आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहाय प्रोफाईल प्रकरणांमध्ये छापे टाकल्यामुळे ईडी पुन्हा चर्चेत आहे. बंगालमधील ममता सरकारचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून एका आठवड्यात ईडीने सुमारे 49 कोटी रुपये रोख आणि 5 किलोहून अधिक सोने जप्त केले आहे.
ईडीच्या छाप्यानंतर अर्पिताच्या घरातून जप्त झालेल्या नोटांच्या ढिगाऱ्याची छायाचित्रे व्हायरल होत आहेत. नोटांचे हे ढिगारे पाहून अनेकांच्या मनात प्रश्न येतो की इतक्या नोटांचे काय केले जाते?
आजच्या दिव्य मराठी एक्सप्लेनर मध्ये ED, CBI आणि आयकर विभागासारख्या तपास यंत्रणांनी जप्त केलेल्या मालमत्तेचे काय होते हे जाणून घेऊया..
तपासासाठी छापे टाकण्याचा ईडीला अधिकार
ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांना मनी लाँड्रिंग, आयकर फसवणूक किंवा इतर गुन्हेगारी कारवायांमध्ये तपास,चौकशी, छापे टाकण्याचे आणि मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार आहेत.
या तपास यंत्रणा जप्त केलेली मालमत्ता त्यांच्या ताब्यात घेतात आणि नंतर न्यायालयाच्या आदेशाने ते आरोपीला परत केले जातात किंवा सरकारची मालमत्ता म्हणून ठेवले जातात.
ही संपूर्ण प्रक्रिया नसून यात अनेक टप्यांचा समावेश असतो....
या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी दिव्य मराठीने सर्वोच्च न्यायालयाचे वकील विराग गुप्ता यांच्याशी चर्चा केली..
विराग म्हणाले, "ईडी, सीबीआय आणि आयकर विभागासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांना कोणत्याही प्रकरणाच्या तपासासाठी छापे टाकण्याचा अधिकार आहे."
"या एजन्सींच्या तपासाच्या अधिकारांची दोन भागात विभागणी केली गेली आहे - एक अटक आणि चौकशीसाठी आणि दुसरा संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी छापेमारी," असे विराग म्हणाले.
"तपास यंत्रणांनी टाकलेले छापे वेगवेगळ्या माहितीवर आधारित असतात, त्यामुळे आरोपीवर एकदाच छापे टाकले जावेत असे नाही, तर छापे अनेक टप्प्यात टाकले जाऊ शकतात."
ईडीला PMLA कायद्याअंतर्गत मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार
विराग गुप्ता म्हणतात, 'ईडीबद्दल बोलायचे झाल्यास मनी लाँडरिंग प्रतिबंधक म्हणजेच PMLA कायदा, 2002 अंतर्गत आहे, जर सीमाशुल्क विभाग असेल तर सीमाशुल्क कायद्यांतर्गत आणि जर आयकर विभाग असेल तर आयकर कायद्यांतर्गत मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार आहे.
"ज्या कायद्यान्वये तपास यंत्रणा काम करते त्याच कायद्याअंतर्गत छापा टाकण्याचा, मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार आहे."
ईडीकडून जप्त केलेल्या मालमत्तेचा पंचनामा
छाप्यात अनेक गोष्टी जप्त केल्या जाऊ शकतात - कागदपत्रे, रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने यांसारख्या मौल्यवान वस्तू.
विराग सांगतात, “या छाप्यात जप्त केलेल्या मालमत्तेचा पंचनामा करण्यात येतो. पंचनामा करण्याची जबाबदारी तपास यंत्रणेचा IO म्हणजेच तपास अधिकाऱ्याकडे असते".
"पंचनाम्यावर दोन स्वतंत्र साक्षीदारांच्या सह्या असतात. ज्या व्यक्तीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे त्या व्यक्तीची स्वाक्षरीही त्यावर असते. पंचनामा तयार झाल्यानंतर जप्तकेलेली मालमत्ता केस प्रॉपर्टी बनते".
आता जाणून घेऊया की ईडीने जप्त केलेल्या रोख रकमेचे, दागिन्यांचे आणि मालमत्तेचे काय होते?
रोख रक्कम
मालमत्ता
PMLAच्या कलम 5 (1) अंतर्गत मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार ईडीला आहे. मालमत्तेची जप्ती न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर, ही मालमत्ता PMLA कलम 9 अंतर्गत सरकारच्या ताब्यात जाते.
विराग यांच्या म्हणण्यानुसार, "जेव्हा ईडी कोणतीही मालमत्ता जप्त करते तेव्हा त्यावर एक बोर्ड लावला जातो, ज्यावर ही मालमत्ता विकली जाऊ शकत नाही किंवा वापरता येणार नाही." असे लिहिलेले असते.
तथापि, अनेक प्रकरणांमध्ये, घर आणि व्यावसायिक मालमत्ता जप्त केलेली असतांना देखील वापरासाठी सूट दिली जाते.
ED 180 दिवसांसाठी मालमत्ता जप्त करू शकते
PMLA अंतर्गत, ईडी जास्तीत जास्त 180 दिवसांच्या कालावधीसाठी म्हणजे 6 महिन्यांसाठी मालमत्ता जप्त करू शकते.
जर तोपर्यंत ईडी न्यायालयात जप्त केलेल्या मालमत्तेच्या अवैधतेचा पुरावा सादर नाही करू शकले, तर 180 दिवसांनंतर मालमत्तेवरची जप्ती हटवण्यात येते.
जर ईडीने 180 दिवसांच्या आत मालमत्तेची अवैधता न्यायालयात सिद्ध केली तर सरकार मालमत्ता ताब्यात घेते. यानंतर आरोपीला ईडीच्या या कारवाईविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी 45 दिवसांचा अवधी मिळतो.
व्यावसायिक मालमत्ता जप्त झाल्यास त्याच्या वापरावर बंदी नाही
दागिने
मालमत्तेबाबत अंतिम निर्णय न्यायालयाचा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.