आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एझिथ्रोमाइसिन फेल:खोकला झाला की कोरोना समजून एझिथ्रोमाइसिन खाललात? ही बातमी तुमच्यासाठीच! कोरोनावर फेल, तरीही 4 महिन्यांत झाली इतकी विक्री

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या सविस्तर...

कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या औषधांबद्दल जर आपल्याला थोडीफार माहिती असल्यास आपण एझिथ्रोमाइसिन या औषधाचे नाव नक्की ऐकले असेल. थोडासा खोकला असो किंवा कोरोना संसर्गाचा उपचार असो, दीड वर्षांपूर्वी कोरोनाचाचा प्रादुर्भाव झाल्यापासून एझिथ्रोमाइसिन या औषधाचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला.

आता युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या महत्त्वपूर्ण संशोधनात असे आढळले आहे की, कोरोनाच्या उपचारांत एझिथ्रोमाइसिनचा वापर केल्यामुळे कोणत्याही प्रकारचा फायदा झाला नाही. परिणाम म्हणून हे औषध केवळ प्लेसिबोसारखे काम करत होते. म्हणजेच, ही गोळी घेतल्यानंतर रूग्णांना फक्त असे वाटते की त्यांना आराम मिळाला आहे, परंतु असे होत नाही.

एझिथ्रोमाइसिन एक ब्रॉड-स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आहे. म्हणजेच, हे एक असे अँटीबायोटिक आहे ज्याचा उपयोग अनेक प्रकारचे बॅक्टेरियल इंफेक्शन दूर करण्यासाठी केला जातो. डॉक्टर सामान्यत: अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग आणि टायफॉइडच्या उपचारांसाठी याचा उपयोग करतात.

वैद्यकीय सल्ल्याशिवाय एझिथ्रोमाइसिनची होते विक्री
सामान्य लोकांमध्येही एझिथ्रोमाइसिन हे एक प्रसिद्ध अँटीबायोटिक आहे. घश्यात थोडासा संसर्ग होताच बहुतेक लोक हे औषध मेडिकल स्टोअरमधून तीन गोळ्यांची स्ट्रीप घेऊन डॉक्टरांच्या सल्याविना स्वतःच सेवन करण्यास सुरवात करतात. खरं तर हे शेड्युल H औषध असून वैद्यकीय सल्ल्याशिवाय त्याची विक्री करता येत नाही.

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाने असे केले संशोधन
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी एकूण 263 स्वयंसेवक निवडले. यापैकी 171 लोकांना एझिथ्रोमाइसिन टॅब्लेटचा एक डोस देण्यात आला. त्याच वेळी, 62 लोकांना समान प्लेसिबो गोळी दिली गेली.

संशोधक कॅथरीन ओल्डनबर्ग आणि त्यांच्या सहकार्यांनुसार, ज्या रुग्णांना एझिथ्रोमाइसिन हे औषध देण्यात आले होते त्यांच्यामध्ये प्लेसिबो गोळी घेणा-या रुग्णांच्या तुलनेत 14 दिवसांनंतरही लक्षणांमध्ये काहीच सुधारणा झाली नाही.

आरोग्य मंत्रालयाने आधी शिफारस केली होती, आता प्रोटोकॉलमधून काढून टाकले
भारतात साथीचा रोग सुरू झाल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने आपल्या प्रोटोकॉलमध्ये म्हटले होते की, कोविड -19 च्या विरोधात कोणतेही अँटीव्हायरल औषध प्रभावी सिद्ध झाले नाही. अशा परिस्थितीत मंत्रालयाने डॉक्टरांना कोरोनाच्या गंभीर रूग्णांच्या उपचारासाठी एझिथ्रोमाइसिनसह हायड्रोक्सीक्लोरोक्विन वापरण्यास परवानगी दिली होती.

  • तीन महिन्यांपूर्वी काही राज्यांच्या आरोग्य विभागांनी त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये होम आयसोलेशनमध्ये राहणार्‍या रुग्णांना एझिथ्रोमाइसिन देण्याचा सल्ला समाविष्ट केला होता.
  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या वर्षी मे मध्ये जारी केलेल्या कोविड -19 च्या क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलमध्ये एझिथ्रोमाइसिनचा समावेश नव्हता.
  • एप्रिलमध्ये एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले होते की, हायड्रोक्सीक्लोरोक्विन आणि एझिथ्रोमाइसिनच्या बाजूने कोणताही डेटा नाही आणि बहुतेक मार्गदर्शक सूचनांमध्ये एझिथ्रोमाइसिनचा समावेश नाही.

कोरोनावर एझिथ्रोमाइसिनच्या परिणामाबद्दल तज्ज्ञांचे मत

  • कोविड -19 वरील क्लिनिकल ​रिसर्चसाठी कार्यरत असलेले राष्ट्रीय टास्क फोर्सचे सदस्य डॉ. संजय पुजारी म्हणतात की, बर्‍याच नियंत्रित चाचण्यांमध्ये हे सिद्ध झाले आहे की कोरोनाच्या उपचारात एझिथ्रोमाइसिन प्रभावी नाही, म्हणूनच रूग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर त्याचा वापर कमी झाला आहे.
  • पुणे विभागासाठी स्थापन केलेल्या विशेष टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. डी.बी. कदम म्हणतात की, एझिथ्रोमाइसिनचे हृदयावरही दुष्परिणाम होऊ शकतात, म्हणूनच त्याचा वापर थांबवण्यात आला आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचे म्हणणे आहे की, कोरोना साथीच्या काळात अँटीबायोटिक्स औषधांचा जास्त वापर केल्यास त्यांच्या विरोधात प्रतिकार वाढू शकतो. कोणतेही बॅक्टेरिअल इंफेक्शनशिवाय एझिथ्रोमाइसिनच्या अधिक वापरामुळे लोकांमध्ये त्याविरोधात प्रतिकार निर्माण होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...