आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुछ दिल ने कहा:नायकाचा मार खाणाऱ्या मुलाला जेव्हा लाभला अनुपम खेर यांच्या करुणेचा आधार...

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चेंबूरमध्ये १९८५ च्या जानेवारीत सुरू असलेल्या “स्वार्थी’ चित्रपटाच्या चित्रीकरणाची ही चर्चा आहे! इंटरनेटवरील माहितीनुसार, या चित्रपटाचे दिग्दर्शक राधाकांत होते, परंतु अनुपम खेर यांच्याकडून खात्री केली असता त्यांनी दिग्दर्शकाचे नाव ‘चंद्रकांत’ असे सांगितले. तर “चंद्रमुखी हो या पारो, कोई फरक नहीं है यारों’ आपल्यासाठी मूळ कथा महत्त्वाची, जी अतिशय हृदयस्पर्शी आहे. अनुपम खेर यांनी मे १९८४ मध्ये “सारांश’ चित्रपटाद्वारे चित्रपट जगतातील एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. काम सातत्याने मिळत होते आणि ते करत होते. मुंबईमध्ये मोजकेच स्टुडिओ शिल्लक होते, ज्यात मोजक्याच मेकअप रूम होत्या. स्टार जितका मोठा तितकी त्याची मेकअप रूम मोठी. व्हॅनिटी व्हॅनची संकल्पना अजून मुंबईत आली नव्हती. पहिली व्हॅनिटी व्हॅन बनवण्याचे श्रेय पूनम धिल्लनला जाते. त्यामुळे चेंबूरमध्ये जिथे चित्रीकरण सुरू होते, तिथे काही मेकअप रूम प्रॉडक्शनच्या लोकांनी तात्पुरत्या स्वरूपात उभारल्या होत्या, पण अनुपम यांना ही रूम ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांच्यासोबत शेअर करावी लागली. हा ज्येष्ठ अभिनेता थोडासा उद्धट, आखडू आणि थोडासा गर्विष्ठ वाटला, पण एका प्रसंगाने अनुपम यांच्या या विचारांवर शिक्कामोर्तब केले. सुरेश ओबेरॉय यांचा नोकर दत्तू बुटाच्या लेस बांधत असताना ओबेरॉय यांनी आपले पाय दत्तूच्या मांडीवर ठेवले आणि खुर्चीवर पसरून बसले. नोकर दत्तूने चुकून बुटाच्या लेस थोड्या घट्ट बांधल्या. सुरेश ओबेरॉय हे रागाने लालबुंद झाले आणि त्यांनी दत्तू या छोट्या मुलाला इतक्या जोरात लाथ मारली, की तो वेदनेने कळवळला. त्यांचा बूट त्याच्या पोटात लागला होता. अनुपम यांना त्याची वेदना सहन झाली नाही आणि त्यांनी विरोध दर्शवला. त्यामुळे ओबेरॉय अधिकच संतापले आणि अनुपम यांच्यावर जोरात ओरडत म्हणाले, “मी या मुलाला सहा आठवड्यांपासून सहन करतो आहे. माझ्या जागी दुसरे कोणी असते तर तो सहा दिवसही सहन करू शकला नसता.’ सुरेश यांची ही गोष्ट अनुपम खेर यांच्यासाठी एक आव्हान बनून समोर आली. त्यांनी त्याच वेळी ते आव्हान स्वीकारलं आणि ठरवलं, की हा गरीब मुलगा दत्तू आता आपल्यासोबत काम करेल! किसी दर्द मंद के काम आ, किसी डूबते को उछाल दे ये निगाह ए नाज़ की मस्तियां किसी बदनसीब पे डाल दे! त्या मुलाचे पूर्ण नाव “दत्तू सामंत’ होते आणि हेच दत्तू सामंत गेल्या ३८ वर्षांपासून अनुपम खेर यांची त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून सेवा करत आहेत. दत्तू आपल्या मालकाशी एकनिष्ठ आहेत, प्रामाणिक आहेत, त्यांना काय हवे, नको याची काळजी घेतात आणि अनुपम यांच्यासोबत ते अर्धे जग फिरलेही आहेत. अनुपम खेर यांचा ७ मार्चला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा! आपल्याला निरोगी, आनंदी दीर्घायुष्य लाभो अाणि ज्याप्रमाणे गरीब दत्तूला तुमच्यासारखी श्रीमंत आणि सामर्थ्यवान व्यक्ती भेटली, तसाच प्रत्येकाला करुणेचा स्रोत मिळो. ज्या दर्शन आणि चिंतनात संपूर्ण मनुष्यजातीच्या हिताची, कल्याणाची आणि मांगल्याची प्रार्थना केली आहे, असा शुद्ध, सुगंधित वारा केवळ आणि केवळ भारतभूमीतच वाहू शकतो! सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामयाः। सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥ म्हणजेच सारे सुखी होवोत, रोगमुक्त होवोत, सर्वांचे जीवन समृद्ध होवो आणि कोणाच्याही वाट्याला दु:ख येऊ नये, ही प्रार्थना! यात ना काही मूर्त आहे, ना काही अमूर्त, ना तीर्थ, ना काबा, ना ईश्वर आहे, ना अल्लाह, ना येशू, ना मोझेस, कोणतेही नियम आणि अटी नाहीत, कोणताही छुपा अजेंडा नाही! बृहदारण्यक उपनिषदाचा हा श्लोक ज्याने कोणी लिहिला असेल त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आणि उत्कृष्ट प्रेमी जगाला क्वचितच सापडेल! ५ मार्चला प्रसिद्ध अभिनेते, नाट्यकलाकार व चित्रपट दिग्दर्शक सौरभ शुक्ला यांचाही वाढदिवस आहे. त्यांनाही हार्दिक शुभेच्छा! Dear Saurabh, Many Many happy returns of the day! May the existence bless you with a long and healthy life with loads of success and Joy! मला अलीकडेच सौरभ शुक्ला दिग्दर्शित चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्याचे चित्रीकरण सिहोर आणि भोपाळमध्ये पूर्ण झाले. यात त्यांनी मला चित्रपटातील साधारण मुख्य खलनायकाची भूमिका दिली. आवडली म्हणून मी ती स्वीकारली. या व्यक्तिरेखेच्या वैशिष्ट्यांविषयी चर्चा करण्यासाठी ते आले तेव्हा त्यांचे विचार चित्रपटातील संवादापेक्षा पूर्णपणे वेगळे वाटले. तेव्हा मी त्यांना आश्वासन दिले, की तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल. मला फक्त भाषेत आणि संवादात थोडा बदल करावा लागेल, पण काळजी करू नका, मी चित्रपटाच्या गाभ्याला धक्का लावणार नाही. आणि सुदैवाने नेमके तसेच घडले! सौरभ शुक्ला यांच्या दिग्दर्शनाखाली काम करताना खूप मजा आली. त्याचा ब्लॉकिंग सेन्स आणि तंत्र केवळ प्रभावीच नाही, तर अतिशय नीटनेटके, स्वच्छ आहे आणि हे गुण तेव्हाच आढळतात, जेव्हा दिग्दर्शकाला चित्रपट आणि रंगमंच या दोन्ही गोष्टींचे ज्ञान असते. मला तीन दिग्दर्शक-कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि तिन्ही अनुभव आनंददायी होते. आधी सुभाष घई, नंतर “क्रॅश कोर्स’मध्ये विजय मौर्य आणि आता २०२३ मध्ये सौरभ शुक्ला. ज्यांना चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी मी वेळोवेळी माझे अनुभव शेअर करत राहीन. आणि हो, होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा! होली की बहार आई फ़रहत की खिली कलियां, बाजों की सदाओं से कूचे भरे और गलियां दिलबर से कहा हमने टूक छोड़िए रंगबलियां होली में यही धूमें लगती हैं बहुत भलियां! तुम हाथ में लोटा लो, हम हाथ में लुटिया ले तुम हमको भिगो डालो हम तुमको भिगो डालें तुम बोलो उ हू हो हो, हम बोले आहा हो हो! (आपल्या भारतातील पहिले लोकप्रिय कवी नाझीर अकबराबादी यांची २००-२५० वर्षे जुनी कविता) आज एवढेच. नमस्कार! जय हिंद! वंदे मातरम!

अन्नू कपूर सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि सूत्रसंचालक

बातम्या आणखी आहेत...