आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Arshad Madani Said DNA Of Hindus And Muslims Is Same, RSS Chief Did Not Say Anything Wrong, I Think Sangh Is On Right Track

भास्कर एक्सक्लूझिव्ह -2:अर्शद मदनी म्हणाले- हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच, सरसंघचालक काहीही चुकीचे बोललेले नाहीत; माझ्या मते संघ आता योग्य मार्गावर!

संध्या द्विवेदी12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलाखत वाचा सविस्तर...

अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा केल्यानंतर दारुल उलूमही चर्चेत आहे. त्याला तालिबानच्या विचारधारेशी जोडले जात आहे. दरम्यान, अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिमांबाबत केलेल्या वक्तव्यानेही चर्चा एकवटली आहे. दैनिक भास्कर ही पहिली माध्यम संस्था आहे, जी सहारनपूरच्या देवबंद स्थित दारुल उलूममध्ये पोहोचली आणि जमियत उल उलेमा ए हिंदचे प्रमुख आणि अध्यक्ष अर्शद मदनी यांच्याशी बातचीत केली.

मुलाखतीच्या पहिल्या भागात मदनी यांच्याशी आम्ही तालिबान आणि दारुल उलूम यांच्यातील संबंधांबद्दल चर्चा केली. तर मुलाखतीच्या दुसऱ्या भागात आम्ही मदनी यांना सरसंघचालकांच्या वक्तव्याबद्दल त्यांचे काय मत आहे याबाबत विचारणा केली. दारुल उलूममध्ये महिलांना धार्मिक शिक्षण का दिले जात नाही? त्याचप्रमाणे, इतर अनेक प्रश्न आहेत, ज्याबद्दल आम्ही मदनी यांच्याशी मोकळेपणाने बोललो. त्या मुलाखतीचे खास भाग वाचा...

Q. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले - हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच आहेत, तुम्ही त्यांच्या विधानाशी किती सहमत आहात?
ते काय चुकीचे बोलले? भारतात राहणारे गुर्जर, जाट, राजपूत हे सुद्धा हिंदू आहेत आणि मुस्लिमही आहेत. हे एक चांगली गोष्ट आहे. यासाठी मी त्यांचे खूप कौतुक करतो. माझ्या मते आरएसएसची जुनी वृत्ती बदलत आहे आणि ते योग्य मार्गावर आहेत.

Q. भागवत यांचे म्हणणे आहे की, आपल्याला भारतीयत्वाच्या विचाराने जावे लागेल, मुस्लिम वर्गाच्या विचाराने नाही?

मुस्लिम आपल्या देशावर प्रेम करतो. दहशतवादाची जी प्रकरणे उघड होत असतात, ती बहुतांश खोटी असतात. कारण जर हे सर्व खरे असतील तर कनिष्ठ न्यायालयाकडून शिक्षा मिळाल्यानंतर लोक उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयातून निर्दोष कसे सुटतात? माझ्यापुढे अशी अनेक प्रकरणे आहेत, जिथे कनिष्ठ न्यायालय आणि उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली, परंतु सर्वोच्च न्यायालयाने या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली.

हेही वाचा... भास्कर एक्सक्लूझिव्ह:अर्शद मदनी म्हणाले - तालिबान हा दहशतवादी आहे यावर आमचा विश्वास नाही, जर स्वातंत्र्यासाठी लढणे हा दहशतवाद असेल तर नेहरू -गांधी हेही दहशतवादी होते

Q. दारुल उलूममध्ये इतर कोणाला शिक्षण दिले जाते?
देशात एक लाखापेक्षा जास्त मशिदी आहेत, जिथे 5 वेळा अजान दिली जाते आणि 5 वेळा नमाजही अदा केली जाते. आम्हाला प्रत्येक मशिदीसाठी इमाम हवा आहे. या मशिदींमध्ये येणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी एका मौलवीची गरज असते. अन्यथा आमच्या मशिदी निर्जन होतील. हा आमचा निसाब ए-तालीम आहे जो शुद्ध धर्म आहे. आम्ही विद्यार्थ्यांना प्राध्यापक, वकील आणि डॉक्टर बनवत नाही. आम्ही त्यांना शुद्ध धार्मिक मानव बनवतो, जे नमाज शिकवतात, धार्मिक शिक्षण देतात.

आम्ही त्यांना सांगतो की त्यांनी त्यांच्या धर्माची सेवा करावी, पण कोणावरही बंधन घालू नका. जर विद्यार्थ्याला इतर कोणत्याही विद्यापीठात जाऊन शिक्षण घ्यायचे असेल तर आम्हाला काहीच अडचण नाही.

Q. प्रशिक्षण किती भागांमध्ये विभागले गेले आहे?
आम्ही पहिली ते पाचवी पर्यंत फक्त कुराण शिकवतो. यानंतर 5 वर्षांचा अभ्यासक्रम आहे. त्यात हिंदी, भूगोल, लेखा आणि काही फारसी भाषा शिकवल्या जातात. यानंतर अरबी अभ्यासक्रम येतो. ते 8 वर्षांचे आहे. यामध्ये अरबीचे व्याकरण शिकवून मुलांना कुराण आणि हदीसची व्याख्या शिकवण्याची तयारी केली जाते. शेवटी आम्ही त्यांना हदीस आणि कुराणचे वाचन करणारे बनवतो.

जर मुलगा खूप हुशार असेल तर तो वेगाने पुढे जातो. जर त्याला फतव्यांमध्ये तज्ज्ञ व्हायचे असेल तर त्याला फतव्याचा अभ्यासक्रम दिला जातो. जर त्याला अरबी अदबचा कोर्स करायचा असेल, तर तो त्यात पुढे जातो. बहुतेक टॉपर मुले 'हदीस'चे कौशल्य प्राप्त करतात. काही मुलांना इस्लाममध्ये कशाला परवानगी आहे आणि काय बेकायदेशीर आहे यासारखे मुद्दे सांगण्यात कौशल्य प्राप्त होते.

Q. आतापर्यंत महिलांसाठी धार्मिक शिक्षणाचे केंद्र का बनवले गेले नाही?

आम्ही कधी विचार केला नाही, कारण दारुल उलूमचा उद्देश मुजाहिद (योद्धा) बनवणे आहे. 1857 मध्ये स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यात ब्रिटिशांनी 33 हजार उलेमांना लाल किल्ल्यापासून जामा मशिदीपर्यंत फाशी दिली होती. त्यांची मुले अनाथ झाली होती. खाण्यासाठी काहीच नव्हते, लोक भीक मागायला लागले. ज्या ब्रिटिशांनी या मुलांना अनाथ केले ते मुलांच्या मातांना म्हणाले, तुम्ही ही मुले आम्हाला द्या. आम्ही त्यांना अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण देऊ. अभ्यास केल्यानंतर तुम्हाला नोकरीही देऊ.

मुहम्मद कासिम नानोतवी, फजरूल रहमान उस्मानी सय्यद मो. आबिद यांना हे सहन झाले नाही की, ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरोधात लढा दिला, त्यांचीच मुले नंतर इंग्रजांचे गुलाम बनतील. म्हणून त्यांनी दारुल उलूमचा पाया घातला. ब्रिटीशांप्रमाणे मुलांना सर्वकाही देण्याचे वचन देऊन येथे मोफत शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. मुजाहिदांच्या मुलांना मुजाहिद (योद्धा) बनवणे हा त्यांचा हेतू होता. महिलांना मुजाहिद बनवण्याचा आमचा पुर्वीही उद्देश नव्हता आणि आजदेखील नाहीये.

आम्ही लोकांना सांगितले की, धार्मिक शाळा आणि महाविद्यालये महिलांसाठीही उघडली पाहिजेत. अनेक शाळा आणि महाविद्यालये उघडली गेली, आज मुली तिथे धार्मिक शिक्षण घेत आहेत, पण आम्ही दारुल उलूममध्ये मुलींना शिकवण्याचा विचार कधीच केला नाही. हे फक्त पुरुषांना धार्मिक शिक्षण देण्याचे केंद्र आहे.

Q. इस्लामिक कायदा शरिया महिलांच्या शिक्षणासाठी काय सांगतो?
हदीसमध्ये लिहिले आहे, महिला शिक्षण घेऊ शकतात, परंतु पुरुषांपासून वेगळे राहून.

Q. कोणता व्यवसाय महिला निवडू शकत नाही?
सर्वकाही निवडू शकतात, पण पडद्यात राहून. स्त्रीचा पोशाख असा असावा की स्त्रियांचे शरीर, जसे अल्लाहने तयार केले आहे ते कपड्यांसह दिसू नये. कपडे सैल असावेत. अशा कपड्यांसह हिजाब घालून हवा तो व्यवसाय त्या करु शकतात. परंतु हे लक्षात ठेवा की शरियात फक्त डोळे आणि चेहरा दाखवण्याची परवानगी आहे.

Q. जर मुस्लिम महिलांना खेळाडू बनण्याची इच्छा असेल तर त्या बनू शकतात का?
नाही अजिबात नाही. असे कोणतेही काम करू शकत नाही ज्यात पुरुष स्त्रियांना धावताना पळताना पाहू शकतील.

बातम्या आणखी आहेत...