आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Answers To All The Questions Related To The New Assessment Scheme Of 30:30:40, Also Know Your Result

दिव्य मराठी कॅलकुलेटर:CBSE बारावीच्या 30:30:40 नवीन फॉर्मुल्यावर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे, अशा पद्धतीने आताच जाणून घ्या आपला निकाल

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केवळ लेखी परीक्षांच्या गुणांवर लागू राहणार हे सूत्र, प्रॅक्टिकलचे मार्क आधीच CBSE ला पाठवले

CBSE ने 12 b वीचे निकाल जाकरी करण्यासाठी 30:30:40 चा फॉर्मुला निश्चित केला आहे. यानुसार, कुठल्याही विद्यार्थ्याला 10 वीच्या वार्षिक परीक्षेत मिळालेल्या एकूण गुणांपैकी 30%, 11 वीच्या वार्षिक परीक्षेच्या एकूण गुणांचा 30% आणि 12 वीमध्ये झालेल्या युनिट टेस्ट, मिड टर्म आणि प्री बोर्ड परीक्षांच्या एकूण गुणांचा 40% मिळणार आहे. हे सर्व मार्क जोडल्यानंतर गणित लावून तोच 12 वीच्या वार्षिक परीक्षांचा निकाल म्हणून जारी केला जाणार आहे.

निकाल कॅलकुलेट करताना आपल्याला 30:30:40 या सूत्राचा वापर करावा लागणार आहे. अर्थात 10 वी, 11 वी आणि 12 वीच्या गुणांना जोडून तयार केला जाणारा निकाल केवळ थ्योरी म्हणजेच लेखी परीक्षांचा निकाल राहील. त्याला एकूण गुण असे मानता येणार नाही. कारण, या वर्षी 12 वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण आधीच शाळांनी CBSE ला पाठवले आहेत.

10 वीचे मार्क कसे जोडले जातील?
दहावीमध्ये विद्यार्थ्यांना 5 किंवा 6 विषयांचा अभ्यास करावा लागतो. त्यातील 3 टॉप स्कोअरिंग विषयांचे गुण जोडले जाणार आहेत.

11 वीच्या मार्कांचे गणित काय?
अकरावीच्या परीक्षांमध्ये सर्वच विषयांत मिळालेल्या गुणांची एकूण बेरीज केली जाईल. त्यातील गुणांचा विचार होणार आहे. 10 वी प्रमाणे या ठिकाणी 3 स्कोअरिंग सबजेक्ट्सचा विचार केला जाणार नाही.

12 वीच्या मार्कांचे असे राहील गणित
बारावीमध्ये विषयानुसार झालेल्या युनिट टेस्टचे मार्क, मिड टर्म अर्थात सहामाही परीक्षांचे मार्क आणि प्री बोर्ड एक्झामचे मार्क यांची एकूण बेरीज केली जाईल.

नोट - CBSE ने विषयनिहाय निकाल तयार करण्यावर अद्याप काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे आम्ही सरासरी निकालांचे मार्क आणि टक्केवारी दाखवत आहोत.

या फॉर्मुल्यानुसार, विद्यार्थी आपले निकाल कॅलकुलेट करू शकतील. यासाठी खाली दिलेल्या कॅलकुलेशन पद्धतीचा मदत घेता येईल.

प्रश्नोत्तरांमध्ये जाणून घ्या निकालांचे बारकावे

प्रश्नः जर का 3 परीक्षा झाल्या असतील - त्यातील युनिट टेस्ट, मिड टर्म आणि प्री बोर्ड परीक्षांच्या निकालांचे गणित कसे लावले जाईल?
उत्तर: CBSE मध्ये कोणते निकाल सबमिट केले जातील हे त्या-त्या शाळांवर अवलंबून राहील.

प्रश्न विषयनिहाय मार्क कसे कॅलकुलेट केले जातील?
उत्तर: सीबीएससीने अद्याप यावर स्पष्टीकरण दिलेले नाही.

प्रश्न: लेखी परीक्षांच्या 500 गुणांपैकी गुण कॅलकुलेट केले जात असतील तर मग प्रॅक्टिकलच्या मार्कांसह अंतिम निकालांचा स्कोअर कसा कळेल?
उत्तरः हे कॅलकुलेशन केवळ लेखी परीक्षांबाबतचे आहे. प्रॅक्टिकलचे मार्क्स अंतिम निकालांमध्ये जोडले जातील. विशेष म्हणजे, प्रॅक्टिकलचे मार्क त्या-त्या शाळांनी आधीच सीबीएससीकडे पाठवले आहेत.

30:30:40 चा फॉर्मुला का बनवला?
कोरोना काळात CBSE च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. 12 वीच्या निकालांवर पंतप्रधानांच्या बैठकीमध्ये निर्णय झाला. यानंतर इंडियन स्कूल सर्टिफिकेट (ISC) च्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.

पंतप्रधानांनी बैठकीमध्ये नमूद केले होते, की विद्यार्थ्यांचे संरक्षण हेच आपले प्राधान्य आहे. अशा वातावरणात त्यांना परीक्षांचा ताण देणे योग्य नाही. त्यांचा जीव धोक्यात टाकता येणार नाही. बारावीचे निकाल निर्धारित वेळेच्या आत आणि तार्किक आधारावर तयार केले जातील. यानंतर 4 जून रोजी CBSE ने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालांचे सूत्र तयार करण्यासाठी 13 सदस्यीय समिती स्थापित केली होती. या समितीला 10 दिवसांच्या आत रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

31 जुलै पर्यंत जारी होऊ शकतात निकाल
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एजुकेशन (CBSE) ने 17 जून रोजी बारावीच्या निकालांवर सूत्रांचा एक रिपोर्ट सुप्रीम कोर्टात दाखल केला. बोर्डानुसार, निर्धारित केलेल्या धोरणात 30:30:40 फॉर्मुल्याने निकाल जारी केले जातील. जर यावर विद्यार्थी समाधानी नसेल तर परिस्थिती सामन्य झाल्यानंतर त्या-त्या विद्यार्थ्यांना वेगळी परीक्षा देण्याची परवानगी दिली जाईल. सर्व काही सुरळीत राहिल्यास 31 जुलै पर्यंत निकाल जारी केले जातील असेही बोर्डाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...