण म्हणजे मुकेश अंबानी यांना तीन मुले आहेत आणि अंबानी कुटुंबातील व्यवसाय विभागणीचा इतिहास कटू आहे.
धीरूभाईंनी मृत्यूपत्र मागे न सोडल्यामुळे मुकेश-अनिल यांच्यात झाले होते वाद
मुकेश अंबानी 1981 मध्ये आणि अनिल अंबानी 1983 मध्ये रिलायन्समध्ये रुजू झाले होते. धीरूभाई अंबानी यांचे जुलै 2002 मध्ये निधन झाले. त्यांनी मृत्यूपत्र लिहून ठेवले नव्हते. मुकेश अंबानी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष झाले आणि अनिल अंबानी व्यवस्थापकीय संचालक झाले. नोव्हेंबर 2004 मध्ये मुकेश आणि अनिल यांच्यातीह वाद पहिल्यांदा चव्हाट्यावर आला. कुटुंबात सुरू असलेल्या या वादामुळे धीरूभाई अंबानी यांची पत्नी कोकिलाबेन नाराज होत्या.
जून 2005 मध्ये या दोघांमध्ये विभागणी झाली, परंतु कोणत्या भावाच्या वाट्याला कोणती कंपनी येणार? यावरुन 2006 पर्यंत वाद सुरु होता. आयसीआयसीआय बँकेचे तत्कालीन अध्यक्ष व्ही.के. कामत यांनाही या विभाजनात हस्तक्षेप करावा लागला होता.
विभागणीनंतर पेट्रोकेमिकल व्यवसाय, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडियन पेट्रो केमिकल्स कॉर्पोरेशन, रिलायन्स पेट्रोलियम, रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपन्या मुकेश अंबानींच्या वाटाला आल्या. धाकटे भाऊ अनिल यांनी 'अनिल धीरूभाई अंबानी ग्रुप' स्थापन केला. त्यात आरकॉम, रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स एनर्जी, रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस या कंपन्या आहेत. तेव्हापासून मुकेश अंबानीचा व्यवसाय नवे यशोशिखर गाठत आहे, तर दुसरीकडे अनिल यांचे भाग्य त्यांना साथ देत नाहीये.
भविष्यात मुकेश अंबानी यांच्या मुलांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागू नये, म्हणून 26 वर्षीय अनंत अंबानी यालाही नवीन जबाबदा-या देण्यात आल्या आहेत. ईशा आणि आकाश 2014 पासून रिलायन्समध्ये काम करत आहेत आणि कंपनीच्या बर्याच इव्हेंट्सचे ते नेतृत्वदेखील करतात.
आकाश-ईशा यांनी आधीच सामील झाले, अनंतवरही नव्या जबाबदा-या आहेत
भविष्यातील योजनाः 5 जी रोलआउट, ऑनलाइन रिटेल आणि ग्रीन एनर्जीवर फोकस
जुलै 2020 मध्ये अंबानी आणि त्यांची मुले ईशा आणि आकाश यांनी रिलायन्सच्या AGM म्हणजेच भागधारकांच्या वार्षिक बैठकीत भविष्यातील योजनांची झलक दाखवली होती. त्यांनी सांगितले होते की, 2021-22 मध्ये 5G वायरलेस नेटवर्क आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ते घेऊन येतील. यात नेटफ्लिक्स डिस्ने प्लस हॉटस्टार, अमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि टीव्ही चॅनेल एकाच छताखाली आणले जातील.
जून 2021 मध्ये झालेल्या AGMमध्ये मुकेश अंबानी यांनी सांगितले होते की, रिलायन्सने येत्या तीन वर्षांत JioMart या ई-कॉमर्स वेंचरवर एक कोटीहून अधिक मर्चंट पार्टनर्स जोडण्याची योजना आखली आहे. अंबानी म्हणाले की, रिलायन्स व्हॅल्यू चेन पार्टनरशिप आणि भविष्यातील तंत्रज्ञानावर 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.
ग्रीन एनर्जी क्षेत्रात रिलायन्स 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. येत्या 10 वर्षांत 100 गीगा वाट सोलर एनर्जीचे उत्पादन करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. यासाठी गुजरातमधील जामनगरमध्ये धीरूभाई ग्रीन एनर्जी कॉम्प्लेक्स सुरू होईल, असे ते म्हणाले होते.
'द बिलिनेयर राज: अ जर्नी थ्रू इंडियाज न्यू गिलडेड एज' चे लेखक जेम्स क्रॅबट्री यांच्या म्हणण्यानुसार, नवीन गुंतवणूकीवर परतावा मिळविणे हे आता अंबानींचे सर्वात मोठे आव्हान आहे. रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्स व्यवसायाच्या तुलनेत अंबानी ज्या उद्योगांवर लक्ष केंद्रित करत आहेत ते चांगले काम करत आहेत. अंबानींसमोर 'की मॅन'चा धोकाही आहे कारण आता त्याचे वयही वाढत आहे.
फॅमिली कौन्सिल ठरवणार मुकेश यांचा उत्तराधिकारी!
2020 मध्ये, लाइव्ह मिंटने आपल्या एका अहवालात दावा केला होता की, मुकेश अंबानी एक फॅमिली कौन्सिल स्थापन करणार आहेत. अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचा उत्तराधिकारी ठरविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यामध्ये तीन मुलांसह कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचा समावेश असेल. याशिवाय तेथे मेंटर्स आणि सल्लागार देखील असतील.
पुढील वर्षाच्या अखेरीस, वारसाहक्काची ब्लू प्रिंट तयार होईल, असा दावा केला जात होता. मात्र रिलायन्स समूहाच्या प्रवक्त्याने याचे खंडन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हे वृत्त खोटे आहे.
अनिल अंबानी यांची दोन्ही मुले सांभाळत आहेत फॅमिली बिझनेस
मुकेश अंबानींचा धाकटा भाऊ अनिल अंबानी यांना दोन मुले आहेत. थोरल्या मुलाचे नाव जय अनमोल आणि धाकट्या मुलाचे नाव जय अंशुल आहे. अनमोलने सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील जॉन कॅनन स्कूलमधून केले आणि नंतर उच्च शिक्षणासाठी तो यूकेमध्ये गेले. त्याने तेथील वारविक बिझिनेस स्कूलमधून पदवी मिळविली आहे. 2016 मध्ये त्याला रिलायन्स कॅपिटलच्या बोर्डात सामील करण्यात आले. नंतर त्याची रिलायन्स इन्फ्राच्या संचालकपदी नियुक्ती झाली. पण 6 महिन्यांतच त्याने या पदाचा राजीनामा दिला.
अनिल यांचा धाकटा मुलगा अंशुलने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यास पूर्ण केला आहे. आपल्या भावासारखाच तोही रिलायन्स कॅपिटलच्या बोर्डात सामील झाला. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, तो लवकरच रिलायन्सच्या डिफेन्स बिझनेसमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.