आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Apart From The Lungs, Corona Also Attacks The Liver, It Can Be Fatal; Vaccine Also Fails In Front Of It

कोरोनामुळे यकृत निकामी होण्याचा धोका:फुफ्फुसाशिवाय यकृतावरही हल्ला करतो कोरोना, ठरु शकतो जीवघेणा; याच्यासमोर लसही प्रभावी नाही

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचा सविस्तर...

कोरोना विषाणू सर्वप्रथम आपल्या फुफ्फुसांना लक्ष्य करतो, परंतु तो आपल्या यकृतासाठी देखील तेवढाच धोकादायक नाही. अमेरिकेतील टॅनेसी विद्यापीठाच्या एका नवीन संशोधनानुसार, कोरोनाने त्रस्त असलेल्या 11% रुग्णांना यकृताची समस्या आहे. डॉक्टरांच्या मते, कोरोनाविरूद्ध विकसित लस देखील आपले यकृत वाचवू शकत नाही.

अशा प्रकारे कोरोना विषाणू यकृतावर हल्ला करतो
संशोधनात संशोधकांना असे आढळून आले आहे की, कोरोना विषाणू यकृतामध्ये उपस्थित असलेल्या महत्त्वाच्या एंजाइम्सचे प्रमाण वाढवतो. या एंजाइम्सना एलेनिन एमीनोट्रान्सफेरेज (ALT) आणि एस्परटेट एमिनोट्रान्सफेरेज (AST) अशी नावे आहेत. संशोधनानुसार, 15 ते 53 टक्के कोरोना रुग्णांमध्ये हे लिव्हर एंजाइम्स जास्त प्रमाणात आढळून आले. या लोकांचे यकृत तात्पुरते खराब झाले असे म्हणता येईल.

कोरोना संसर्गाच्या वेळी दिलेल्या औषधांमुळे आपल्या यकृतालाही धोका असतो.
कोरोना संसर्गाच्या वेळी दिलेल्या औषधांमुळे आपल्या यकृतालाही धोका असतो.

कोरोना विषाणूचा कोणताही प्रकार, मग तो डेल्टा असो वा ओमायक्रॉन, यकृताच्या मुख्य सेल्सवर नकारात्मक परिणाम करतो. यामुळे यकृताचे कार्य मंदावते. कोरोना संसर्गाच्या वेळी दिलेल्या औषधांमुळे आपल्या यकृतालाही धोका असतो.

कोरोना रुग्णांमध्ये यकृत निकामी होण्याचा धोका
कोरोनामुळे यकृताला सूज येणे आणि कावीळचा त्रास उद्धवू शकते. याशिवाय रुग्णांमध्ये यकृत निकामी होण्याचा धोकाही असतो. शास्त्रज्ञांच्या मते, जर तुम्हाला यकृताचा गंभीर आजार असेल तर कोरोनाचा धोका आणखी वाढतो. हा संसर्ग तुमच्यासाठी घातकही ठरू शकतो.

कोरोनामुळे रुग्णांमध्ये यकृत निकामी होण्याचा धोकाही आहे.
कोरोनामुळे रुग्णांमध्ये यकृत निकामी होण्याचा धोकाही आहे.

कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत? तुमच्या यकृताला मात्र धोका आहे

मॅक्स हॉस्पिटलचे डॉ. जतीन अग्रवाल सांगतात की, कोरोनाची लक्षणे नसली तरी शरीराच्या अवयवांना इजा होऊ शकते. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात रुग्णामध्ये विषाणूची कोणतीही लक्षणे नव्हती, तरीही त्याच्या यकृताला दुखापत झाली होती. म्हणजेच, लक्षणे नसलेल्या प्रकरणांमध्येही लोकांना कावीळ आणि यकृत निकामी झाल्याच्या तक्रार येऊ शकतात.

लस देखील यकृताला कोरोनापासून वाचवू शकत नाही
डॉ. अग्रवाल यांच्या मते, कोरोनाविरुद्ध बनवलेल्या लस शरीरात संसर्ग गंभीर होण्यापासून रोखतात. परंतु आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, संसर्ग झाल्यास ते आपले यकृत वाचवू शकत नाहीत. त्यामुळे कोरोनाल्या हलक्यात घेण्याची चूक करू नका. कोविड प्रोटोकॉलचे पालन करूनच आपण आपल्या शरीराला या आजारापासून वाचवू शकतो.

डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, कोरोनाची लस देखील आपले यकृत वाचवण्यास सक्षम नाही.
डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, कोरोनाची लस देखील आपले यकृत वाचवण्यास सक्षम नाही.

तिसऱ्या लाटेमध्ये यकृत कसे निरोगी ठेवायचे?
डॉक्टरांच्या मते, उच्च प्रथिनयुक्त आहार यकृत निरोगी ठेवू शकतो. जेवणामध्ये अंडी, दूध, कडधान्ये, हिरव्या भाज्या, फळे, पनीर, नट्स, सीड्स, बीन्स, मासे आणि चिकन यासारख्या अधिकाधिक गोष्टींचा समावेश करा. कॅफिनचे सेवन केल्याने यकृतातील एंजाइम्स नियंत्रणात राहतात. हे तुमचे यकृत आणि रोगप्रतिकारक शक्ती दोन्ही मजबूत ठेवेल.

उच्च प्रथिनयुक्त आहाराने यकृत निरोगी ठेवता येते.
उच्च प्रथिनयुक्त आहाराने यकृत निरोगी ठेवता येते.

या व्यतिरिक्त अल्कोहोल, साखर, मीठ, तळलेले पदार्थ, पांढरा ब्रेड, भात, पास्ता आणि लाल मांस यांचे अतिसेवन टाळा. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा.

बातम्या आणखी आहेत...