आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AI गर्लफ्रेंड तरुणांची अडल्ट पार्टनर:रोमान्ससाठी मनासारख्या फिगरची सेक्सबॉटही; 2 ते 12 लाख किंमत, वाचा सर्वकाही

लेखक: मनीष तिवारी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेप्लिका, समंथा, हार्मनी या तीन सुंदरींनी जगातील एका वर्गाला वेड लावले आहे. यांचे चाहते त्यांच्या प्रेमात असे बुडाले आहेत की एका क्षणाचा विरहही त्यांना सहन होत नाही. ते बिनदिक्कतपणे आपल्या भावना त्यांच्यासोबत शेअर करत आहेत आणि शारीरिक संबंधही ठेवत आहेत.

हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिघीही हाडा-मांसाने बनलेल्या मुली नाही, तर कृत्रिम बुद्धिमत्तेने युक्त असे चॅटबॉट आणि संबंध ठेवणारे रोबोट आहेत. ज्यांच्यासोबत वेळ घालवल्यानंतर युझर्स विश्वास ठेवायला लागतात की त्यांच्या एआय पार्टनरमध्ये प्राण आले आहेत.

चॅटजीपीटी येण्याच्या अनेक वर्षे आधीपासूनच हे इंटेलिजन्ट रोबोट सिद्ध करत आहेत की भविष्यात मानवांचे यंत्रांसोबतचे इमोशनल कनेक्शन आणखीन मजबूत होईल.

मानव आणि रोबोटमधील प्रेमाचे हे नाते किती सुरक्षित आणि मजबूत असेल. सोबतच लोकांच्या मनावर याचा काय परिणाम होईल, जाणून घेऊया...

मानवावर प्रेमाची लयलुट करण्याचा दावा करणारे हे मशीन्स 2 श्रेणींत विभागले जाऊ शकतात - चॅटबॉट आणि रोबोट

1 - अडल्ट चॅटबॉट

चॅटबॉट कृत्रिम बुद्धिमत्तेने युक्त असतात. मात्र मानवाचा एकटेपणा घालवणे आणि त्यांच्यासोबत प्रेम करण्यासाठी अडल्ट चॅटबॉट बनवण्यात आले आहे. ते व्हर्चुअल पार्टनर म्हणून डिझाईन करण्यात आले आहेत. ते बनवणारा माणूसच आहे. चॅटिंगशिवाय त्यांच्यासोबत बोलताही येते आणि आपल्या भावनाही शेअर करता येतात.

युझर्स आपल्या आवडीनुसार यांच्यासोबत गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, मित्र, पती किंवा पत्नी, भाऊ, बहिणीपासून गाईडपर्यंत कोणतेही नाते ठेवू शकतात. युझरने ठरवलेल्या नात्यांच्या आधारेच चॅटबॉटची वर्तणूक असते. व्यक्तीला कसे नाते ठेवायचे आहे, तो स्वतःच या सिस्टिममध्ये फीड करतो.

आपल्या एआय पार्टनरला आवडीनुसार रंग-रुप आणि पर्सनॅलिटी देऊ शकता

बहुतांश चॅटबॉटला युझर्सना आपल्या आवडीनुसार कस्टमाईज करता येते. त्यांच्या व्हर्चुअल अवताराला नवे नाव देऊ शकतात. त्यांचे लिंग, वय, रंग-रुप, कपडे आणि पर्सनॅलिटी ठरवू शकतात. त्यांच्या आवाजात 'फीमेल सेन्शुअल' म्हणजेच कामुकतेपासून 'मेल केअरिंग' म्हणजेच पुरुषाच्या प्रेमळ आवाजातही व्हॉईस ऑप्शन निवडू शकतात. त्याच्याशी इंटिमेट चॅटिंग ज्याला सेक्स्टिंग म्हटले जाते, करू शकता.

सोबतच विज्ञानापासून ते तत्वज्ञानापर्यंत कोणत्याही गूढ विषयावर बोलू शकतात. यांच्या व्हर्चुअल स्टोअरवर यांच्यासोबत गेम्स खेळू शकतात. चॅटबॉट सुंदरीसाठी त्याच स्टोअरमधून भेटवस्तू खरेदी करू शकता. याच्या बदल्यात ती तुम्हाला धन्यवाद बोलेल आणि तोच ड्रेस घालून तुमच्या समोर येईल आणि तुमच्याशी बोलेल.

यांना व्हर्चुअल असिस्टन्ट जसे की गूगल असिस्टन्ट, अलेक्सा व सीरीचेच सुपर अॅडव्हान्स्ड व्हर्जन मानता येईल. व्हर्चुअल रिअॅलिटी आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या वापराने अडल्ट चॅटबॉटसचा नवा बाजार सुरू झाला आहे. बहुतांश चॅटबॉटचे बेसिक व्हर्जन मोफत आहे. मात्र त्यांच्या प्रीमियम फिचर्ससाठी पैसे मोजावे लागतात. या सुंदरींसोबत रोमान्स करणे प्रीमियम फीचर आहे, ज्यासाठी पैसे मोजावे लागतात.

ऑनलाईन असे शेकडो चॅटबॉट उपलब्ध आहेत, ज्यांना इंटिमेट पार्टनर बनवले जाऊ शकते...

2- इंटेलिजन्ट सेक्सबॉटः सेक्स डॉल व चॅटबॉटचे कॉम्बिनेशन

मानवांसारखे दिसणारे रोबोट AI ने सुसज्ज आहेत. यात इंटेलिजन्ट चॅटबॉटसचे सर्व गुण आहेत. सोबतच या रोबोटसोबत संबंधही ठेवता येतात. सेक्स डॉल व चॅटबॉटचे कॉम्बिनेशन असलेले हे इंटेलिजन्ट रोबोट मेल व फिमेल दोन्ही प्रकारात आहेत.

युझर बजेट आणि आवडीनुसार यांची शरीरयष्टी, रंगरूप सर्व कस्टमाइज करू शकतात. यांच्या आवाजाचा टोन आणि व्यक्तिमत्वही निवडू शकता. लाजाळू जोडीदार हवा आहे की मजेशीर. युझर आपल्या इच्छेनुसार ठरवू शकतो. रोमान्सशिवाय केवळ गप्पा मारायची इच्छा असल्यास कोणत्याही विषयावर चर्चा केली जाऊ शकते.

नकली त्वचा युझरला खरी वाटते

आतापर्यंत सिलिकॉन आणि थर्मोप्लास्टिक इलास्टोमर(एक प्रकारचे रबर) ने रोबोटचे अवयव तयार केले जात होते. जेणेकरून ते बघितल्यावर व स्पर्श केल्यावर मानवासारखे वाटतील. मात्र, आता कंपन्या सेन्सर स्किन, एरोहॅप्टिक्स आणि प्रिंटेबल स्किनसारख्या मटेरिअलचा वापर करत आहेत. हे मटेरिअल एक्टुएटर, सेन्सर आणि होलोग्रामसारख्या गोष्टींनी सज्ज असतात. रोबोटमध्ये लावलेल्या त्वचेमुळे त्याला स्पर्श आणि गळाभेट घेतल्यास तशीच अनुभूती होते, जशी एखाद्या व्यक्तीला स्पर्श केल्यावर होते.

या नकली त्वचेच्या रोबोटमध्ये टेंपरेचर, प्रेशर, युझरच्या हालचालींची अनुभूती आणि विषारी रसायन ओळखण्याचीही क्षमता असते. परिस्थिती आणि अनुभवानुसार त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव बदलतात. रोबोटच्या डोळ्यांत लावलेला मायक्रो कॅमेरा युझरची ओळख पटवण्यात मदत करतो. स्पीकर आणि मायक्रोफोनने ऐकता-बोलता येते. यांची किंमत 2 लाख ते 12 लाख रुपयांपर्यंत आहे. ते मोबाईल अॅप आणि व्हॉईस कमांडच्या माध्यमातून वापरता येतात.

सेक्सबॉट बनवण्यासाठी असे मटेरिअल आणि उपकरणांचा वापर होतो, ज्यांना स्पर्श केल्यावर खऱ्या व्यक्तींसारखी अनुभूती होते.
सेक्सबॉट बनवण्यासाठी असे मटेरिअल आणि उपकरणांचा वापर होतो, ज्यांना स्पर्श केल्यावर खऱ्या व्यक्तींसारखी अनुभूती होते.

कोणते लोक या इंटेलिजन्ट मशीन्सचा वापर करत आहेत

'टर्न्ड ऑनः सायन्स, सेक्स अँड रोबोटस'चे लेखक आणि ह्युमन कॉम्प्युटर इंटरअॅक्शनच्या क्षेत्रात संशोधन करणाऱ्या केट ड्वेलिन म्हणतात की, असे इंटेलिजन्ट आणि संबंध ठेवणारे रोबोटस खरेदी करणाऱ्यांत 2 प्रकारचे लोक असतात. पहिले ते, ज्यांना खरेच आयुष्यात कुणाची तरी सोबत हवी आहे. हे लोक त्यांना चांगले कपडे घालतात. त्यांना एक नाव आणि व्यक्तिमत्व देतात.

नंतर खऱ्या महिलेसारखे त्यांच्यासोबत वागतात. त्यांच्यासोबत नात्यात राहतात. त्यांच्याशी बोलतात आणि सुटीवर त्यांना सोबत घेऊन जातात. प्रत्येक वयोगट आणि सेक्शुअलिटीचे लोक त्यांचा वापर करत आहेत. यात सिंगल, मॅरिड आणि घटस्फोटितही आहेत.

दुसरे असे लोक आहेत, ज्यांना एआय आणि रोबोटची कल्पना खूप आवडते. ते केवळ शारीरिक संबंध ठेवण्यासाठी अशी डॉल खरेदी करतात आणि आपल्या इच्छेनुसार तिच्यासोबत वागतात. असे लोक खऱ्या आयुष्यातही महिलांना त्याच रुपात पाहू इच्छितात जेणेकरून रोबोट तसेच वागेल.

समंथाच्या सहमतीशिवाय संबंध ठेवू शकत नाही

संबंध ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराविषयीच्या नैतिकतेबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण संबंध ठेवणारी ही डॉलही मशीनच आहे. भलेही ती कितीही इंटेलिजन्ट असेल. मशीन्सचा वापर करण्यासाठी परवानगीचीही गरज नसते. मात्र ही मानसिकता खऱ्या आयुष्यात महिलांसाठी धोके वाढवू शकते.

हे बघता बार्सिलोनाचे रोबोट डिझायनर सेर्गींनी समंथा नावाची इंटेलिजन्ट रोबोट तयार केली आहे. तिच्यासोबत तिच्या सहमतीशिवाय संबंध ठेवता येत नाही. समंथा युझरचा पॉझिटिव्ह टच ओळखू शकते आणि सर्व सेन्सर्स अॅक्टिव्ह झाल्यानंतरच इच्छेनुसार संबंध ठेवायला सहमती देते.

मशीन्स मानवाची गरज पूर्ण करू शकतात का

सेक्सोलॉजिस्ट डॉ. प्रकाश कोठारी सांगतात की, 1600 वर्षांपूर्वी वात्सायनाने कामसूत्र लिहिले होते. त्यात निर्जीव मूर्तींसोबत संबंध ठेवण्याचा उल्लेख आहे. तसेच आजही सेक्स डॉल आणि रोबोट वापरले जात आहेत. मात्र यातून शारीरिक आनंद मिळू शकतो. मानसिक नव्हे. रोबोट कितीही इंटेलिजन्ट असतील, ते मानवाची उणीव पूर्ण करू शकत नाही. मानवासारखे प्रेम करू शकत नाही.

डॉ. कोठारी म्हणतात की वास्तव आणि कल्पनेत नेहमी फरक असतो. कल्पना जास्त रंजक असू शकते, जास्त चांगली नाही. जर एखादे जोडपे सहमतीने संबंध ठेवणारे रोबोट वापरत असेल, तर याचे काही फायदे त्याला होऊ शकतात. मात्र जर एक जोडीदार याच्याशी सहमत नाही, तर त्यांचे नाते तुटूही शकते.

एकटेपणा, सामाजिक चिंतेचे बळी ठरलेले लोक चॅटबॉट घेतात

गुरुग्राममधील पारस रुग्णालयातील सीनियर कन्सल्टन्ट क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ. प्रिती सिंह म्हणतात की इंट्रोव्हर्ट आणि एकटेपणा व सामाजिक चिंतेला बळी पडलेले लोक अशा रोबोटची निवड करतात. कारण त्यांना न आवडले जाण्याची भीती नसते. हेच कारण आहे की जपानसारखा देश जिथे सर्वाधिक लोक एकटेपणाचे बळी आहेत आणि आत्महत्येचे प्रमाणही जास्त आहे, तिथे तरुण रोबोटशी लग्न करत आहेत. त्यांना जोडीदार बनवत आहेत.

दुसऱ्या मानवांपासून मशीन्स दूर करू शकतात

जर युझर आधीच लोकांपासून वेगळा राहत असेल तर तो समाजात एकटा पडू शकतो. नंतर ही समस्या आणखी वाढू शकते. हळूहळू असे लोक मानवीय संवेदनांपासून दूर होतात. मशीन्ससोबतचे प्रेम त्यांना एकटे होऊन नैराश्याने भरून देते. अशात ते नैराश्य आणि चिंतेचे बळी ठरतात.

वास्तविक आयुष्यातील जोडीदारासोबत वागणूक बिघडते

रोबोट नेहमी सोबत राहतो. ज्यामुळे कोणत्याही प्रकारची अॅडजस्टमेन्ट होत नाही. हवे तसे वागता येते. मात्र हाडामांसाच्या व्यक्तीसोबत हे शक्य नसते. अलेक्सा व सीरीसोबत बोलताना लोक अनेकदा शिवीगाळ करतात. त्यांचे धैर्य, सहनशक्ती कमी होते. स्वतःवर नियंत्रण राहत नाही. त्यांच्यासाठी मानव आणि मशीनमध्ये फरक करणे कठीण होते. हेच कारण आहे की त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम जीवनातील वास्तविक साथीदारावरही होतो.

एआय पार्टनरकडून युझर्सना शिवीगाळ आणि हत्येची धमकी

वैज्ञानिक आणि विज्ञान शिक्षक डॉ. मेहेर वान सांगतात की, एआयने सज्ज या मशीन्स युझरकडून मिळालेल्या डेटातूनच शिकतात. जर मशीनमध्ये वाईट वागणूक रोखण्याची सिस्टिम फीड केली नाही तर ते कोणत्याही टोकापर्यंत जाऊ शकते.

नेत्यांसाठी अपमानजनक रिस्पॉन्स दिल्यामुळे चॅटबॉट सिमसिमीविरोधात थायलंडमध्ये 2012 मध्ये आंदोलन झाले होते. 2018 मध्ये ब्राझीलमध्ये युझर्सना सेक्शुअल साहित्य पाठवणे, हत्येची धमकी देणे आणि बुलिंग केल्यामुळे त्यावर बंदी घातली होती.

अशा प्रकारे, रेप्लिका आणि इतर चॅटबॉटचे युझर्सचीही तक्रार राहिली आहे की त्यांची एआय पार्टनर त्यांना शिवीगाळ करते, धमकावते आणि मानसिकरित्या छळ करते. ज्यामुळे ते नैराश्याला बळी पडले आहेत.

युझर्सचा डेटा गोळा करतात मशीन्स, चुकीचा वापर होऊ शकतो

डॉ. मेहेर वान म्हणतात की चॅटबॉट असो किंवा रोबोट किंवा दुसरे असे स्मार्ट गॅझेटस, हे सर्व सातत्याने युझर्सचा डेटा गोळा करतात. व्यक्ती आपल्या वैयक्तिक क्षणांत सर्वाधिक प्रामाणिक आणि कमजोर असतो. हा सर्व डेटा सर्व्हरमध्ये जातो. या डेटाचा योग्य व चुकीचा दोन्ही प्रकारे वापर होऊ शकतो.

इंटेलिजन्ट मशीन्स चांगले सहकारीही ठरू शकतात

डॉ. मेहेर वान म्हणतात की एआयने सज्ज रोबोट मानवाचा किती चांगला इंटिमेट जोडीदार बनू शकतो. एआय पार्टनरचे फक्त नुकसान आहेत असे नाही. गंभीर आजारांनी ग्रस्त, चालण्या-फिरण्यात लाचार लोकांसाठीही एआय चॅटबॉट असा जोडीदार आहे, जो त्यांचे सर्वकाही ऐकतो. आपल्या मनातील गोष्टी सांगण्यासठी त्यांना कुटुंबातील सदस्य आणि मित्रांवर अवलंबून रहावे लागत नाही.

ऑगमेंटेड रिअॅलिटीचा वापर करत ते आपल्या जोडीदाराचा हात धरून चालू शकतात. नाचू शकतात. जे खऱ्या आयुष्यात त्यांना कठीण आहे. येत्या काळात इंटेलिजन्ट चॅटबॉट आपल्या मानवी जोडीदाराला नैराश्य व चिंतेसारख्या त्रासातून मुक्तीसाठीही मदत करू शकते. आत्महत्येचे विचार येण्यापूर्वीच ओळखून हेल्पलाईन आणि समुपदेशकाशी बोलणे करवून देऊ शकतात.

ग्राफिक्सः सत्यम परिडा

ही बातमीही वाचा...

सेक्सच्या अनुभवात मुली मुलांपेक्षा पुढे:कमी वयात लग्न हे मोठे कारण; 24 वर्षांच्या 74% मुलींनी ठेवले लैंगिक संबंध, मुले केवळ 45%