आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'पोलिस रात्री येतात, माझ्या भावाला पकडतात, गाडीत ढकलून घेऊन जातात. ते त्याला धमकी देतात, त्याच्या जीवाला धोका आहे. त्याला आरोपीसारखी वागणूक दिली जात आहे.'
अंजलीची आई रेखा यांनी दिल्ली पोलिसांवर हा आरोप केला आहे. नवीन वर्षाच्या रात्री अंजलीला कारखालून 14 किमीपर्यंत फरफटत नेले गेले. तिच्या मृत्यूला 5 दिवस झाले आहेत, पण अद्याप अंत्यसंस्कार झालेले नाही. आईची पोलिसांबद्दल तक्रार आहे की, ते तपास व्यवस्थित करत नाहीत. मामाचे म्हणणे आहे की, दिल्ली पोलिस हे प्रकरण दडपत आहेत, त्यामुळे सीबीआयने तपास करावा.
हे कुटुंब मंगोलपुरीतील वाय ब्लॉकमध्ये राहते. गुरुवारी सकाळी त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा अनेक नातेवाईक उपस्थित होते. मी अंजलीच्या आईबद्दल विचारलं. त्यावेळी त्या काही महिलांसोबत शेकोटीजवळ शेकत होत्या. त्यांच्यासोबत बराच बोललो, यात पोलिस आणि अंजलीची मैत्रिण निधी यांच्याविषयीचे प्रश्न आहेत. हे प्रकरण दडपण्यासाठी अंजलीला बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
वाचा अंजलीची आई रेखा यांच्यासोबतची संपूर्ण बातचीत...
प्रश्न : या प्रकरणात आतापर्यंत जे घडले, पोलिसांची कारवाई आणि निधीचे वक्तव्य, याकडे कसे पाहता?
उत्तर : पोलीस कारवाई करतही आहेत, आणि करतही नाहीत. दर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी येतात. रात्री 12-1 वाजता येतात. काही प्रश्न विचारायचे असतील, तर दिवसा आमच्याशी बोला. ते रात्री येतात आणि माझ्या भावाला पकडून गाडीत ढकलून घेऊन जातात.
प्रश्न : निधी म्हणाली होती की अंजली दारूच्या नशेत होती, तिने ती अंजलीची मैत्रीण असल्याचे म्हटले आहे, तुमचे निधीला काय प्रश्न आहेत?
उत्तर : जर ती अंजलीची मैत्रीण होती, तर ती त्याच वेळी माझ्या घरी आली असती. चला, ती रात्री घाबरली होती, तर सकाळी आली असती. मी तिला ओळखतही नाही. ती स्वत: सांगत आहे की, 8-10 दिवसांपूर्वीच तिची अंजलीशी मैत्री झाली होती.
प्रश्न : सुरू असलेल्या तपासाविषयी आणि पोलिसांविषयी काय म्हणणे आहे?
उत्तर : पोलिसांनी त्याच वेळी कारवाई करायला हवी होती. कुणी हेल्मेट नाही घातले तर लगेच पोलीस येतात. त्यांनी माझ्या मुलीला दोन तास ओढत नेले, पण पोलिस आले नाही.
प्रश्नः शवविच्छेदन अहवालावर समाधानी आहात?
उत्तरः मी अहवाल पाहिला नाही. माझा भाऊ हे सर्व पाहत आहे. मी बातम्याही बघत नाही.
प्रश्न : तुम्हाला कोणत्या पक्षाकडून किंवा नेत्याकडून मदत मिळाली आहे का?
उत्तरः मनीष सिसादिया आले होते, भावाला नोकरी देऊ असे म्हटले आहे. केजरीवालजींनी पैसे द्यायला सांगितले होते, पण अजून काहीच मिळाले नाही.
यानंतर आम्ही अंजलीचे मामा प्रेम यांच्याशी बोललो. या प्रकरणात तेच पोलीस ठाण्यात ये-जा करत आहेत, वकिलाशी बोलत आहेत.
प्रश्न : तपास सुरू झाल्यानंतर पोलिसांचे तुमच्यासोबत कसे वागणे राहिले?
उत्तर : मला खूप वाईट वागणूक मिळाली आहे. ते जबरदस्तीने ढकलून घेऊन जातात. अशी वागणूक दिली जात आहे, जसे आम्हीच आमच्या मुलीला मारले आहे. आम्हाला संरक्षण देण्याऐवजी आमच्यावर अत्याचार होत आहेत. दिल्ली पोलिसांकडून आम्हाला सुरक्षा मिळत नाही. माझ्या जीवाला धोका आहे.
प्रश्न : पोलीस काय करत आहेत याबद्दल थोडं सांगा?
उत्तरः एकदा रात्री 11-11:30 वाजता मी जेवत होतो. मुलाने येऊन सांगितले की पोलीस काका विचारत आहेत. मी गेल्यावर त्याने मला ढकलले आणि म्हणाले, चल एसएचओ साहेब बोलावत आहेत. एसएचओ साहेब माझ्या घरी का येत नाही? सीबीआयने तपास करावा अशी आमची इच्छा आहे. दिल्ली पोलिसांवर आम्हाला विश्वास नाही. खटला बंद करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. आमची गृहमंत्री अमित शहा यांना या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची विनंती आहे.
दरम्यान, आईने मध्येच थांबवले आणि म्हणाल्या - मला मुलीच्या प्रकरणात सीबीआय चौकशी हवी आहे. पोलीस कोणतेही काम करत नाहीत. माझ्या भावाला त्यांच्यापासून खूप धोका आहे.
आम्ही पुन्हा प्रेम यांच्याशी बोलू लागलो...
प्रश्न : निधी म्हणाली की, त्या दिवशी अंजली पार्टीला गेली होती, यावर काय सांगाल?
उत्तर : निधी म्हणतेय की अंजलीने ड्रिंक घेतली होती. आमच्या मुलीने मद्यपान केले नसल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. जर दारू प्यायलीही असेल तर दुसऱ्यांचा जीव घेण्याचा अधिकार कोणाला आहे. अंजलीची बदनामी करून गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलीस त्यांना संरक्षण देत आहेत.
प्रश्न : पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत असे तुम्हाला वाटते का?
उत्तर : हे प्रकरण दडपण्यासाठी तपास केला जात आहे. आम्हाला न्याय हवा आहे. आरोपींवर खुनाचा खटला चालवला. निधीवरही कारवाई व्हावी, तिला सगळं माहीत होतं, पण ती लपवत राहिली. तिला कुणीतरी साथ देत आहे.
अंजलीच्या कुटुंबीयांच्या आरोपांवर आम्ही डीसीपी बाह्य दिल्ली हरेंद्र मलिक यांच्याशी बोललो. त्यांनी हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.
हे वृत्तही वाचा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.