दिव्य मराठी विशेष / ‘महाराष्ट्र बचाव’ विरुद्ध ‘महाराष्ट्रद्रोही भाजप’ नेटकरी भिडले

भाजपच्या आंदोलनाविरोधात मंत्री आदित्य ठाकरे यांनी टि्वट केलले छायाचित्र भाजपच्या आंदोलनाविरोधात मंत्री आदित्य ठाकरे यांनी टि्वट केलले छायाचित्र

  • टॉप ट्रेडिंग टॉपिकमध्ये महाराष्ट्रातील दोन विरोधी भूमिका मांडणारे दिवसभर हॅशटॅग ट्रेंड

दिव्य मराठी

May 23,2020 08:04:00 AM IST

मुंबई. महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव वाढत आहे, तर दुसरीकडे आघाडी सरकार विरुद्ध भाजप यांच्यातील राजकारणही चांगलेच पेटत आहे. भाजपने राज्य सरकारविरुद्ध ‘महाराष्ट्र वाचवा’ आंदोलन करत सरकारचा निषेध केला, तर सत्ताधाऱ्यांनी या आंदोलनावर जोरदार टीका करत ‘महाराष्ट्रद्रोही भाजप’हा ट्रेंड सुरू केला. ट्विटरवर भाजप समर्थक आणि महाविकास आघाडीचे समर्थक आमने-सामने आले. यात दोन्ही बाजूंचे नेटकरी जोरदार भिडले. त्यांच्यात हॅशटॅग युद्ध सुरू झाले. शुक्रवारी राज्यात हाच ट्रेंडिंग टॉपिक पहायला मिळत होता.


महाविकास आघाडीमधील पक्षांनी ‘महाराष्ट्रद्रोही भाजप’ हा हॅशटॅग वापरून संकटाच्या काळात भाजप राजकारण करून राज्याच्या हिताविरोधात पाऊल उचलत असल्याचा टोला लगावला आहे, तर भाजपच्या समर्थकांनी महाराष्ट्र बचाव हा हॅशटॅग वापरून करोनासंदर्भातील उपाययोजनांसंदर्भात महाविकास आघाडी अपयशी ठरल्यासंदर्भात टीका सुरू ठेवली. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या भाजपसोबत जाऊन आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना? याचा विचार जनतेने करावा. असे मत राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरवरून व्यक्त केले. या ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्रद्रोही बीजेपी हा हॅशटॅग वापरला, तर दुसरीकडे काँग्रेसच्या मुख्य ट्विटर हॅँडलवरूनही हा हॅशटॅग वापरत सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजप राजकारण करू पाहत असल्याचा टोला लगावला आहे. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी महाविकास आघाडीचा विरोध करणारे फलक हाती घेऊन आंदोलन केले. या आंदोलनाचे फोटो पोस्ट करताना फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर हॅँडलवरून ‘महाराष्ट्र बचाव’ हॅशटॅग वापरला. एकंदरितच राज्यावर कोरोनाचे संकट असताना ट्विटवर मात्र दोन्ही बाजूचे समर्थक एकमेकांचा विरोध करताना दिसत आहेत. त्यामधून देशभरातील ट्विटरच्या टॉप ट्रेडिंग टॉपिकमध्ये महाराष्ट्रातील दोन विरोधी भूमिका मांडणारे हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहेत.

कोरोना भूल गये, पॉलिटिक्स प्यारा है ‘शेमफुल’ : आदित्य

मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या आंदोलनाचा समाचार घेताना आंदोलनासंदर्भातला एक फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, अत्यंत लज्जास्पद राजकारण नेत्यांकडून केले जात आहे. ‘लहान मुलांना भरउन्हात उभे करून तोंडावरचे मास्कही खाली करायला सांगून अशा आंदोलनाचे फोटो काढणे लज्जास्पद आहे.’ भाजपच्या राजकारणाला ‘शेमफुल’ म्हणताना त्यांनी ‘लहान मुलांना घरात सुरक्षित ठेवायचं सोडून असे रस्त्यावर उभे केले जात आहे’, ‘कोरोना को भूल गये, पॉलिटिक्स प्यारा है,’ असेही लिहिलं आहे.

X
भाजपच्या आंदोलनाविरोधात मंत्री आदित्य ठाकरे यांनी टि्वट केलले छायाचित्रभाजपच्या आंदोलनाविरोधात मंत्री आदित्य ठाकरे यांनी टि्वट केलले छायाचित्र